नवी मुंबईतील महाराष्ट्र भवन राज्य सरकार - उपमुख्यमंत्री अजित पवार

नवी मुंबई : नवी मुंबई वाशी येथे महाराष्ट्र भवन उभारण्याचा गेली अनेक वर्षे रखडलेला प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदर महाराष्ट्र भवन उभारणीसाठी हिरवा कंदील दिला आहे. सदर महाराष्ट्र भवन राज्य सरकार उभारणार असून सिडकोने भवन निर्मितीसाठी भूखंड रु.1 मात्र दराने देण्याबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली असून येत्या  8 दिवसात नगरविकास मंत्री, प्रधान सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको एम.डी., नवी मुंबई महापालिका आयुक्त तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांसमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. यामुळे आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या शासन दरबारी पाठपुराव्याला यश आले असून लवकरच नवी मुंबई वाशी येथे सुसज्ज अशी महाराष्ट्र भवन ची वास्तू उभी राहणार आहे. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे यांनाही निवेदन देण्यात आले असून त्यांच्यासह ही फोनवर संपर्क साधून चर्चा करण्यात आली.

यावेळी आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, नवी मुंबई वाशी येथे सर्व राज्यांच्या भवने निर्मितीसाठी भूखंड उपलब्ध करून दिले गेले असून  त्यामध्ये “महाराष्ट्र भवन” उभारणेसाठीही 8000 स्क्वे.मी. भूखंड उपलब्ध करून देण्याचा समावेश करण्यात आला आहे. इतर राज्यांची भवने वाशी येथे उभी असून आजतागायत महाराष्ट्र भवनाची वास्तू उभारण्याकरिता एक वीटही रचण्यात आलेली नाही ही संपूर्ण नवी मुंबईकरांसमवेत मलाही खंत आहे. रखडलेल्या या कामासाठी मी 2014 सालापासून पाठपुरावा करीत असून आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या महाराष्ट्र भवन उभारणीस हिरवा कंदील दिला आहे. महाराष्ट्र भवन निर्मिती ही काळाची गरज असून कोव्हीड काळात याची उणीव प्रकर्षाने जाणवली. सदर महाराष्ट्र भवन उभारणीकरिता अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतूद करण्यात आली आहे. परंतु अर्थसंकल्पात करण्यात आलेली निधीची रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे. त्यामुळे सिडको प्रशासनाने सदर भूखंड 1 रु. नाममात्र दराने देण्यात येणार असल्याने नवी मुंबईत सुसज्ज अशी महाराष्ट्र भवनाची वास्तू उभी राहणार आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दिबांचे नाव लागल्याशिवाय विमान उडणार नाही - केंद्रीय मंत्री रामदास आठवले