राजमाता जिजाऊ रूग्णालय बनले ऑक्सिजन पुरवठयात स्वयंपूर्ण

नवी मुंबई : ऐरोली, दिघा, रबाळे विभागाती नोड, गाव गावठाण, झोपडपटटी  परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना उपचारासाठी उपलब्ध पालिकेच्या ऐरोली विधानसभा क्षेत्रातील ऐरोली सेक्टर 3 येथील नवी मुंबई महापालिकेच्या राजमाता जिजाऊ रूग्णालयात वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठयाची कायमस्वरूपी सोय निर्माण झाली आहे. आमदार गणेश नाईक यांच्या एक कोटी रूपयांच्या आमदारनिधीतून रूग्णालयातच ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प स्थापन करण्यात आला आहे. आज त्याचे उदघाटन आमदार गणेश नाईक यांच्या शुभ हस्ते झाले. राजमाता जिजाऊ रूग्णालय आता ऑक्सिजन पुरवठयात स्वयंपूर्ण बनले असून केवळ कोविड काळातच नव्हे तर ऑक्सिजन पुरवठयाची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध झाली आहे.

कोरोना नियमांचे काटेकोर पालन करीत पार पडलेल्या या कार्यक्रमास  माजी आमदार संदीप नाईक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी विरोधीपक्षनेते दशरथ भगत, माजी सभापती डॉ. जयाजी नाथ,  माजी नगरसेवक अशोक पाटील, माजी परिवहन समिती सभापती अॅड. जब्बार खान, पालिकेचे शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोना व अन्य गंभीर आजारांनी ग्रस्त रूग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय ऑक्सिजन प्राणरक्षक ठरतो. त्यामुळे त्याला प्राणवायु देखील म्हणतात. शस्त्रक्रिया संदर्भीत रूग्ण, अस्थमाचे रूग्ण, हदयरोगी, प्रसृती गुंतागुंत, बालकांवर उपचार प्रसंगी, कोरोनाच्या गंभीर रूग्णांमध्ये ऑक्सिजनची गरज भासत असते. नवी मुंबईवर धडकलेल्या कोरोनाच्या मागील दोन लाटांमध्ये ऑक्सिजनची मागणी कमालीची वाढली होती. ऑक्सिजनची कमतरता पहाता मुंबईहून ऑक्सिजन आयात करावा लागला होता. ही सर्व परिस्थिती पहाता लोकनेते आमदार नाईक यांनी त्यांचा एक कोटी रूपयांचा आमदारनिधी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी नवी मुंबई महापालिकेला देवू केला होता. या निधीमधून आणि महापालिकेच्या काही निधीमधून पीएसए तंत्रज्ञानावर आधारित 1000 एलपीएम क्षमतेचा हा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभा राहिला आहे. दररोज 200 जम्बो सिलेंडर भरता येतील एवढी ऑक्सिजन निर्मिती या प्लांटमधून होणार असून प्रतिदिन 200 ते 205 रूग्णांना  वैद्यकीय प्राणवायू पुरविता येणार आहे. राजमाता जिजाऊ रूग्णालयात 200 खाटांचा अतिदक्षता विभाग आहे. या अतिदक्षता विभागातील रूग्णांना या प्लांटमधून ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. ऐरोली, रबाळे, दिघा आणि परिसरातील सर्वसामान्य रूग्णांची वैद्यकीय ऑक्सिजनसाठी होणारी धावाधाव आता थांबणार आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट तीव्र होवू लागली आहे. या ऑक्सिजन प्रकल्पाच्या उपयुक्ततेबददल लोकनेते आमदार गणेश नाईक म्हणाले की, नवी मुंबईत 30 ते 40 वर रोडावलेले कोरोनाची आकडे आज दररोज सरासरी दोन हजारांपर्यत गेले आहेत. राज्यातही कोरोनाची दररोजची संख्या 30 ते 40 हजारांच्या घरात आहे. कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पहाता ऑक्सिजनची  मागणी वाढली तर जिजाऊ रूग्णालयातील या प्रकल्पामधून वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करता येणार आहे. याशिवाय खाजगी रूग्णालयांनाही या प्रकल्पातून ऑक्सिजन पुरवठा करता येणार आहे.

कोरोना विरोधातील लढाई सुरूच राहणार आहे. महापालिका आयुक्त आणि अनेक अधिकारी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत मात्र काही अधिकाऱ्यांमध्ये सुधार घडविण्याची गरज आहे, असे मत आमदार नाईक यांनी यावेळी मांडले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सौ. शांता जाधव यांची शिवसेना बंजारा समाज नवीमुंबई जिल्हा महिला अध्यक्षा पदी नियुक्ती