महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
अनधिकृत सदनिकांची समाजमाध्यमावर जाहिरात
नवी मुंबई-:अनधिकृत इमारतीत ग्राहकांनी सदनिका खरेदी करू नये असे आवाहन वारंवार महापालीकडून केले जात आहे. मात्र याच अनधिकृत बांधकामांना मनपाचे काही भ्रष्ट अधिकारी अभय देत असल्याने अशा बांधकामांचे इमले उभे राहत आहेत. आणि याचाच फायदा काही दलालांनी घेत समाज माध्यमातून अशा सदनिकांची जाहिरात देत स्वस्त दरात घर देण्याची भुरळ घालत आहेत. त्यामुळे अशा जाहिरातींना भुलून घर खरेदी करणाऱ्या नागरिकांची फसगत होऊ शकते. त्यामुळे अशा जाहीरात बाजांवर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत.आणि सदर बांधकामे रोखण्यासाठी मनपा आयुक्त वारंवार विविध आदेश पारित करत आहेत. त्यात अनधिकृत बांधकामे निष्कासित करणे,अनधिकृत बांधकामांवर फलक लावणे,अशा इमारतीत घर घरेदी करू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे. मात्र या सर्व आदेशांची मनपा अधिकारी आणि भूमाफियांनी गाठोळी बांधून जणू पाण्यात विसर्जित केली आहे.कारण एवढे आदेश पारित करून देखील शहरात बेसुमार अनधिकृत बांधकामे सुरू असून यात घणसोली विभाग आघाडीवर आहे. तर अनधिकृत बांधकामांना प्रशासनिक अभय मिळत असल्याचे पाहुन आता काही घर विक्री करणाऱ्या दलालांनी देखील स्वतःची चंगळ करण्याचा नवीन फंडा अवलंबला आहे.सध्या नवी मुंबई शहरात घर खरेदी करणे म्हणजे एक दिवास्वप्नच आहे.आणि याचाच फायदा घेत काही दलालांनी स्वस्त घरे विक्रीच्या जाहिरातीच समाजमाध्यमातून करण्यास सुरूवात केली आहे.त्यामुळे आधीच शहरात सायबर क्राईम वाढत असताना स्वस्त घराच्या आमिशस्जे अनधिकृत घरे नागरीकांच्या माथी मारून फसगत होण्याची शक्यता आहे.त्यामुळे अशा प्रकारे जाहिरात करणाऱ्यांना अटकाव करण्याची मागणी होत आहे.