एपीएमसी कोरोना प्रसाराचा हॉटस्पॉट होण्याची भिती

नवी मुंबई ः संपूर्ण एमएमआर क्षेत्राला कृषि माल आणि अन्नधान्य पुरवठा करणारी एपीएमसी मार्केट आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ असून नवी मुंबई शहरातील कोव्हीड प्रसाराच्या दृष्टीने नेहमीच जोखमीचे क्षेत्र ठरली आहे. सध्या नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दररोज अडीच हजाराहुन अधिक रुग्ण कोरोनाबाधित होत असल्याचे निदर्शनास येत असून महापालिकेच्या वतीने सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीरितीने राबविण्यावर भर दिला जात आहे. एपीएमसी मार्केट मध्येही महापालिकेमार्फत कोव्हीड नियमांचे पालनाकडे लक्ष ठेवण्यासाठी विशेष दक्षता पथके कार्यरत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.  

कोव्हीडचा वाढता प्रसार आणि ओमायक्रॉनचा धोका लक्षात घता कोरोना प्रसाराचा हॉटस्पॉट मानल्या जाणाऱ्या एपीएमसी प्रशासनाने आपल्या आवारात कोव्हीड नियमांचे काटेकोर पालन होण्याबाबत दक्ष व्हावे या अनुषंगाने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘एपीएमसी’चे सह सचिव प्रकाश अष्टेकर आणि उप अभियंता मेहबूब बेपारी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करीत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अधिक प्रभावीपणे आवश्यक उपाययोजना करण्याचे त्यांना निर्देश दिले.

नवी मुंबई महापालिकेने ‘एपीएमसी’च्या पाचही मार्केटमध्ये दिवस-रात्र कोव्हीड टेस्टींग केंद्रे सुरुवातीपासूनच कार्यरत ठेवली असून जास्तीत जास्त टेस्टींग करुन कोरोनाच्या विषाणुला आहे तिथेच रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एपीएमसी प्रशासनानेही तेथे येणाऱ्या प्रत्येकाचे टेस्टींग होईल याकडे बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सूचित केले.

त्याचप्रमाणे मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे अशा महत्वाच्या सूचना दर अध्र्या तासांनी सर्व मार्केटस्‌मध्ये माईकींगद्वारे करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मास्क आणि इतर कोव्हीड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दररोज अधिक प्रभावीपणे दंडात्मक कारवाया करण्याचेही निर्देशित केले. याशिवाय कारवाईचा प्रभाव जाणवण्यासाठी आठवडयातून एक दिवस पूर्वसूचना न देता कारवाईचा मेगा ड्राईव्ह घण्याची सूचना आयुक्त बांगर यांनी केली.

एपीएमसी मार्केट मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातूनच नव्हे तर विविध राज्यातून शेतकरी, व्यापारी आपला माल घऊन येतात. त्यामुळे व्यापाऱ्यांप्रमाणेच इतर ठिकाणाहून आलेल्या वाहनांचे चालक, क्लिनर, मालवाहू कामगार यांचा मोठ्या प्रमाणावर राबता येथे असतो. सदर सर्क्रिंची टेस्टींग केली जात असून त्यामध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्या व्यक्तींना एपीएमसी मार्केट क्षेत्रात असलेल्या महापालिकेच्या कोव्हीड सेंटर मध्ये उपचारार्थ दाखल करुन घण्यात येते. त्यामुळे प्रत्येकाची टेस्टींग केली जात आहे, याकडे एमपीएमसी प्रशासनाने लक्ष द्यावे आणि टेस्टींगच्या ठिकाणी गर्दी होत असल्यास सदर बाब महापालिकेच्या निदर्शनास आणून द्यावी. त्याची त्वरीत दखल घत टेस्टींग करणारे समुह वाढविण्यात येतील, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी बैठकीत ‘एपीएमसी’च्या अधिकाऱ्यांना सूचित केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अनधिकृत सदनिकांची समाजमाध्यमावर जाहिरात