खारघर शहर हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता

 
खारघर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत  पनवेल पालिका हद्दीत खारघर शहर हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता असून पाच दिवसात खारघर मध्ये २००७ कोरोना बाधित रुग्ण आढळून असून  कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्यामुळे असून वाढत्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पनवेल पालिका प्रशासनाने खारघर मधील १५६ सोसायटी शील केली आहे.  

       गेल्या दोन वर्षात खारघर मध्ये कोरोना बाधितांचा आकडा २२५४२ असून पालिका हद्दीत सर्वात जास्त रुग्ण हे खारघर मध्ये आढळले आहे. तर  आतापर्यंत २०११५ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. तर सद्यस्थितीत २१२८  कोरोना बाधित रुग्णावर  उपचार सुरू आहे. तर २५९ व्यक्तीचा कोरोनामुळे निधन झाले आहे. जानेवारी उजाडताच खारघर मध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे पालिकेच्या कोरोना अहवाल वरून दिसून येते. गेल्या पाच दिवसात खारघर मध्ये २००७ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. खारघर परिसरात कोरोना रुग्णाची वाढत असून पाच पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असलेली सोसायटी सील करण्यात येत असून खारघर मध्ये पालिकेने  १५६ सोसायटी सील केली आहे. कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होवू नये म्हणून नागरिकांनी मास्कचा वापर करावा,सोशल डिस्टन्सचे पालन करावे, गर्दी करू नये असे आवाहन पालिकेकडून केला जात आहे. 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आदिवासी पाड्यात घोंगडी वाटप