'स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज' या अभिनव स्पर्धेचे आयोजन केले आहे

    'स्वच्छ सर्वेक्षण 2022' मध्ये केंद्रीय गृह निर्माण व शहर विकास मंत्रालयाच्या वतीने 'आजादी का अमृत महोत्सव' उपक्रमांतर्गत 'स्वच्छ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान चॅलेंज (Swachh Innovation Tenchonolgy challenge)' घोषित करण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनेही महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार 'स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज' या अभिनव स्पर्धेचे आयोजन केले आहे.

      या चॅलेंजमध्ये सहभागी होण्याकरिता 6 जानेवारी 2022 हा अंतिम दिनांक जाहीर करण्यात आला होता. तथापि सदर चॅलेंजमधील सहभाग आणखी वाढावा या उद्देशाने आता अंतिम मुदतीत वाढ करून 13 जानेवारी 2022 हा स्पर्धा सहभागाचा अंतिम दिनांक घोषित करण्यात आलेला आहे.

      नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षण संस्था, विविध प्रकारच्या स्वयंसेवी संस्था, नागरिक समुह, नवे लघुउद्योजक (Start Up's) आणि कॉर्पोरेट्स हे 'स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज' यामध्ये आपल्या स्वच्छताविषयक अभिनव तांत्रिक संकल्पना सादर करून सहभागी होऊ शकतात.

      या चॅलेंजनुसार अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर करून स्वच्छता कार्यात सुधारणा घडवून आणणा-या नव्या संकल्पनांची निर्मिती करणे आणि या स्वच्छता संकल्पनांचा प्रत्यक्ष उपयोग समाज, वॉर्ड व शहर पातळीवर करणे हे उद्दिष्ट नवी मुंबई महानगरपालिकेने नजरेसमोर ठेवले आहे. यामधून स्वच्छता विषयक नवनव्या तंत्र संकल्पनांचा उदय होईल व शहर स्वच्छता कार्याला लोकसहभागातून अधिक गतीमानता लाभेल.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईत पुनर्विकासाचा पहिला नारळ फुटला