महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
तळोजा मध्ये सिडकोकडून दहा हजार घरांचे बांधकाम सुरु
खारघर: सिडकोकडून खारघर आणि तळोजा परिसरात दहा हजाराहून अधिक घरांचे बांधकाम मोठया प्रमाणात सुरु असून परवडणाऱ्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांचे नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.असून खारघर रेल्वे स्थानक असलेल्या खाडी किनारा लगत टू बीएचके ची 2040 घरे घरांचे बांधकाम सुरु आहे. सदर घरे खाडी किनारा लगत असल्याने या घराला अधिक मागणी असणार असून दर देखील अधिक असणार असल्याचे समजले.
सिडकोच्या वतीने या घरकुल योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गटातील नागरिकांकरिता घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी येथे चोवीस हजार घरांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सिडकोने आतापर्यंत अनेक गृहनिर्माण योजना राबवल्या आहेत. त्यामुळे अनेकांना आपले हक्काचे घर घेता आले आहे. 'परवडणारी घरे' या संकल्पनेनुसार सिडकोने अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी योजना राबवली असून त्यातून अनेकांना आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करता आले आहे. याच अंतर्गत आता नवीन वर्षात सिडकोच्या वतीने महागृहनिर्माण योजना राबवली जाणार आहे. यामध्ये जानेवारी महिण्यात पाच हजार घरांची लॉटरी काढली जाणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले होते. खारघर मध्ये सेक्टर एक खारघर रेल्वे स्थानक लगत ,सेक्टर चौदा खारघर गाव मेट्रो स्थानक असलेल्या भूखंडावर उभारले जात आहे. या भूखंडावर तळ मजल्यावर बस टर्मिनल असून वरील निवासी घरे आहेत. तसेच सेक्टर अठरा डी मार्ट समोर आणि तळोजा सेक्टर एकोणचाळीस आदी भागात सिडकोकडून घरांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. खारघर मध्ये गृहनिर्माण प्रकल्प उभारणीचा ठेका हे कॅपासाईट इन्फ्राप्रोजेक्ट्स तर तळोजा आणि द्रोणागिरी परिसरात एल अँड़ टी ( लार्सन अँड टुब्रो ली ) या एजन्सीला देण्यात आले आहे. तळोजा सेक्टर एकोणचाळीस हा परिसर तळोजा कडून पनवेल कडॆ जाताना मुंब्रा पनवेल महामार्ग लगत आहे. सदर घरांचे बांधकाम हे सिमेंट काँक्रीटीकरणाचे असल्यामुळे येथील घराना अधिक मागणी असणार आहे. तर खारघर सेक्टर 1 अ खारघर रेल्वे स्थानक पासून पन्नास मीटर अंतरावर टूबीएचके घरे उभारली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार खारघर रेल्वे स्थानक शेजारी पंधरा मजल्याची एकूण सतरा इमारती उभारण्यात येत आहे.प्रत्येक मजल्यावर आठ टू बीएचके घरे असणार आहे. सिडकोकडून उभारल्या जाणाऱ्या घरांबाबत सिडको अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता, खारघर आणि तळोजा मध्ये जवळपास दहा हजार घरे आहेत. त्यात नगर विकास मंत्र्याने पाच हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार असल्याचे ट्विट केल्यामुळे अधिकारी अधिक बोलण्यास नकार दिला.