पादचारी पुलामुळे वाशीतील वाहतूक कोंडी फुटणार 

नवी मुंबई-:मागील काही वर्षापासुन वाशी कोपरखैरणे लिंक रोडवर सेक्टर ९ आणि १५ मध्ये पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पूल नसल्याने या ठिकाणी रोज वाहतूक कोंडी होत असते. मात्र आता या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पादचारी पूल बांधण्यास सुरूवात केल्याने लवकरच येथील वाह कोंडी फुटणार आहे.

नवी मुंबई शहराची निर्मिती झाल्यानंतर सर्वात प्रथम वाशी उपनगराची निर्मिती झाली .आणि वाढत्या नागरीकरणामुळे वाशी परिसर हा अत्यंत गजबजलेला परिससी राहिला आहे. वाशीतील सेक्टर ९ आणि १५/१६ या परिसरात मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत. त्यामुळे या ठीक रोज खरेदीसाठी हजारो नागरीकांची गर्दी होत असते. मात्र या ठिकाणी वाशी कोपरखैरणे लिंकरस्त्यावर रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पूल नसल्याने नागरीक वाहतुकीदरम्यानच रस्ता ओलांडत असत. त्यामुळे या ठिकाणी रोज वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असतात.शिवाय  अपघाताची शक्यता निर्माण होत असते.त्यामुळे या ठिकाणी पादचारी पुल बनवण्यात यावा अशी मागणी होत होती.त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणी पादचारी पुल बनवण्यास सुरूवात केली आहे.त्यास  २ कोटी ४४लाख रुपये खर्च होणार आहे. त्यामुळे सदर पादचारी पुल बनल्याने येथील वाहतूक कोंडो फुटणार आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी केले बाळशास्त्री जांभेकर याना विनम्र अभिवादन