नवी मुंबई महानगरपालिका पत्रकार कक्षात दर्पणकारांना अभिवादन

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षामध्ये पत्रकार दिनाचे औचित्य साधून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस प्रशासन विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्या शुभहस्ते पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त अनंत जाधव तसेच विविध वृत्तपत्र, वृत्तचित्रवाहिनी यांचे प्रतिनिधी, कॅमेरामन उपस्थित होते.

            याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरण करीत दरवर्षी साजरा केल्या जाणा-या पत्रकार दिनाच्या माध्यमातून लोकशाहीचा प्रमुख आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांशी संवाद साधता येतो याचा आनंद व्यक्त केला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने केल्या जाणा-या नाविन्यपूर्ण कामांची, प्रकल्पाची माहिती जनतेपर्यंत व्यापक प्रमाणात पोहचण्यासाठी पत्रकारांच्या लाभत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. तसेच  पत्रकार कक्षाच्या अनुषंगाने अपेक्षित असलेल्या विविध सुविधांची पूर्तता करण्याचे काम केले जाईल असे सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण