महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
उरण येथे आयोजित शरीर सौष्ठव स्पर्धेला उत्तम प्रतिसाद
उरण : सर्वांचे आरोग्य निरोगी राहावे, प्रत्येकाला व्यायामाची सवय लागावी, प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे या दृष्टीकोणातून द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे सेझ मैदान,बोकडवीरा, तालुका उरण येथे आयोजित 21 व्या युवा महोत्सवात शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे उदघाटन उद्योजक मनोज पडते, द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत, शिवेंद्र म्हात्रे यांच्या हस्ते झाले.
रायगड जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटना मान्यता प्राप्त द्रोणागिरी श्री 2022 या स्पर्धेत किताब विजेता - अजित वामन म्हात्रे ( रायगड हेल्थ सेंटर कोप्रोली-उरण ) ठरले.तर द्रोणागिरी फिजिक 2022 या स्पर्धेत किताब विजेता-साहिल अशोक पाटील ( पावर हाऊस जिम उरण) ठरले.
जितेंद्र गुरव, सुरेंद्र महाडिक, टेरेस फर्नांडिस, विनायक केतकर, सुनील राणे, शैलेश थळी, श्रीकांत शिंदे, सचिन पाटील आदींनी पंचाची भूमिका पार पाडली.यावेळी रायगड जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेचे सेक्रेटरी संतोष साखरे,उपाध्यक्ष जितेंद्र गुरव, उपाध्यक्ष श्रीकांत शिंदे उपस्थित होते.गेली 25 वर्षांपासून विविध ठिकाणी स्पर्धा भरवून ते यशस्वी करण्यासाठी पावर हाऊस जिम आनंदनगर उरणचे जितेंद्र गुरव, टेरेस फर्नांडिस विशेष मेहनत घेत आहेत.द्रोणागिरी युवा महोत्सव मध्येही त्यांनी विशेष मेहनत घेतली.