खारघर : नवी मुंबई महानगरपालिका पालिका परिवहन सेनेने खारघर ते पनवेल या मार्गावर एनएमएमटी रिंग रूट बस सेवा सुरु करावी अशी मागणी शेकापचे खारघर शहर चिटणीस अशोक मोरे यांनी नवी मुंबई परिवहन विभागाकडे केली आहे.
खारघर मध्ये वास्तव्य करणाऱ्या खारघर वासियांना शालेय विधार्थानाचा लागणारे जातीचे दाखले, उत्प्रन्न दाखला तसेच मतदार नोंदणी, रेशन कार्ड अश्या विविध कामासाठी पनवेल तहसील कार्यलयात जावे लागते. तसेच पनवेल,कळंबोली, कामोठे परिसरातील मुले खारघर परिसरातील विविध शाळा ,महाविद्यलयात शिक्षण घेत आहे. त्यामुळे प्रवाशांना सायन पनवेल महामार्गावर असलेल्या खारघर हिरानंदानी आणि कोपरा गाव येथील बस थांबा गाठण्यासाठी पन्नास रुपये रिक्षा भाडे खर्च करावे लागत आहे. तसेच खारघर रेल्वे स्थानक हे शहराच्या एका बाजूला आहे. त्यामुळे प्रवाशाना शाळा महाविद्यालयांत जाण्यासाठी रिक्षाने प्रवास करावे लागते. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेने खारघर मधील जलवायू विहार, रघुनाथ विहार केंद्रीय विहार आणि सेक्टर बारा नवरंग आणि खारघर हिरानंदानी मार्गे रिंग रूट बस सेवा सुरु करावी असे पत्र अशोक मोरे यांनी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवा व्यवस्थापकांना दिले आहे.