नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वतीने स्वच्छता दूत यांच्यासाठी मोफत धनुर्वात इंजेक्शन  

खारघर:  खारघर मधील प्रभागातील स्वच्छता राखण्यासाठी नेहमी कार्यतत्पर असलेल्या स्वच्छता दूत यांना नगरसेविका नेत्रा किरण पाटील आणि डॉ रामकृष्ण क्षार यांच्या सुमनकांता चाईल्ड व ऍडल्ट किलीनिक यांच्या वतीने स्वच्छता दूत याना मोफत धनुर्वात (टी टी ) इंजेक्शन देण्यात आले. 

     कोरोना काळात अहोरात्र काम करणाऱ्या स्वच्छता दूत हे खारघर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. आपल्या स्वतःची काळजी न करता शहरातील राहिवाश्यांच्या आरोग्याची काळजी घेत शहर स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या स्वच्छता दूतांची  शरीर स्वास्थ्य चांगले रहावे  ही  लोकप्रतिनिधीची  जबाबदारी असल्याने नेत्रा पाटील यांनी डॉ रामकृष्ण क्षार यांच्या सहकार्याने  धनुर्वात इंजेक्शन आज देण्यात आले यावेळी पनवेल महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक अतुल मोहोकर,पर्यवेक्षक जितेंद्र जाधव व साई गणेश एंटरप्राइजेसचे सुपरवायझर विश्वास पाटील व गणेश भोईर उपस्थित होते.यावेळी 80 स्वच्छता दूत यांना इंजेक्शन देण्यात आले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर ते पनवेल रिंग रूट बससेवा सुरु करण्याची शेकापची मागणी