महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
नवी मुंबईत हेरिटेज वृक्षांची गणना होणार
नवी मुंबई-: आजवर ऐतिहासिक इमारती ,किल्ले ,पुरातन वास्तू यांना हेरिटेज दर्जा देण्यात आला आहे. मात्र आता झाडांना देखील हेरिटेज वृक्षांचा दर्जा प्राप्त होणार असून त्यासाठी ५० वर्ष वरील झाडांना ग्राह्य धरले जाणार आहे. त्याकरिता आता स्थानिक प्राधिककारणांना अशा झाडांची माहिती राज्यशासनाला द्यावी लागणार आहे.आणि तसा आदेश प्रारीत झाल्याने नवी मुंबई शहरात देखील अशा वृक्षांची मोजणी करून त्यांचे जतन केले जाणार आहे.
राज्यात वृक्षतोडीचे वाढते प्रमाण पाहता वृक्ष संवर्धनासाठी शासनाने कडक पाऊले उचलण्यास सुरूवात केली असून झाडांची जनगनणा, वयोमान मोजने सोबत ५० झाड वर्ष वरील झाडसना हेरिटेज वृक्षांचा दर्जा देण्यात येणार आहे.आणि त्याबाबतचे आदेश राज्य शासनाने काढले आहे. त्यामुळे आता राज्यातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य, स्थानिकन प्राधिकरणाना आपल्या हद्दीतील वृक्ष गणना करुन त्याच्या अहवाल शासनास सादर करावा लगात आहे.
तर प्रकल्पांना अडथळा ठरणाऱ्या २०० झाडांच्या वर झाडे असतील तर ती झाडे तोडणे स्थलांतर करणे बाबत राज्य वृक्ष समितीची परवानगी अनिवार्य आहे. त्यामुळे आता स्थानिक पातळी वर २०० च्या वर झाडे तोडणे ,स्थलांतर बाबत बंधणे आली आहेत. त्यामुळे नवी मुंबई शहरात देखिल वृक्षांच्या गणने सोबत हेरिटेज वृक्षांची स्वतंत्र गणना होणार अशी माहिती अधिकाऱ्यांकडुन मिळाली आहे.तर नवी मुंबईत याआधी २०१४ साली झाडांची जनगणना करण्यात आली होती.मात्र आता करण्यात येणाऱ्या जनगणनेनुसार झाडांच्या आकडेवारी सहित त्यांचे वयोमान देखील मोजावे लागणार आहे.आणि जर कुणास अडथळा ठरत असलेले झाड तोडण्याची अधिकृत परवाणगी दिली तर त्या झाडाच्या वयोमाना एवढीच झाडे लावणे क्रमप्राप्त असेल.