सहावे इंद्रिय

पंचेंद्रियाची संवेदना आपल्याला माहिती आहेच; पण एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट नकोशी वाटली हवेशी वाटली तर ती म्हणते की माझं सहावं इंद्रिय मला हे सांगत आहे. शंकराचा जसा तीसरा डोळा असं माणसाचं हे सहावा इंद्रिय असतं. मात्र खूप आराधना उपासना केल्याशिवाय हे इंद्रिय जागृत होत नसतं शिवाय हे जागृती दीर्घकाळ पण टिकणे अवघड असतं.

 शब्दांची चव आणि आवाजाचा रंग वेगळा असतो. भरकटुन व चुकीचे काहीतरी मी गोंधळून लिहीते असं समजू नका. जिभेवर चव रेंगाळवण्यात हक्क आणि ती ताकद शब्दांमध्ये असते. याला आपण मानसिकदृष्ट्या भास असेदेखील म्हणू शकतो. पण एखादी वाईट गोष्टीची बातमी असली की आपलं तोंड कडू होतं. याला आपण आपल्या मेंदूचीच एक भ्रमदेखील म्हणू शकतो. दोन सेपरेट प्रकारे आपण मेंदूत पंचंद्रियांची संवेदना जाणून घेत असतो. एक प्रत्यक्ष आणि दुसरी भावनिक अथवा काल्पनिक!

 उदाहरणार्थ रंग, वास, चव, स्पर्श, नाद या पाच संवेदना वेगळ्या वेगळ्या असल्या तरी ह्या एकत्रितपणे केंद्रित करुन आपण एखाद्या वस्तूकडे बघतो. एखादी जागा आपल्याला अजिबात आवडत नाही .त्याचं कारण त्यातली एकच संवेदनादेखील असू शकते किंवा एखादी जागा खूप आवडते. याला कारण त्यातली एखादी संवेदनादेखील असू शकते.

भौतिक किंवा इंद्रियजन्य संदेशांमध्ये यातला एखादा जरी संदेश आणि संवेदना चुकीची आली तर आपल्याला त्या बाबतीत नकोसेपण भरून राहतं. उदाहरणार्थ एखाद्या जागी विचित्र वास येत असेल, गॅस सिलेंडर लिक झाल्याचा वास येत असेल, तर आपल्याला तिथे क्षणभर थांबावंसं वाटत नाही. एखादी वाईट घटना समोर घडत असताना, आपण ते बघायचीसुद्धा हिम्मत करत नाही. कुणीतरी कुणाला मारतंय; आपण मध्ये पडू शकत नाही. आपण का त्यांना वाचवू शकत नाही किंवा काय ह्या गोष्टी खूप दूरच्या; पण आपल्याला तिथेच क्षणभर थांबावंसं वाटत नाही. आपलं सहावं इंद्रिय आपल्याला तिथून पळून जायची सूचना देते. सहावे इंद्रिय ही अंधश्रद्धा नाही; ती एक ऊर्जा आणि शक्ती असते. पंचेंद्रियांच्या अज्ञात आपण आयुष्यभर वावरत राहतो आणि बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणाहून पलायनदेखील करतो.

पण संत जे असतात ते तिथेदेखील टिकतात. तरलो तरलो, म्हणून ते त्या अशा परिस्थितीत तरुन जातात. या पंचेंद्रियाच्या पलीकडेही एक सहावं इंद्रिय असते जे संतांना असतं. ते सहावे इंद्रिय अतिंद्रिय शक्ती या नावाने ओळखलं जातं. ही अतिंंद्रिय शक्ती मानवाची ! पण जागृत झाली तरच माणूस जीवनात खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. - शुभांगी पासेबंद 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मिडिया ट्रायलमुळे यापुढे शाळांना शिक्षक,मुख्याध्यापक मिळणार नाहीत!