महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
यात्रा अनुभव शिदोरी : श्रीमहाकालेश्वर महादेव - उज्जैन
उज्जैन श्री ज्योतिर्लिंग महादेवाचीं अविस्मरणीय अनुभूती होती! प्राचीनत्तम प्रसिद्ध ‘शिप्रा नदीच्या' तटावर असलेलं महादेव मंदिर काळजात शिवतत्व ओतत गेलं होतं! महाद्वारातून प्रवेशित होतांना राजस्थानी गुलाबी दगडातील स्वागत कमानी नेत्रानंद देत राहिल्या! सोनेरी चकाकी असलेल्या श्रीगणेशाच्या विशाल मूर्तीचं दर्शन घेत एकेक पावलं श्रद्धास्थानाकडे ओढली जात होती! पुन्हा पुन्हा श्रीमहाकालेंश्वरास येतं राहावे! एकचित्त होत मन शांत करीत काही क्षण साक्षात हृदय अर्पण करीत राहावे, असं वाटत राहिलं!
२ ऑक्टोबर २०२५ विजया दशमी, दसऱ्याचा दिवस होता! सोनेरी दिवस होता! गुरुवारचा दिवस होता! महात्मा गांधी जयंती होती! आम्ही भारतातील सर्वात स्वच्छ, सुंदर शहर मध्यप्रदेशातील इंदूर (इंदौर) या शहरात होतो! भारतात स्वच्छतेचा पहिला क्रमांक मिळविलेलं शहर अतिशय स्वच्छ होतं! कुठेही कचरा दिसत नव्हता! खरंच डोळ्यातून स्वछता जाणवत होती! शहर नीट अन क्लीन दिसलं होतं! डोळे साक्षीदार होते! आम्ही भारतातील अतिशय सुंदर शहर, झाडांनी वेढलेल्या नैसर्गिक अन् शुद्ध प्राणवायुचा अनुभव देणाऱ्या शहरांत होतो! त्याच दिवशी २ ऑक्टोबरला इंदूरपासून अवघ्या ४८ किलोमीटर अंतरावर असलेल्या भारतातील १२ ज्योतिर्लिंगपैकी एक ‘उज्जैनच्या श्रीमहाकालेश्वर महादेवाचं' दर्शनासाठी गेलो होतो! रामायण, महाभारतात जिचा उल्लेख होत असतो अशा प्राचीन शिप्रा नदीच्या तिरावर असलेलं हेमाडपंथी श्रीमहाकालेंश्वर महादेव मंदिर मनचक्षुत खोल खोल जाऊन बसलं होतं!
दर्शन डोळ्यातून होत असतं! डोळे दुर्बीणसारखे असतात! महाभारतातील संजयसारखे असतात! कधीकधी सूर्यापलीकडचे देखील चित्रीकरण करीत असतात! सदर चित्रीकरण मनचक्षुद्वारे हृदयात उतरत जातं! हृदयाला भावलेलं जीवनानंद देऊन जात असतं! आम्ही श्रीमहाकालेंश्वराचं दर्शन सोनेरी दसऱ्याच्या दिवशी घेतलं होतं! देवाने अंतःकरणात उतरून सोनेरी दर्शन दिलं होतं! साक्षात जन्माचं सोनं झालं होतं! शुद्ध चोवीस कॅरेट दर्शन सोहळा पार पडला होता! हृदयी श्रद्धा उजेड घेत सार्थकतेचं ईश्वरी सानिध्य अनुभवलं होतं! मी एक अस्पष्ट अणू श्रीमहाकालेश्वर महादेवाच्या अनादी अनंत परतत्वात विलीन होत होतो!
उज्जैन श्री ज्योतिर्लिंग महादेवाचीं अविस्मरणीय अनुभूती होती! प्राचीनत्तम प्रसिद्ध ‘शिप्रा नदीच्या' तटावर असलेलं महादेव मंदिर काळजात शिवतत्व ओतत गेलं होतं! महाद्वारातून प्रवेशित होतांना राजस्थानी गुलाबी दगडातील स्वागत कमानी नेत्रानंद देत राहिल्या! सोनेरी चकाकी असलेल्या श्रीगणेशाच्या विशाल मूर्तीचं दर्शन घेत एकेक पावलं श्रद्धास्थानाकडे ओढली जात होती! संगमरवरी दगडातील वास्तुरूपी उंच उंच मंदिरं प्राचीन अर्थबोध करीत राहिला! नेत्र लोहचुंबक होत विविध देव देवतांच्या अतिशय सुबक मूर्ती श्रद्धा अर्थबोध करीत राहिल्या! त्याच्याकढे ओढत राहिल्या! मन ध्यानात गुंतत राहिलं! सदविचारांचा समुच्चय परिघाबाहेर विस्तारत राहिला! जन्मार्थ सांगत राहिला! साथ संगत करीत राहिला! अविष्कारस्वरूप शिप्रा नदीतील पवित्र श्रद्धजल शिंपण करीत डोळस करीत राहिलं! मन मनाचा शोध घेत राहिलं! श्रीमहाकालेश्वर महादेव जोतिश्वरूप होऊन सत्स्वरूपाची ओळख करीत राहिले!
महाकुंभ जेथे भरतो अशा शिवतत्वाचं श्रद्धापूर्वक दर्शन झालं!अनंत स्वरूपाचं दर्शन डोळ्यात मावत नव्हतं! हृदय दाटून आलं होतं! डोळे भरून आले होते! स्पष्ट दिसणार शिवतत्व डोळ्यात भिजवत राहिलो! जीवनातील थोडं पुण्य पदरी घेत श्रीमहाकालेंश्वर ज्योतिर्लिंग श्वासात बसवून उज्जैन सोडलं होतं!
२ ऑक्टोबर २०२५ सोनेरी दसऱ्याचा भक्तीआनंद हृदयात मावत नव्हता! सर्वव्यापी तरीही एक किरण स्वरूप अपूर्णतेची हुरहूर हृदयी घेऊन निघालो होतो! पुन्हा पुन्हा श्रीमहाकालेंश्वरास येतं राहावे! एकचित्त होत मन शांत करीत काही क्षण साक्षात हृदय अर्पण करीत राहावे, असं वाटत राहिलं! भविष्यात येणाऱ्या क्षणासाठी वाट पाहात राहावी असं ठरवत पुढील प्रवासाला निघालो. - नानाभाऊ माळी