महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
विजयादशमी : सीमोल्लंघन,शमीपूजन, अपराजितापूजन व शस्त्रपूजनही
दसरा हा सण सरस्वती पूजनाचा दिवस आहे. लहान मुलं पाटीवर सरस्वतीदेवीची प्रतिकात्मक चित्र काढून पूजा करतात. शिक्षण घेणारे विद्यार्थी अभ्यासाची वह्या, पुस्तकाची पूजा करतात. दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. नविन कामाची सुरवात या दिवशी करतात. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन व शस्त्र पूजन केले जाते.
आदिमाता, आदिशक्ती दुर्गादेवीने नऊ दिवस, नऊ अवतार घेऊन दुर्गासुराला मारले तेव्हा सर्व प्रजाजनांना, ऋषी,मूनीना अत्यानंद झाला.तेव्हा जय जय दुर्गा माता,चामुंडा माता, भवानीमाता,कालिमाता अशा नावांनी, अशा हाकांनी देवीचा मोठा जयजयकार केला. हे प्रचंड युद्ध घनदाट रानात झालं. नऊ दिवसाच्या अथक युद्धांनी देवीच्या अंगाची लाही लाही होत होती. तेथे रानात आजूबाजूला झेंडू आणि तिळ ही रानफुले फुलली होती. ऋषिमुनी रोज नविन नविन अशी रानफुलाची चढती माळ देवीसाठी बांधू लागले. अखंड नंदादीप तेवत ठेवले जाऊ लागले. संतप्त झालेल्या देवीच्या अंगाची आग कमी व्हावी म्हणून ऋषिमुनींनी तेथे उगवलेला हिरवागार आघाडा, दूर्वा आणि अन्य फुलांची लाखोली देवीला वाहिली, सप्तशतीचा पाठ ऋषिमुनींनी सुरू केले. अनेक प्रकारचे प्रसाद देवीसाठी नेवैद्य म्हणून दिले. दुर्गादेवी शांत शांत झाली.
अश्विन वद्य प्रतिपदेपासून देवी युद्ध करून संतप्त झालेली देवी दशमीला महिषासुराचा वध करून शांत झाली. दहाव्या दिवशी म्हणजे अश्विन शुद्ध दशमीला दुर्गासुरावर म्हणजेच महिषासुरावर विजय मिळवला. म्हणून दशमीला विजयोत्सव साजरा करण्यात येतो. ती ही विजयादशमी ! म्हणून ‘विजयादशमी' विजयोत्सव सण म्हणून साजरा करतात. कुठल्याही क्षेत्रात विजय संपादन करीत असताना काही साधनांचे म्हणजे काही वस्तुंचा वापर केला जातो. देवीचे वाहन वाघ, सिंह, बैल, अश्व यांची पुजा करतात. तसेच देवीची विविध शस्त्रे शंख, धनुष्य, बाण, तलवार, भाला, त्रिशूल, ढाल, गदा अशी विविथ अवजारे,आयूधं लागतात. अशा साधनांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूजा केली जाते. तो दिवस म्हणून ‘विजयादशमी'. यालाच दसरा म्हणतात. ऐतिहासिक काळात राजे स्वारीला निघत तेव्हा परमूलखाची लुटून आणलेली संपत्ती धनरूपी आणत ही संपत्ती सुवर्णाची असे. ते सोने देवाला वाहत. त्याचे प्रतिक म्हणुन ‘आपट्याची पाने' सोन्याची पाने कल्पून ती देवीला अर्पण करतात. एकमेकांना देतात घेतात.दसऱ्याला शमीची पूजा करतात कारण शमी पापांचे क्षालन करते.
दसरा हा सण सरस्वती पूजनाचा दिवस आहे. लहान मुलं पाटीवर सरस्वतीदेवीची प्रतिकात्मक चित्र काढून पूजा करतात. शिक्षण घेणारे विद्यार्थी अभ्यासाची वह्या, पुस्तकाची पूजा करतात. दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. नविन कामाची सुरवात या दिवशी करतात.या दिवशी सीमोल्लंघन,शमीपूजन, अपराजितापूजन व शस्त्र पूजन केले जाते. भारतात विविध प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने दसरा साजरा केला जातो. दक्षिण आणि पूर्वेकडे दुर्गादेवीची पूजा करतात विजय मिळवून धर्माचे रक्षण केले म्हणून दसरा सण साजरा करतात तर उत्तर मध्य आणि पश्चिम राज्यात रामाने रावणावर केलेल्या विजयाचा सण म्हणून रामलीला नाट्य करत दसरा सण साजरा करतात.
दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा. - सौ.पूर्णिमा आनंद शेंडे