महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
चांगल्या माणसांना शोधण्यापेक्षा आपणच चांगले व्हावे
देवाला प्रसन्न करण्यासाठी आपण देवाची स्तुती/प्रशंसा करतो. मग आपल्या जवळच्या व्यक्तिबददल चार चांगले शब्द बोलायला उशीर का लावतो? आपल्या मनातले बोलून दाखवले नाही तर समोरच्याला कसं कळेल ? प्रशंसा योग्य वेळी योग्य तेवढी करणे गरजेचे असते. कौतुकाचे दोन शब्द आपल्यातील मैत्रीचे नातं घट्ट करतात. समोरच्यालाही प्रोत्साहन मिळतं. त्यांचाही आत्मविश्वास वाढतो.
आज अजय अनिताला श्रीरंग जोशीकडे नाश्त्याला बोलविले होते. श्रीरंग व अजय एकाच कंपनीत काम करतात. दोघे चांगले मित्र आहेत. अनिता आणि श्रेयापण बऱ्याच वेळा भेटल्या होत्या, पण घरी येणजाणं तसं तेवढं झालं नव्हतं. मैत्रीत एक पूढचे पाऊल घेऊन श्रीरंगने दोघांना घरी बोलविले आहे. परिवारातील इतर सदस्यांशी ओळख वाढली तर मैत्री वाढते, असा उद्देश असावा. नातेवाईक असतातच. हम उम्र मित्रपण पाहिजेतच. मैत्रीत संकोच नसतो. आरामात बोलता येतं. या वयातील काही प्रश्न मित्रांच्या संगतीत सहज सुटतात. काही सल्ले तर मित्रच छान देतात.
म्हणतात ना Deep conversations with right people are pricelessI. म्हणून मोजकेच; पण जीवाभावाचे चांगले मित्र जपायचे असतात.
अजय, श्रीरंग दोघेही एकटेच. भाऊ बहिण नाही. म्हणूनही मित्र जास्त जवळचे आणि महत्वाचे. घरी येताच अनिताच्या लक्षात आलं, की श्रीरंग-श्रेयाचे घर छान आहे. खूप काही महागडं सामान नसलं, तरी घर व्यवस्थित आहे. घराची सजावट बघता श्रेयाचा व्यवस्थितपणा, स्वच्छता, एकंदर तिची कलात्मकता लक्षात येते. नवीन आधुनिक विचारांनुसार घरातील न्न्ग्ंो छान प्रसन्न ज्देग्ूग्न आहे.
It seems she is a good home maker.
पंजाबी ड्रेसमध्ये श्रेया छान दिसत होती. दोघांनी अजय अनिताचे मनःपूर्वक स्वागत केले.
Wow !! अरे व्वा !!! मस्तच !!! असं सहज कोणीही घर बघून म्हणेल. अनिताचे पण असेच ग्स्जीोेग्दह झाले. तिनेही हे सर्व म्हंटलेच. फक्त मनातल्या मनात.
नाश्तापण छान होता. एक तर काळ वेळ, वयानुसार मेन्यू ठरविणे महत्वाचे असतेच नंतर पदार्थांचे Presentation सजावट हे ही महत्वाचे. त्यामुळे पदार्थांची value वाढते. ते जास्त tempting दिसतात, बघताच खावेसे वाटतात.
आलू पराठे बरोबर दही, घरचे लोणी, चटणी,सॉस तर होताच. बरोबर ढोकळा, सॅन्डविच, एका बाउलमध्ये फळे चिरून ठेवली होती. केशर घालून केलेला शीरा होता. नंतर कोल्ड कॉफी किंवा चहा कॉफीचे दज्ूग्दह होतेच.
एकंदर सर्व व्यवस्थित systematic होतं. पदार्थ छान चविष्ट झाले होते. कुठेही गडबड गोंधळ नव्हता. अजय अगदी खुशीत होता. त्याने दादही दिली. श्रीरंग श्रेया दोघांचे coordination छान होते.
घरी परत आल्यावर अनिता आईंना सर्व सांगत होती. कौतुकही करत होती. श्रेयाने दिलेले Gift आईंना दाखवून म्हणाली आई!! श्रेयाकडून खूप शिकण्यासारखे आहे. मला आवडली ती. अजय हसला आणि म्हणाला, अगं, पण तेथे तू याबद्दल काहीच बोलली नाही. एकदाही एकाही गोष्टीची, पदार्थांचे कौतुक केले नाही.
अनिता म्हणाली मला नाही करता येत तुझ्यासारखं.
आई म्हणाल्या, अग अनिता, कौतुक करावे. आपल्या मनातले बोलून दाखवले नाही तर समोरच्याला कसं कळेल? अगं, आपण देवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पुजा, प्रशंसा, स्तुतीच तर करतो ना. मग एखाद्या व्यक्तिबद्दल चार चांगले शब्द बोलायला उशीर का करतो?
फक्त प्रशंसा योग्य वेळी योग्य तेवढी करणे गरजेचे असते. कौतुकाचे दोन शब्द आपल्यातील मैत्रीचे नातं घट्ट करतात. समोरच्यालाही प्रोत्साहन मिळत. त्यांचाही आत्मविश्वास वाढतो.
बोलायचे वरदान फक्त माणसालाच मिळाले आहे ना,मग बोलावं.
अगं; तुला ही एक चांगली मैत्रीण मिळेल. तुम्ही सर्व एकाच वयाचे तर आहात.
इतक्यातच नवरात्रात आपल्या घरी भजन झाले. तू म्हंटलेल्या भजनाचे सर्वांनी कौतुक केले. तेंव्हा मला तर खूप आनंद झाला. माझी कॉलर वर झाली. तुलाही नक्कीच चांगले वाटले असेल
आई पूढे म्हणाल्या..अगं !! अनिता. दाद द्यावी. कधी बोलून.. कधी पाठीवर हात ठेवून. समोरच्याला तर चांगलं वाटतंच, आपल्याला ही आनंद मिळतो. उगीच गैरसमज होत नाही.
काही हरकत नाही. आज श्रेयाला फोन कर. धन्यवाद म्हण, तेंव्हाच थोडं कौतुकही कर. आपल्या स्वभावात थोडा सकारात्मक बदल करत रहावा. आपलंच व्यक्तिमत्त्व खुलतं, बहरतं. आपलं स्वतःचेच Standard वाढतं. जिममध्ये शारीरिक आरोग्याची आपण काळजी घेतो, मानसिक आरोग्याची काळजी घेणं पण आवश्यक आहे. त्याकरिता आपले विचार, वागणं, संगत सर्वच महत्वाचे. त्याकरिता आपण काही सूत्र पाळावी. स्वतःचे काही नियम तयार करावेत. वेळोवेळी त्यात भर घालावी. देवाने आपल्याला जे आयुष्य दिले आहे , त्याला हीऱ्यासारख चमकवायची पूढची जबाबदारी आपलीच असते. त्यासाठी साधा सरळ सोपा उपाय म्हणजे लहान सहान चांगल्या गोष्टी आत्मसात करायच्या. स्वतःचे परिक्षण करत रहायचे व बदलायचं.
अनिताला आईंचे म्हणणे पटले.
आई म्हणाल्या, जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका. स्वतः चांगले व्हा. कोणी तरी तुम्हालाच शोधत येईल. म्हणतात ना...खूबसूरती इस में नहीं है की हम कैसे दिखते है, बल्की खूबसूरती इसमें हैं की औराेंके प्रति हम कैसा व्यवहार करतें हैं। - संध्या बेडेकर