महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा
स्वातंत्र्य दिन हा खऱ्या अर्थानं आनंदोत्सव असतो. एक एक प्रगतीचे पाऊल पुढे टाकत आपण सर्वांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा व्ोÀल्यानंतर आता भारत देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७८ वर्षे पूर्ण होताहेत, ही भारतीय जनमानसाला सुखद दिलासा देणारी गोष्ट आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून पारतंत्र्याचा काळोख नाहिसा होऊन, भारत मातेच्या उदरातून स्वराज्याचा उषःकाल उदयास आला .खरं तर, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी शेकडो क्रांतीवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिलं. त्यांच्या गोड स्मृती आमच्या हृदयात चिरकाल तेवत राहतील.
गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य लढ्यात सर्वधर्मियांना सामावून घेऊन खिलाफत चळवळ, असहकार चळवळ, मिठाचा सत्याग्रह, करेंगे या मरेंगे, भारत छोडो ही जनआंदोलने छेडण्यात आली. त्यातूनच पुढे १५ ऑगस्ट हा सुवर्ण दिवस प्रकाशमान झाला.त्यामुळे आज प्रत्येक भारतीय स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी भारतीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हर घर तिरंगा अभियान देशभर राबविण्यात आला आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे देशाप्रती राष्ट्रप्रेम,देशाभिमान,सार्वभौमत्व,एकात्मता, अखंडता, राष्ट्रीय तिरंगा झेंड्याचे पावित्र्य अन् महत्व हे सर्व भारतीयांच्या मनात खोलवर रुजविणे होय.
या धर्तीवरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घरो घरी तिरंगा अभियानाच्या माध्यमातून सर्वधर्मीय नागरिकांनी/विद्यार्थ्यांनी आपापल्या घरांवर तिरंगा ध्वज फडकवावा अन ्ध्वजा सोबतचा सेल्फी harghartiranga.com या वेबसाईटवर अपलोड करून या अभियानात मोठ्या संख्येनं सामील व्हावं, असं आवाहन केलं आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली कस्तुरबा गांधी, मादाम कामा, मोतीलाल नेहरू, डॉ.राजेंद्र प्रसाद, विजयालक्ष्मी पंडित, गोपाळ कृष्ण गोखले, जवाहरलाल नेहरू, कमला नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, सरोजनी नायडू,साने गुरुजी, वल्लभभाई पटेल, जयप्रकाश नारायण, विनोबा भावे, अरूणा असफअली, यशवंतराव चव्हाण, बाबू गेनू, ठाण्याचे दत्ताजी ताम्हणे, नंदुरबारचे बाल क्रांतिकारक शिरीषकुमार मेहता, पश्चिम खान्देशचे दादासाहेब रावल, दादुसिंग राजपूत, धनाजी नाना चौधरी, त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई चौधरी आदी असंख्य स्वातंत्र्यसेनानींनी अहिंसा व सत्याग्रहाच्या मार्गाने लढा देऊन ब्रिटिशांना भारत छोडो हा निर्वाणीचा इशारा दिला. जहालमतवादी लोकमान्य टिळक, क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस, बटूकेश्वर दत्त, लाला लजपतराय, वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतिवीर नाना पाटील, सेनापती बापट, बिरसा मुंडा, मदनलाल धिंग्रा, चाफेकर बंधू, अनंत कान्हेरे, उमाजी नाईक, ठाणे येथील कोळी समाजाचे मारुतीराव ठाणेकर आदी जहाल क्रांतीकारकांनी फिरंग्यांना जेरीस आणले. सरतेशेवटी इंग्रजांना भारत सोडून जावे लागले.या लढ्यात काहींना वीरमरण आलं, तर काहींनी स्वातंत्र्यासाठी मोलाचं योगदान दिलं. अशा महान क्रांतिकारकांना आम्हा मराठी भूमिपुत्रांकडून त्रिवार मानाचा मुजरा
आता स्वराज्य मिळाल्यावर त्याचं सुराज्य करण्यासाठी पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारकडून देशातील सर्वधर्मीय गोरगरीब, निर्धन, निराधार, आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटक, अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, कामगार यांचे आवास, शिक्षण, रोजगार, आरोग्य हे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी ठोस योजना राबविल्या जात आहेत. संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन त्यांना कर्ज माफ करणं, कृषीपंपाचे वीज बिल माफ करणे अन ्कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जलदगतीने पावलं उचलली जात आहेत. मोदीजींच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. याशिवाय प्रधानमंत्री मातृवंदना योजना, प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजना,प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री किसान मानधन योजना, मेक इन इंडिया, स्टार्ट अप, स्टँड अप इंडिया, जनधन योजना, स्वच्छ भारत योजना अशा विविध लोकोपयोगी योजना सामान्य माणूस हा केंद्र बिंदू मानून आतापर्यंत राबविण्यात आल्या आहेत.
भारताची अंतराळातील शक्ती वाढविण्याच्या उद्देशाने चांद्रयान-२ ही महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम मोदीसाहेबांनी यशस्वी करून दाखवल्याने अशी व्यापक क्षमता असलेला भारत हा जगातील चौथ्या देश गणला गेला आहे. शेकडो वर्षांपासून मुस्लिम महिला ह्या तिहेरी तलाक या जाचक कुप्रथेमुळे दुर्लाक्षित-उपेक्षित जीवन जगत होत्या. त्यांच्या संरक्षणार्थ मोदींनी पार्लमेंटच्या माध्यमातून तिहेरी तलाक बंदी कायदा देशात लागू केला. जम्मू-काश्मीरसंबंधीचे राज्यघटनेतील ३७० कलम रद्दबातल करून त्याचा स्वतंत्र दर्जा काढून घेतल्याने, आता तेथे भारतातील कुठलीही व्यक्ती वा कंपनी उद्योगधंदा करू शकते. मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे जम्मू काश्मीरचा औद्योगिक विकासाला चालना मिळत असून, तेथील बेरोजगार तरुणांच्या हातांना काम मिळू लागलं आहे. त्याची परिणती म्हणजे या राज्याच्या आर्थिक,औद्योगिक व पर्यटन विकासाला गती प्राप्त होऊन राज्याची आर्थिक स्थिती मजबूत होत आहे. याशिवाय ३५ अ कलम रद्द करून जम्मू काश्मीर आणि लडाख हे वेगवेगळे दोन केंद्रशासित प्रदेश नावरूपाला आले आहेत. याचे श्रेय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी व गृहमंत्री मा.अमितजी शहा यांच्या मुसद्देगिरीला जातं. पहलगाम तथा पाकिस्तान क्षेत्रात ऑपरेशन सिन्दुर व ऑपरेशन महादेव ह्या लष्करी कारवाया करून आतंकवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले, वास्तवात ही भारतीय सैनिकांच्या शौर्याची नांदी असून आझाद हिंदुस्थानची ताकद आहे.
मोदीजींच्या प्रभावशाली व पारदर्शक राज्यकारभारामुळे जगातील महासत्तादेखील भारताशी द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करण्यात उत्सुक होताहेत. त्याची परिणती म्हणजे परकीय गुंतवणुकीत वेगाने वृद्धी होत आहे. अणू चाचण्या, शस्त्र निर्मिती,राष्ट्रीय महामार्गांची व्याप्ती वाढविणे, रेल्वे सोयी-सुविधांचे बळकटीकरण, स्वदेशी बनावटीची संरक्षण सामग्रीच्या निर्मितीला प्राधान्य, डिजिटल कनेक्टिव्हिटी, डिजिटल ट्रान्सफॉर्ममेशन या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. अर्थातच विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग, दळणवळण, स्वदेशी युद्धसामग्री निर्मिती, अंतराळ, कृषी विकास यावर विशेष भर देऊन सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या ब्रीदानुसार देशाला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आणत, मोदीजींनी भारताला विकसित देशांच्या पंगतीत आणून बसविलं आहे.न भूतो न भविष्यती असा सर्वांगिण विकास करून मोदीजींनी देशाचा कायापालट करून दाखविला. भारताला वैश्विक स्तरावर १० स्थानावरून ५ स्थानावर आणले.
क्रांतिकारकांच्या बलिदानानं मिळविलेल्या स्वराज्याचं रूपांतर सुराज्यात करण्यात मोदीजींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने दमदार आगेकूच केली आहे. यासाठी त्यांचे मनस्वी अभिनंदन अन् पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! समस्त भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो! वंदे मातराम! भारत माता की जय! जय हिंद! जय महाराष्ट्र! - रणवीरसिंह राजपूत, गवर्नमेंट मिडिया-महाराष्ट्र शासन