सहजीवनात समजून घेणारी व्यक्ती मिळणे अतिमहत्वाचे

ज्या घरच्या नवरा बायकोला  सासरी व माहेरी एकमेकांचा मान ठेवता येतो. आपल्या घरच्या कोणत्या गोष्टी बाहेर च्या लोकांना सांगायच्या व कोणत्या नाही हे कळतं. त्या घरात अर्धे प्रश्न उद्‌भवतच नाही. सगळ्यांना सगळंच सांगायचे नसते. सगळेच आपले नसतात. नवरा बायकोने सावध असणं गरजेचे आहे. सहजीवन समाधानाने जगण्यासाठी एकमेकांना सांभाळून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच म्हणतात ना, नवरा बायको एकमेकांचे पूरक असतात; असावेत.

 आमचे ताई भाऊजी म्हणजे एक perfect couple. Made for each other.  दिसण्यात, रंगरूपाने म्हणण्यापेक्षा, एकमेकांना  छान समजून घेतात. म्हणजे आजच्या भाषेत त्या दोघांची 'म्पस्ग्ेूीब्' छान जमते असं म्हणता येईल. म्हणूनच कोणतीही 'situation' दोघे मिळून छान सांभाळतात. मुख्य म्हणजे दोघे एकमेकांचे शांतपणे ऐकतात. एकमेकांचा मान ठेवतात.  सर्वांचा विचार करून डिसिजन घेतात.

म्हंटलं तर दोघेही काही उच्चशिक्षित, खूप श्रीमंत असे नाही. अगदी मिडिल क्लास परिवार. कपडे ,वस्तू जरी 'branded'   वापरत नसले तरी विचार मात्र 'backward' असतात. प्रत्येकाच्या गुणांचा मान ठेवतात, व्यक्ती स्वातंत्र्य आहे. एक छान मध्यमवर्गीय आनंदी परिवार.

बरोबर आहे,
"Happiness does not depend on what you have or who you are, It suerely relies on what you think.”

त्यांच्या सुखी संसाराचा, त्यांच्या लोकप्रियतेचे कारण, मग ते नातेवाईकांमधे असो, नाहीतर त्यांना ओळखणाऱ्यांमधे असो ,फक्त एकच आहे, ते म्हणजे त्यांचे वागणे, बोलणे. दुसऱ्यांचाही मान ठेवणे, गरजूंना आधार देणे, कोणाच्याही घरातील फक्त चांगल्याच गोष्टी बघणे. खूप गोड बोलत नसतील, तरी स्पष्ट पण मृदू शब्दात आपल मत मांडण जमतं त्यांना. कारण  दुसऱ्यांचाही  मनाचा विचार करणं जमतं त्यांना.

     आपल्या घरचे प्रश्न शांतपणे सर्वांचा विचार करून सोडविणे. दुसऱ्यांच्या घरात मग ते भावाचे असो, नाहीतर दीराचे किंवा शेजारच्या घरात लुडबुड करायची नाही. विचारल्याशिवाय सल्ले द्यायचे नाही. आपल्या घरच्या गोष्टी बाहेर सांगायच्या नाही. मुद्दामहुन दुसऱ्यांच्या घरातील नाजूक गोष्टींची चर्चा त्यांच्या समोर किंवा मागे करायची नाही. असं साधं, सोपं, सरळ गणित व नियम  आहेत ताई भाऊजींचे. त्यामुळे कधीच वादात नसतात ते दोघे.

     तस बघीतले तर असाच विचार प्रत्येकाने करायला हवा, हे कळत सर्वांना, पण तसं वागणं जमतंच असं नाही. काही जण खूप सल्ले देतात. तुम्ही काय करा, काय करू नका, असं करा, तसं करू नका, हे करायलाच पाहिजे, ते का करता? अजिबात बरोबर नाही ते. तुम्ही येथेच चूकताय. मग तो डॉक्टरी सल्ला असो, व्यायामाच्या बाबतीत असो,नाही तर साधी बटाट्याची भाजी करणे असो.

     आजपर्यंत आईसारखी मुलगी बघीतली नाही व तिची मुलगी पण वेगळीच असते.  प्रत्येक जण वेगळा विचार करतो.

     प्रत्येक माणूस वेगळा
     विचारसरणी वेगळी
     मनुष्य जन्मा तुझी
    कहाणीच आगळीवेगळी

     अरे देवा!!  मग काय गरज आहे हे  सर्व बोलायची. प्रत्येकाचा स्वभाव, क्षमता, दृष्टिकोन, अनुभव, सवयी त्यांच्या अनुरूप ते ठरवतील ना. सल्ला नक्की द्या, पण विचारला तरच.  

     आणि तुम्हाला प्रत्त्येक क्षेत्रातील सर्व कळत,असे सर्टिफिकेट तुम्हाला कुठुन मिळाले आहे का ? आणि दुसऱ्याला मार्क्स द्यायला तुम्ही पर्फेवट टेन आहात का ?

     ताई नेहमी म्हणते, ज्या घरच्या नवरा बायकोला  सासरी व माहेरी एकमेकांचा मान ठेवता येतो. आपल्या घरच्या कोणत्या गोष्टी बाहेर या लोकांना सांगायच्या व कोणत्या नाही हे कळतं. त्या घरात अर्धे प्रश्न उद्‌भवतच नाही. सगळ्यांना सगळंच सांगायचे नसते. सगळेच आपले नसतात.

     ताई नेहमी सांगते मी अनुभवाने शहाणी झाली आहे. माझी  कमी उंची व सावळा रंग.  यावर मी खूप टीकास्त्र झेलले आहेत . माझ्या जाडीवर लोकांचे बारीक लक्ष असायचे.
    सुरवातीला बरेच वेळा, मला हा रंग चांगला दिसत नाही. मला स्वयंपाक येत नाही, तुला वजन कमी  करायची खूप गरज आहे अशा अनेक गोष्टींची चर्चा माझ्या नवऱ्यासमोर होत असे.

    खरं तर  आमचं लग्न ueive arrange marriage होते. लग्नाआधी सर्व गोष्टी बघूनच होकार दिलेला असतो ना, मग त्याची चर्चा नंतर करायची गरजच काय ?

    अशी चर्चा वरचेवर झाली, तर त्याकडे लक्ष जाऊन एखादा मानसिकदृष्ट्या कमजोर व्यक्ती त्यावर विचार करतो. सारखं तेच ते ऐकून ती गोष्ट त्याला पटू लागते. हळूहळू विचार, वागणं बदलतं आणि येथेच वादाला सुरुवात होते. दुरावा निर्माण होतो.

परंतु आमच्या बाबतीत, आम्ही दोघांनी एकमेकांना साथ दिली. आमचे प्रश्न आम्ही दोघांनी मिळून सोडविले. त्यामुळे दुसऱ्यांना माझ्या घरात जास्त लुडबुड करणे जमले  नाही. याचे कारण आम्ही दोघांनी एकमेकांचे हात घट्ट धरले होते. दोघे एकमेकांना साथ देत होतो. मानसिकदृष्ट्या मजबूत होतो. जर दोघांपैकी एक जण पण घाबरट असता, मनाने कमजोर असता, तर बाहेरच्यांचे फावले असते. म्हणतात ना,

    "मन हळवं असावं पण दुबळं नाही.”

    एकदा का मनात एकमेकांबद्दल असे विचार येणे सुरू झाले की मग अनेक पूढच्या गोष्टी सहज घडत जातात  दोघांमधे थोडी नाराजी येते, वाद होतात. न्युनगंड निर्माण होतो. ते बरोबर नाही. त्यामुळे नवरा बायकोने सावध असणं गरजेचे आहे. सहजीवन समाधानाने जगण्यासाठी एकमेकांना सांभाळून घेणे आवश्यक आहे.

    म्हणूनच  म्हणतात ना, ”नवरा बायको एकमेकांचे पूरक असतात”.

    "जो जसा आहे तसाच व्यक्त झाला तर आतल्या आत श्वास गुदमरणार नाही"

Be yourself

Life is to experess yourself not to impress others.

    छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले. एकमेकांची  काळजी घेतली, आपापल्या मर्यादा सांभाळल्या, विश्वास ठेवला. की हेच प्रेम आपल  अभेद्य कवच' बनतंं व संसारात येणाऱ्या अनेक अडचणींवर सहज मात करता येते.

    म्हणतात ना "एक परवाह ही हैं जो बताती हैं  कि ख्याल कितना है व रना कोई तराजू नहीं होता रिश्तों में ।”

तसेच माणसं ओळखता आली पाहिजेत. कोणाचे किती ऐकायचे, किती मनावर घ्यायच। कोणाला किती महत्व द्यायचे  हेही ठरवता आले पाहिजे.

आपल्या घरचा ‘बॉस' आपणच असाव. मी कोणाचे कधी ऐकलेच नाही, असं नाही. पण आम्हाला जे पटले तेच मी केले.  

    नवरा बायको एकमेकांच्या पाठीशी खंबीर पणे  उभे राहिले,  आपल्या आयुष्याची किल्ली आपल्या हातात ठेवली, तर आयुष्य  यशस्वी  होईलच म्हणून समजा व सुख म्हणजे नक्की काय  तेही  समजतं व आंनदाने समाधानाने आयुष्यभर  उपभोगता येत .   दुसऱ्यांसमोर  आपल्या माणसांने  केलेला अपमान  कोणालाच सहन होत नाही.

  "लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असतं..आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा व नीती साफ असावी लागते.”

    ताई नेहमी म्हणते, "आयुष्यात कधी कधी असं वाटतं काही माणसे आधी भेटली असती तर बर झालं असतं आणि काही भेटली नसतीच तर बर झालं असतं.”

  काही लोक मी खूप हुशार असल्याचा आव नेहमीच आणतात. त्यांचे त्यांच्याबद्दलचे ते मत असावे यावर माझे काहीच म्हणणे नाही. पण समोरचा बुध्दु आहे हे  का समजावं ?

   इतरांबद्दल यथायोग्य आदरभाव असावा, मान द्यावा.पण खूप झुकायची गरज नसते. आपला मान आपणच ठेवला नाही, तर मग दुसरे मान देणार नाही हे नक्की समजा.

    लग्नापूर्वी दोघांनी एकमेकांकडून हेच आश्वासन घेणे गरजेचे आहे की कोणत्याही परिस्थितीत एकमेकांच्या पाठीशी उभे राहू . एवढं एक आश्वासन कोणत्याही दुसऱ्या आश्वासनापेक्षा महत्वाचे आहे.

   "मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा समजून घेणारी व्यक्ती शोधा म्हणजे आयुष्य मनासारखं होईल.”

    एकमेकांच्या नजरेत चांगलं असणं महत्वाचं..दुसऱ्यांनी चांगलं म्हणावं हा आग्रहच नसावा.

   "आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवेल अशा व्यक्तीपेक्षा, कोणत्याही अडचणीत तुम्हाला एकटं सोडणार नाही. अशी व्यक्ती महत्वाची.”

    "रोशनी में तो आपको
    कोई न कोई मिल जायेगा,
     लेकिन
     आप उसकी तलाश करो, जो
     अंधेरे में आपका साथ ना छोडे़”
   - संध्या बेडेकर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 तिकिटांचा काळाबाजार त्यात कोकणकरांचे हाल !