महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
माथेरान केवळ पर्यटनस्थळ नाही...
सुविधांचा अभाव, शिक्षणाच्या मर्यादा, वैद्यकीय सेवांचा अपुरेपणा यामुळे तरुण पिढीला आता माथेरान नकोसा वाटतो आहे. इथं आयुष्य अधिक अवघड, संधींअभावी मय्राादित आहे. कौटुंबिक वाढ झाली, पण गावातलं आयुष्य तिथंच अडकलं. या सगळ्याला अजून एक गंभीर बाजू आहे.. माथेरानची भौगोलिक परिस्थिती. गावाची ओळख, गावपण, गावचा आत्मा हे सगळं हळूहळू धूसर होत चाललं आहे.
माझं घर माथेरानला होतं... आणि आहेही. पण आता तिथं कोणी राहत नाही! अशा वाक्यांचे सूर माथेरानच्या नगरानगरात दिवसेंदिवस अधिक गहिरं होत चालले आहेत. कधीकाळी नातेसंबंधांनी भरलेल्या या गावात आता फक्त आठवणी उरल्या आहेत, आणि त्या जपणारी मोजकी माणसं!
माथेरानच्या रब्बी विभागात एकेकाळी २९ गजबजलेली घरं होती. आज त्यापैकी १६ घरांमध्ये केवळ एकट्या व्यक्ती राहतात. ही केवळ आकड्यांची गोष्ट नाही, ही एकटेपणाची आणि सामाजिक विघटनाची कहाणी आहे. एकटं राहणं ही निवड नसून परिस्थितीने लादलेली अपरिहार्यता झाली आहे. मुलं शिक्षण, व्यवसाय आणि स्थैर्यासाठी बाहेर गेली आहेत. मुली लग्न होऊन दुसऱ्या गावात स्थायिक झाल्या आहेत. गावात उरलेत फक्त वृध्द पालक एकटे, सोबत फक्त आठवणी.
सुविधांचा अभाव, शिक्षणाच्या मर्यादा, वैद्यकीय सेवांचा अपुरेपणा यामुळे तरुण पिढीला आता माथेरान नकोसा वाटतो आहे. इथं आयुष्य अधिक अवघड, संधींअभावी मय्राादित आहे. कौटुंबिक वाढ झाली, पण गावातलं आयुष्य तिथंच अडकलं. या सगळ्याला अजून एक गंभीर बाजू आहे.. माथेरानची भौगोलिक परिस्थिती. वाहने बंद असलेला हिल स्टेशनचा हा परिसर, दळणवळणाचे अडथळे आणि रहिवाशी स्वरूपाचं गाव नसणं यामुळे बाहेरील समाजामध्ये माथेरानमधील तरुणांशी लग्न करायला नकार दिला जातो. हे एक सामाजिक कलंक बनत चाललं आहे, ज्याचा मोठा फटका स्थानिकांना बसतो आहे. या पार्श्वभूमीवर अनेक मूळ माथेरानकरांनी गाव सोडलं आहे. त्यांची जागा आता बाहेरील लोक घेत आहेत. परराज्यातून, शहरी भागांतून आलेली कुटुंबं व्यवसायासाठी, पर्यटनासाठी इथे राहत आहेत. गावाची ओळख, गावपण, गावचा आत्मा हे सगळं हळूहळू धूसर होत चाललं आहे. गावाला आता फक्त सण-उत्सवापुरतीच भेट दिली जाते. आयुष्याचं केंद्र दुसरीकडे सरकलंय. सामाजिक संवाद, शेजारीपण, आपुलकी या गोष्टी इतिहासजमा होऊ लागल्या आहेत. माथेरान केवळ पर्यटनस्थळ नाही. ही शेकडो पिढ्यांची माती आहे, जिथे प्रेम, आपुलकी, जगण्याची जाणीव होती. पण आज गाव आपल्याच माणसांच्या अनुपस्थितीत रिकामं वाटतं. माहेरू असलेला गाव आता स्मरणरंजनाचा विषय ठरत आहे.
-चंद्रकांत सुतार, माथेरान