वाढत्या वयाबरोबर हेही जमले पाहिजे

संयम आणि समज ठेवली तर सवयी बदलतात. सवयी बदलल्या तर आयुष्य बदलू शकतं. हटवादीपणा नको. मी असं करत होतो वगैरे आता नकोच. तो Past tense  होता. आपल्याला Present चा विचार करायची गरज आहे. जिवंत असेपर्यंत असे बदल करत रहावेच लागणार आहेत.

जिंदगी गुजरती है, इम्तिहानो के दौरसे, एक जख्म भरता नही, तो दुसरा तयार मिलता है।

 मागचा आठवडा खूप आनंदात गेला. तसंही आता घरची सर्व कार्य झाली आहेत.. आता ओळखीत असलेल्यांच्या घरी  कार्यक्रमाला जाणे, नवीन फॅशन, आधुनिक पद्धती बघणे, प्रत्येक गोष्ट करण्याची नवीन पद्धत, चमक-दमक, बघण्यात मजा येते. आनंद वाटतो. नवीन जनरेशन, आधुनिकीकरण, त्यांची पैसे खर्च करण्याची कुवत, हिम्मत बघून कौतुक आणि आश्चर्य दोन्ही वाटतं.

प्रत्येक  event memorable करण्याचा त्यांचा प्रयत्न, त्यांचे रिसर्च  वर्क जबरदस्त असतं. प्रत्येक कार्यक्रम एक event असतो..अगदी सर्व गोष्टीं होॅल घेऊन थाटामाटात संपन्न होतात. आमच्या जनरेशनचा mind set वेगळा आहे. चूक आहे असं म्हणता येणार नाही. कारण आयुष्याची पन्नास साठ वर्षे आम्ही जे बघीतलं जसं राहिलो त्यात, आमच्या विचारात अचानक  बदल करणं कसं शक्य आहे ? तरी आता बघून बघून बराच बदल झालाय, नाही असं नाही. तरीही पैशाचा हिशोब असतोच. होॅटेलमध्ये गेल्यावर मेन्यु बघताना उजवीकडे लक्ष जातंच. बरे असो,

    या आठवड्यात एक डोहाळजेवण, एक वाढदिवस आणि ताईच्या नवीन घराची वास्तूशांत असे तीन वेगवेगळे कार्यक्रम अटेंड केले. आमच्या ताईबाई खुश आहेत. बऱ्याच चर्चेनंतर जेवण बाहेरूनच मागवायचं ठरलं. चर्चा म्हणजे ....

 थोड मी घरी करते /करू का ?/जमेल का?/आता फक्त  दोघांचाच स्वयंपाक  करायची सवय मागच्या १५/२० वर्षांपासून आहे. स्पीड पण कमी झाली आहे. जास्त कामाचं दडपण येत. असे ताईचे प्रश्न  व त्यांची स्वतःच दिलेली उत्तर. असं बराच वेळ रिवीजन  झाल. चर्चा झाली.

शेवटी भाऊजी म्हणालेच...अगं ! accept  कर ना, वय झालंय. वय बोलतंय. त्यात तुझी हार झाली, तू कमी पडतेय, असं अजिबातच वाटायची गरज नाही. तुम्ही तुमचे रेडीमेड ड्रेसेस लहान मोठे  करता ना, असंच Tailoring आयुष्यातही गरजेचे आहे. आपली क्षमता ओळखणे आणि त्यानुसार वागणे गरजेचे आहे.मागे तू डोॅक्टरला सांगत होतीस ना, आता मी पूर्वीरख सोसायइटीचे दहा चक्कर  मारू शकत नाही. तर काय म्हणाले ते आठवतंय का ?

मग काय म्हणाले होते डोॅक्टर? आठवतंय का ?

दहा चक्कर मारायचा हट्ट का? नका मारू. जेवढं तुम्हाला जमतंय, तेवढंच करा ना. आपल्या क्षमतेचे correct marking/ adjustments/ मोजमाप वेळोवेळी करत रहावंच लागणार आहे  याला Physics च्या भाषेत Caliberation  म्हणतात. आता वाढत्या वयानुसार हे सर्व होणारच आहे. Slow, steady, regular activities करायची गरज आहे. प्रत्येकाला आपल्या तब्येती प्रमाणे तो नियम स्वतःचा ठरवावा लागेल. तोपण बदलतच राहणार आहे.स्वतःचेच Adjustment करावे लागणारच आहे. आता वयाच्या या फेजवर आपल्याला जे जमत नाही, ते  मान्य करायचं आणि त्या कामांचा दुसरा दज्ूग्दह शोधायचा. Function ला छान करायचंय ना, मग जेवण बाहेरून मागवू की.

एका लांबलचक  भाषणानंतर  जेवण बाहेरूनच मागवायचं ग्हिीत्त्ब् ठरलं. आजचा कार्यक्रम छानच झाला. त्यांची पंधरा मजली बिल्डिंग पूर्ण झाल्यावर तेथे सामुहिक वास्तुशांत खूप व्यवस्थित आणि धूमधडाक्यात झाली. गुरूजींच्या म्हणण्यानुसार आता प्रत्येकाने वेगळी वास्तूशांत केली नाही तरी चालेल. तरी आपापले विचार असतातच .ताईने घराचं wood work करून घेतलं. घरातील आवश्यक सर्वसामान, अगदी स्वयंपाक घरापासून ते बेडरुम पर्यंत घेतलं. घर व्यवस्थित, अगदी मजेत राहता येईल असं तयार केलं. फ्रीज, वाशिंग मशीन, माइक्रोवेव, TV  घेऊन घर एकदम सुसज्जित केलं.  त्यामुळे ताईची मुलगी जावई, सगळ्यांना छान घर बघायला मिळाल.

आज एका छान घरात रुचकर जेवणाबरोबर म्हातारपण कसं जगार्वे ? एका ठराविक  वयानंतर शरीर सिग्नल देत असतं, पण मन मानायला तयार नसतं. मनातला विचारांच्या या गोंधळावर कसा कंट्रोल  ठेवायचा ? विचारांना कशी दिशा द्यायची? या वयात प्रत्येक ठिकाणी संतुलन कसे महत्वाचे? याचंही शिक्षण मिळाल.

संयम आणि समज ठेवली तर सवयी बदलतात. सवयी बदलल्या तर आयुष्य बदलू शकतं. हटवादीपणा नको. मी असं करत होतो वगैरे आता नकोच. तो  Past Tense होता. आपल्याला Present चा विचार करायची गरज आहे. जिवंत असेपर्यंत असे बदल करत रहावेच लागणार आहेत.

जिंदगी गुजरती है, इम्तिहानो के दौरसे, एक जख्म भरता नही, तो दुसरा तयार मिलता है।

Accept every situation with smile, म्हणतात ना...विचारांचे  management  जमलं तर आयुष्याचं  management जमलेच म्हणून समजा. - संध्या बेडेकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

आठवणीत राहणारे गायक गणेश भगत