असंघटित कामगारांच्या हवकांसाठी कुणीही नाही!

सर्व क्षेत्रात खाजगीकरण झाल्यामुळे कंत्राटदारांपुढे या कामगारांना नमते घ्यावे लागते. आपल्या न्याय्य हक्कासाठी लढायाचे दिवस संपले. एके काळी कामगारांच्या संपामुळे गिरणी मालक बेचिराख झालेले इतिहासात उदाहरणे आहेत. पण आज स्वातंत्र्यानंतर आपलेच आपले मालक झाले आहेत. इंग्रजांनी दिडशे वर्षे राज्य केले, पण त्यांनी सार्वजनिक सुधारणा घडवून आणल्या होत्या. सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विषमता कमी करण्यासाठी ते प्रयत्नशील होते. पण आत्ता आपलेच आपले न्याय्य हक्क संपवत अहेत हे आज तरी चित्र दिसत आहे.

शुक्रवारी मुलगी, चैत्राली मुंबईहून दिवा-रोहा मेमु ट्रेनने येणार होती. एरव्ही ती कासू..नागोठणे अगोदरचे स्टेशन आले की, फोन करून सांगत असते. पण आज मी तिचा फोन येण्याअगोदरच तिला घेण्यासाठी घरातून निघालो. कारण पाऊस थांबला होता. रेनकोट घालण्याची गरज नव्हती. यामुळे मी स्टेशनवर दहा मिनिटे लवकर पोहोचलो. बाईक उभी केली व प्लेटफॉर्मकडे चालत असतांना ट्रेन कासूला पोहोचल्याचा चैत्रालीचा मेसेज आला. दहा मिनिटे मला वाट पाहावी लागणार होती हे गृहीत धरले होते. मी टेशनवर प्रवासी बैठक व्यवस्था असलेल्या जागेवर बसलो. पण ट्रेनला नेमकी क्रॉसिंग लागल्यामुळे आणखी थोडा उशीर होणार होता. यामुळे माझ्याकडे तिची प्रतीक्षा करण्यापलीकडे काहीही पर्याय नव्हता.

आज गर्दी फारच कमी होती. कारण बहुतेक लोक ट्रेन जवळ आली की स्टेशनला पोहोचतात. पण मी आज दहा मिनिट लवकर त्या ठिकाणी पोहोचलो होतो. थोड्याच वेळापूर्वी हलकासा पाऊस येऊन गेला होता. वारा मंद वाहत होता. रात्रीचे दहा वाजून गेले होते. स्टेशनवर निरव शांतता होती. अशा या शांत वातावरणात दिवसभर दमलेले कामगार पावसाचे थेंब अंगावर पडणार नाहीत अशा तर्हेने त्यांची कामासाठी वापरली जाणारं सामान डोक्याखाली घेऊन अंगावर ब्लँकेट घेऊन शांत झोपले होते. दिवसभर काम करून थकलेल्या शरीराला विश्रांतीची गरज असते. दमल्यामुळे त्यांना झोपहा ीचांगली लागली होती. पण तेवढ्यात एक मालवाहतूक करणाऱ्या ट्रॅकवर एक इंजिन येऊन थांबले. तेव्हा मला कळले की, या इंजिन मुळे चैत्रालीची ट्रेनला उशीर झाला होता. असे मनात चालू असतांना एक गडबड ऐकायला आली. एक दोन सुरक्षा जॅकेट घातलेले कामगार त्या ठिकाणी निवांत झोपलेल्या इतर कामगारांना उठवत होते. पण अंग हलवले तरी ते थकलेले जीव उठायला तयार नव्हते. पण हे जास्त वेळ चालले नाही. नाइलाजास्तव एकेक करत सर्व कामगार पाच सहा मिनिटांमध्ये जागे झाले. आपापली साहित्य हातात घातली आणि सहकार्यांना मदत करायला लागली. कारण दुसऱ्या ट्रॅकवरील इंजिन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. त्या ठिकाणी या वेळेला त्यांची गरज होती. ते आठ दहा कामगार झोपेवर दाबा मिळवत सर्व आपल्या कामावर हजर झाले. तो पर्यंत रिमझिम पाऊस चाल ूझाला होता. या पावसामध्ये ते कामगार आपापल्या सामानाचे ओझे एका प्लेटफॉर्म वरून दुसऱ्या प्लेटफॉर्मवर घेऊन जातांना त्यांचे चेहरे रडवेले झाल्याचे जाणवत होते. कामावर हजर न राहिल्यासआपल्या हातचं काम जाण्याची भीती त्यांना नेहमी असते. कारण हा कंत्राटी कामगारांचा जमाना आहे.

या सर्व त्या कामगारांच्या हालचाली मनाला वेदना देणाऱ्या वाटत होत्या. घरदार, बायकामुले गावी ठेवून हे कामगार कामाच्या शोधात आलेले असतात. जिथे काम तिथेच त्यांच्या निवाऱ्याची सोय असते. सर्व क्षेत्रात खाजगीकरण झाल्यामुळे कंत्राटदारांपुढे या कामगारांना नमते घ्यावे लागते. आपल्या न्याय्य हक्कासाठी लढायाचे दिवस संपले. एके काळी कामगारांच्या संपामुळे गिरणी मालक बेचिराख झालेले इतिहासात उदाहरणे आहेत. पण आज स्वातंत्र्यानंतर आपलेच आपले मालक झाले आहेत. इंग्रजांनी दिडशे वर्षे राज्य केले, पण त्यांनी सार्वजनिक सुधारणा घडवून आणल्या होत्या. सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विषमता कमी करण्यासाठी ते प्रयत्नशिल होते. पण आत्ता आपलेच आपले न्याय्य हक्क संपवत अहेत हे आज तरी चित्र दिसत आहे. हे असे मनात विचार चालू असतांना मी ज्या मेमु गाडीची वाट पाहत होतो, ती प्लेटफॉर्मवर येऊन थांबली होती. मी जागेवरून उठूलो व समोर उतरणाऱ्या प्रवाशांमध्ये चैत्रालीचा चेहरा सोधू लागलो. - डॉ. श्रीकृष्ण दिगंबर तुपारे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

बेचैनी