महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
स्वागत
"काय रे, बहिणीला विसरलास वाटतं..”
पाठीमागून शब्द आले आणि हातात भाजीच्या दोन पिशव्या घेऊन रस्ता ओलांडणाऱ्या मला जागीच थांबावे लागले. सुनंदा तिच्या घराच्या दारात उभी आहे हे कुणी न सांगताच मीं ओळखलं. आता पुढे जाणं शक्यच नव्हतं. मीं मागे वळलो.
सुनंदा माझ्या आईची विद्यार्थिनी. माझ्याहून पाच सहा वर्षांनी मोठी. आमच्या घराजवळच कन्या शाळा. तिथे आई शिक्षिका. या मुली पाणी प्यायला, मधल्या सुट्टीत डबा खायला घरी येत. घरी हळदी कुंकू वगैरे काही असल्यास त्याच्या तयारीला उत्साहाने आधी पासूनच येत. घर अंगण सारवलं की न सांगताच येऊन त्यावर झक्कास रांगोळी काढून जात. आम्हाला बहीण नव्हती. त्यामुळे घरात मुलगी नाहीच. पण या मुलींनी ती उणीव भरून काढली होती. वेळप्रसंगी आम्हाला दोन धपाटे घालायलाही कमी करत नसत. मी खालच्या वर्गात शिकत असताना सुनंदा घरी येई. पुढे तिची शाळा संपली. तीचं लग्नही झालं.
अनेक वर्षंनंतर सुनंदा ज्या गावात होती त्याचं गावात मीं नोकरींनिमित्त येऊन राहू लागलो. सुनंदाची आणि माझी गाठभेट होई. समाचार कळे. सुनंदा तिच्या बाईंची म्हणजे आमच्या आईची आवर्जून चौकशी करे. कधी एकमेकांच्या घरी जाणे येणे होई.
सुनंदाचा संसार तसा ओढग्रस्तीचाच होता. तिचे यजमान घरातच सोनार काम करत. साधी धुवट साडी, पायात प्लास्टिकच्या चपला घातलेली सुनंदा रस्त्यात कुठे कुठे भेटे. संसाराच रडगाणं, सासूच्या कागाळ्या सांगत राही. कधी एकमेकांच्या घरी जाणे येणे होई. पण कधी वर्ष-सहा महिन्यात भेटही होत नसे.
सुनंदा मला हात धरून घरात घेऊन गेली. पण तीचं घर पूर्वीचंच असूनही रूप मात्र बदललेलं दिसत होतं. मीं काहीसा चकित होत आजू बाजूला पाहू लागलो. घराला दिलेला ऑइल पेंटचा भारी रंग, दार खिडक्याना लावलेले झुळझुळीत पडदे, खालची मॅट याने घर चांगलं सजलं होतं. रंगीत टीव्ही, चांगलं शोकेस त्यातला शोभिवंत वस्तू मन आकर्षन घेत होत्या. आतल्या स्वयंपाक घराचं रुपही पालटलेलं दिसत होतं. भारीतला मिक्सर, मोठी गॅस शेगडी सुनंदाच्या साऱ्या संसारावरच नवी झळाळी आलेली दिसत होती आणि हो, नेहमी पुढच्या दारात दिसणाऱ्या सोनार कामाच्या वस्तू तो दिवा, हातोडा कुठे गायब झाल्या? माझा चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह ते दोघे वाचत होते.
तिच्या घरासमोरच्या हॉटेल मधून तिने सामोसे मागवून घेतले. सोबत गरमागरम कॉफी. जायफळ, वेलचीचा वास दरवळत होता. माझं त्याचा शांतपणे स्वाद. घेणं चालू होतं.
"धाकटी स्नेहा आय. टी मधे बी. एस्सी. झाली आणि चांगल्या ठिकाणी नोकरीला लागली. आता कंपनीने तिला लंडनमधे पाठवलंय. तीन वर्षांसाठी. तिला भरपूर पगार आहे. ती आता दर महिन्याला आमच्या दोघांच्याही खात्यात पंचविस हजार प्रत्येकी जमा करते, खेरीज आमची बहुतेक सारी बिलं ती तिकडूनच भरून टाकते.” सुनंदा खुलासा करत होती. तिने माझ्या चेहेऱ्यावरचं प्रश्नचिन्ह वाचलं होतं. तिचे यजमान मान डोलावत होते. त्यांच्या चेहेऱ्यावरही आता टुकटुकी आल्यासारखं दिसत होतं. मलाही ऐकून बरं वाटलं. उशिराने का होईना, सुनंदा आणि तिच्या यजमानांना चांगले दिवस पाहायला मिळाले याचं बरं वाटलं. मीं तसं त्यांना म्हटलंही. चला, आता थांबून चालणारं नव्हतं. मी त्यांचा निरोप घेतला.
तिच्या घराची पायरी उतरताना मात्र स्नेहा ही सुनंदाची पाचवी मुलगी आणि हिच्या जन्मानंतर मुलगीच जन्माला आली म्हणून या दोघांनानी गळा काढून तिचं कसं स्वागत केलं हे काही कारण नसताना मला आठवत राहिलं. - श्रीनिवास गडकरी