महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
कुटुंबनियोजनाचे कुटुंबावर होणारे परिणाम!
आता कुटुंबात एकच अपत्य असल्याने या नात्यांचा लोप झाला आहे. नाती अस्तित्वातच राहीली नाहीत. हे टाळण्यासाठी यापुढे तरी जरी कुटुंबनियोजन करुन एकाच अपत्याला जन्म दिला, तरी पहिले मूल चार, पाच वर्षांचे झाल्यावर एखादे मूल दत्तक घ्यावे. मूल दत्तक घेण्यात अशी सोय होते की मुलगा असेल तर मुलगी आणि मुलगी असेल तर मुलगा दत्तक घेणे शक्य होऊन भावाला बहीण किंवा बहिणीला भाऊ उपलब्ध झाल्याने मामा, आत्या ही नाती तरी उत्पन्न होऊ शकतील..
गेली अनेक दशके लोकसंख्यावाढ ही जागतिक समस्या झालेली आहे़. लोकसंख्या वाढतच राहिली, तर एक दिवस जगात उपलब्ध असलेले पाणी आणि उत्पादित होणारे अन्नधान्य लोकांना अपुरे पडण्याची शक्यता आहे. याचा विचार करुन जागतिक पातळीवर संतती नियोजनाच्या योजना कार्यंन्वित करण्यात आलेल्या आहेत. पण अजूनही काही मागास देश त्याचा विचार करताना दिसत नाहीत. आपल्या देशातही कुटुंबनियोजन कार्यंन्वित करण्यात आलेले असले, तरी उत्तरप्रदेश, बिहार सारख्या काही राज्यात त्याला प्रतिसाद देण्यात येत नाही, तर महाराष्ट्र आणि दाक्षिणात्य राज्यात कुटुंबनियोजन बय्रापैकी अंमलात आणले जात आहे.
आपल्या देशात स्वातंत्र्यप्रापती नंतर लोकशाही राज्यव्यवस्था स्वीकारण्यात आलेली आहे. आपल्या देशात अनेक धर्माचे, अनेक जातीचे, अनेक भाषिक लोक रहातात. त्याचे नियंत्रण करण्यासाठी जरी आपल्या राज्यघटनेत सर्वधर्म समभाव हे तत्व अंगिकारलेले असले तरी सुरुवातीपासून सत्तेवर आलेल्या काँग्रेस पक्षीय सरकारने मुस्लिमांचे लांगुलचालन करण्यासाठी मुस्लीम समाजाला अल्पसंख्याक म्हणून राज्यघटनेतच विशेषसवलती दिलेल्या आहेत. त्याचा गैरफायदा घेऊन मुस्लीम समाज धर्माच्या नांवावर संततीनियमन करण्यास नकार देत आहे. शिवाय त्यांना धर्माच्याच नांवावर अनेक लग्न करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. परिणामी त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आणि उलटपक्षी हिंदुंची लोकसंख्या कमी होत आहे. एकोणीसशे सत्त्याहत्तर साली आपल्या देशात कुटुंबनियोजन राबविण्यास सुरुवात केल्यापासून आपल्या राज्यातिल हिंदुंनी ती इमानेइतबारे अंमलात आणली नव्हे त्याचा अतिरेकच केला असे म्हणणे वावगे ठरु नये. कारण आपल्या राज्यातील बहुतांश कुटुंबियांनी एकच अपत्याला जन्म देण्याचा निर्णय घेतला, मग ते अपत्य मुलगा असो की मुलगी. या निर्णयामुळे ते अपत्य एकलकोंडे झाले. मध्यमवर्गीय कुटुंबात साधारणतः नवरा, बायको नोकरी करतात. कारण सर्वसाधारणतः महागाईमुळे संसार-कुटुंब चालवणे अशक्य झालेले आहे. साधारणतः मध्यमवर्गिय कुटुंब एक किंवा दोन खोल्यांच्या घरात रहात असल्यामुळे मुलाचे लग्न झाल्यावर त्याला दुसरीकडे रहायची सोय करणे अपरिहार्य होते. परिणामी कर्ज काढून घर घेण्याची पाळी येते. अशा परिस्थितीत नवरा-बायको दोघांना कमवणे भाग पडते. विभक्त कुटुंब पध्दतीमुळे अपत्याला पाळणाघरात ठेवण्याची वेळ येते. कामावरुन घरी आल्यावर सुध्दा अपत्याला वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे खेळण्यासाठी भावंड नसल्याने ते अपत्य एकलको़ंडे होते.
पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पध्दतीत घरात काका, काकी, एकत्र रहात असल्यामुळे चुलत आणि सख्खी भावंडं अशी अनेक मुलं असल्याने मुलं एकमेकात मिसळून रहात असत. शिवाय शाळेला सुट्टी पडल्यावर मुलं आवर्जून मामाच्या गांवाला जात असत. त्यामुळे मुलांत एकटेपणा येत नसे. एकापेक्षा जास्त मुलं जन्माला आल्यामुळे काका, काकी, मामा, मामी, मावशी, आत्या, मामेभाऊ, चुलत भाऊ अशी नाती असायची. पण आता कुटुंबात एकच अपत्य असल्याने या नात्यांचा लोप झाला आहे. नाती अस्तित्वातच राहीली नाहीत. हे टाळण्यासाठी यापुढे तरी जरी कुटुंबनियोजन करुन एकाच अपत्याला जन्म दिला, तरी पहिले मूल चार, पाच वर्षांचे झाल्यावर एखादे मूल दत्तक घ्यावे. मूल दत्तक घेण्यात अशी सोय होते की मुलगा असेल तर मुलगी आणि मुलगी असेल तर मुलगा दत्तक घेणे शक्य होऊन भावाला बहीण किंवा बहिणीला भाऊ उपलब्ध झाल्याने मामा, आत्या ही नाती तरी उत्पन्न होऊ शकतील... आणि अनाथ मूल दत्तक घेतल्याने एकप्रकारे सामाजिक कार्यही घडू शकेल. -रमेश नारायण वेदक