महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
पालखी : संत नामाचा गजर..विठ्ठल
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ,नामदेव, तुकाराम वारक-यांना प्रोत्साहित करणारे शब्द... नामावलीतले प्रत्येक संतनाम..माणसाला देवत्वाकडे नेणारी एक एक पायरी आहे.. निवृत्ती या मार्गातली पहिली पायरी..
गृहस्थाश्रम नेमस्तपणे पूर्ण केल्यावर संसारातून माणसाने निवृत्त व्हावे अन् जीवनाच्या पुढील पायरीवर पदार्पण करावे.. ती दुसरी पायरी..ज्ञानदेव ज्ञानाचा मागोवा घ्यावा, जन्म मरणाचा संकेत जाणण्यासाठी ज्ञानसाधना करत उच्च स्तरावर जाण्याचा सोपान चढावा..सोपान म्हणजे जिना किंवा शिडी.विचारगर्भीत जीवनाचा अर्थ उमजण्यासाठी.. ज्ञानसाधना करण्याच्या या काळाला सोपान म्हणायचे..
हा सोपान चढले की मिळते पुढची पायरी..मुक्ती व्यावहारिक व ऐहिक सुख-दुःखापासून मुक्ती.. त्यामुळे ख-या साधुत्वाला पोहचलेल्या व्यक्तीला ना सुख-दुःख, ना हेवा, ना दावा.. ती माणसाला स्थितप्रज्ञ करते. अश्या ज्ञानी व्यक्तीला मग उमजते..विश्वरचनेमागे एकच शक्ती..नाथ.. एकनाथ म्हणजे एकच नाथ.. ही देवत्वाकडे पोहचण्यातील महत्वाची पायरी..आदिशक्तीचे एकत्व उमजले की देव ही कल्पना ‘नामापुरती'उरते, नामापुरता देव म्हणजेच नामदेव अश्या दिव्यत्वापर्यंत पोहचलेल्या व्यक्तीला प्रश्न पडतो..तू का राम?.. ही ती देवत्वाची स्थिती.. तुकाराम या शब्दाच सामावली आहे. "निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई एकनाथ, नामदेव, तुकाराम” ह्या संत नामांचा एका लयीत घोष होत असतो.
तो जेव्हा टिपेला पोहचतो तेव्हा उच्चारले जाते एकच नाम ‘विठ्ठल..विठ्ठल वि म्हणजे विसरायचं नाही, ठ्ठ म्हणजे मनात चांगलं ठसवायचं अन्ल म्हणजे लक्षात ठेऊन इतरांना सांगत रहायचं.. मी तेच केलं..मग म्हणाना..विठ्ठल ..विठ्ठल ! जसे सर्व संतांना विठ्ठल दर्शनाने आनंद होतो तसाच किंबहुना ह्यापेक्षा कितीतरी पटीने आनंद साक्षात विठ्ठलाला ही होत असतो..यातलं गमकं एवढचं..अभंग समजल्याशिवाय संत समजणार नाही
अन् संत समजल्याशिवाय भगवंत समजणार नाही..
फार नव्हे, पण थोडी करता येते
रेष सुखाची मोठी करता येते,
अन् मनात ज्ञाना-तुका रुजवल्यावर
बसल्या जागी वारी करता येते..
गुंफण : दिलीप जांभळे