महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
किल्ले राजगड स्वछता
६ जून रोजी शिव राजाभिषेक सोहळ्यास आलेले लोकांकडून पाण्याच्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्या, चहाचे कप व नाष्ट्याच्या डिशेस, कागदी पत्रावळी, प्लास्टीक पिशव्या ई. चा काही टनामध्ये कचरा केला जातो. हा कचरा तसाच पडुन राहिल्यास त्याची पावसाळ्यात गडावर दुर्गंधी होऊ शकते. मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून गतवर्षी पासून विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभाग राष्ट्रीय सेवा योजना सेलच्या सहकार्याने महाविद्यालयीन सुट्टयांच्या काळात रायगडावर प्रभावीपणे स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून हा राज्याभिषेक दिन ही संपूर्ण रायगडकर व महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेसाठी अभिमानाची बाब आहे. यावर्षी देखील या सोहळ्याला उपस्थित, छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे पुत्र स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे वंशज, तसेच देशविदेशातून आलेले तमाम नागरीक व महाराष्ट्र राज्याच्या जनतेच्या साक्षीने हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पण या सोहळ्याच्या या निमित्ताने रायगड गडावर आलेल्या शिवप्रेमींकडून २४ तासामध्ये पाण्याच्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्या, चहाचे कप व नाष्ट्याच्या डिशेस, कागदी पत्रावळी, प्लास्टीक पिशव्या ई. चा काही टनामध्ये कचरा केला. हा कचरा तसाच पडुन राहिला तर त्या कचऱ्याची पावसाळ्यात गडावर दुर्गंधी होऊ शकते. इतर संघटनेचे स्वयंसेवक व सेवा भावी संस्थांच्या माध्यमातून हा कचरा गोळा करण्याचे काम केले जात असते. पण यासाठी खूप दिवस लागतात. म्हणूनच मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून व कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी व प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. भामरे साहेब यांच्या कल्पकतेतून गतवर्षीपासून मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून याही वर्षी ७ जून रोजी सकाळी ७ः३० वाजल्यापासून स्वयंसेवक या मोहिमेत सहभागी होण्यासाठी दाखल होत होती. मुंबई विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक प्रा. डॉ. सुनिल पाटील व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यालयीन अधिकारी (ओ. एस. डी.) सुशिल शिंदे यांच्या सह विद्यापीठ प्रशासनातील कर्मचारी वर्ग आदल्या दिवशीच येथे येऊन या कार्यक्रमाचे नियोजन करतांना दिसले.
पाचशे स्वयंसेवक या मोहिमेत सहभागी होण्यासाठी गडावर पोहचले.रायगड जिल्ह्यातील जिल्हा समन्वयक, विभागीय समन्वयक व कार्यक्रम अधिकाऱ्यांची फौज सोबतीला होती.महाविद्यालय स्तरावर ६ तारखेला सर्व सहभागी कार्यक्रम अधिकाऱ्यांना कामाचे वाटप करण्यात आले होते. त्यामुळे गडावर स्वयंसेवक पोहचले. डॉ. सुनील पाटील व सुशील शिंदे यांनी स्वयंसेवकांची गटागटात विभागणी केली. कार्यक्रम अधिकारी वर्षांनी आपापले सोपवलेले काम हाती घेऊन कामाला सुरुवात केली. थोड्या वेळातच किल्यावरील सर्व भाग या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी व्यापला होता. प्रशासनाचे अधिकारी त्यांच्या सोबत होते. काही वेळातच प्लास्टिक कचऱ्याने भरलेल्या मोठ्या मोठ्या पिशव्या गोळा होयाला सुरूवात झाली. या स्वच्छता काळादरम्यान पावसाचा अडथळा निर्माण होत होता, पण त्याचा परिणाम स्वयंसेवकांच्या कामावर अजिबात पडला नाही. योग्य नियोजन असले की काम चांगले पार पडते. दोन अडीच तासामध्ये कचऱ्याच्या पिशव्यांचा ढिग दिसायला लागला होता. तो कचरा नंतर योग्य ठिकाणी लावण्यासाठी सर्व स्वयंसेवक एकवटले होते.
दुपारी सर्व कचऱ्याची विल्हेवाट लावल्यानंतर अत्यंत चांगले दुपारचे जेवण स्वयंसेवक विद्यार्थ्यांना देण्यात आले. त्यांच्यासाठी विद्यार्थी कल्याण मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. या प्रसंगी स्वच्छता कामाचे कौतुक विद्यापीठ वरिष्ठांनी केले. सायंकाळी ५.०० च्या सुमारास वाजता सर्व स्वयंसेवक परतीच्या प्रवासासाठी निघाले. भारत हा तरुणाचा देश आहे. या तरुण मनात आणले तर कोणतेही काम फार निष्ठेने पार पाडू शकतात. विशेष म्हणजे महाविद्यालयाला उन्हाळी सुट्या असतांना देखील सर्व कार्यक्रम अधिकारी या मोहिमेसाठी सहभागी होतात. सुट्टयांमध्ये विद्यार्थी स्वयंसेवक जमा करणे हे काम सोपे नसते. यामुळे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सर्व स्तरावर कौतुक होत असते. - डॉ. श्रीकृष्ण दिगंबर तुपारे