आत्मशुध्दीसाठी विवेकपूर्ण ध्यान (जागतिक योग दिन)

११ डिसेंबर २०१४ रोजी भारताचे स्थायी प्रतिनिधी अशोक मुखर्जी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मसुदा ठराव सादर केला. मसुदा मजकूराला १७७ सदस्य राज्यांकडून व्यापक समर्थन मिळाले ज्यांनी मजकूर प्रायोजित केला, जो मताशिवाय स्वीकारला गेला. या उपक्रमाला अनेक जागतिक नेत्यांचा पाठिंबा मिळाला. २१ जून या दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी निवडण्यामागे खास कारण आहे. २१ जून हा वर्षांत सर्वात मोठा दिवस मानला जातो, ज्याला ‘उन्हाळी संक्राती असे म्हटले जाते.

उन्हाळी संक्रांती हा उत्तर गोलार्धातील सर्वात जास्त प्रकाश असलेला दिवस आहे. पृथ्वीचा अक्ष त्याच्या कमाल कोनात सूर्याकडे झुकतो, त्यामुळे दिवस मोठा होतो. २१ जून नंतर सूर्य दक्षिणायनात प्रवेश करतो. योग आणि अध्यात्मासाठी हा दिवस खूप खास मानला जातो. त्यामुळे २१ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस' साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. जगभरात योगाचा प्रसार करण्यासाठी आणि त्याच्या फायद्यांची जाणीव करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी योगाचे महत्त्व सांगितले होते. ‘योग ही भारताच्या प्राचीन परंपरेने दिलेली एक अमूल्य देणगी आहे. योग मन व शरीर, विचार व कृती, संयम व पूर्णता, मनुष्य व निसर्ग यांच्यातील ऐक्याला मूर्त रूप देतो. आरोग्य व स्वतःच्या कल्याणसाठी सर्वांगीण दृष्टिकोन प्राप्त करून देतो. योगासने हा केवळ एक व्यायाम नाही, तर स्वतःशी, जगाशी आणि निसर्गाशी एकरूपतेची भावना शोधण्याचा मार्ग आहे. आपली जीवनशैली बदलून आणि चेतना निर्माण करून आरोग्य सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन स्वीकारण्याच्या दिशेने काम करू या,' पंतप्रधानांच्या या भूमिकेनंतर संयुक्त राष्ट्रांतील विविध देशांनी योगांचे महत्त्व जाणून हा दिवस साजरा करण्यास मान्यता दिली.

योग एक पूर्ण विज्ञान आहे, एक पूर्ण जीवन शैली आहे, एक पूर्ण चिकित्सा पद्धती आहे आणि एक पूर्ण अध्यात्म विद्या आहे. योगाच्या लोकप्रियतेचे रहस्य हे आहे की लिंग, जाति, वर्ग, संप्रदाय, क्षेत्र आणि भाषाभेदांच्या संकीर्णतांमध्ये कधी आबद्ध न असणे होय. चिंतक, बैरागी, अभ्यासी, ब्रह्मचारी, गृहस्थ कोणीही याचे सानिध्य प्राप्त करून लाभान्वित होऊ शकतात. व्यक्तींच्या निर्माणात आणि उत्थानामध्येच नाही तर परिवार, समाज, राष्ट्र आणि विश्वाच्या चहूमुखी विकासामध्येही याचा उपयोग सिद्ध झाला आहे. योग मनुष्याला सकारात्मक चिंतनाच्या प्रशस्त मार्गावर आणण्यासाठी एक अद्‌भुत विद्या आहे, ज्याला हजारो वर्षापूर्वी भारताच्या प्रज्ञावान ऋषि-मुनींंनी आविष्कृत केले होते. महर्षि पतंजलीनी अष्टांग योगच्या रूपात याला अनुशासनबद्ध, संपादित आणि निष्पादित केले. जेव्हा मनाला एकाग्र करून ध्यानावस्थित रूपात जीव परमात्म्याबरोबर मिलनाची आकांक्षा करत असते तोच योग आहे. योगासनांना आधुनिक जीवनात फक्त व्यायामच मानले जाते. इंग्रजीमध्ये याला योगच्या ऐवजी ‘योगा' संबोधिले जाते.

योगाचे कित्येक प्रकार शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक हालचालींना आपल्या ताब्यात ठेवतात ज्यांचा उद्देश असतो की मनुष्याला आपल्या स्वरूपाच्या बाबतीत ज्ञान मिळवणे हेच मानव जीवनाचे परम लक्ष्य मोक्ष प्राप्त करणे. योग वैदिक तत्त्वशास्त्रात सहा विचारधारांमध्ये दर्शनांमध्ये एक आहे. इथे याचे तात्पर्य राजयोगाबरोबर आहे. तो एक ब्रह्मन्‌ मिळविण्यासाठी ईश्वरीय ध्यानाचा राजसी मार्ग आहे. हिंदू संस्कृतीत योगाचे कित्येक प्रकारपण आहेत, उदा. निष्काम कर्म योग, आत्महित विहीन भक्ति योग आणि ज्ञान योग (विवेकपूर्ण ध्यान). ‘जागतिक योग दिन' हा योगास मान्यता देणारा एक दिवस आहे, जो २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने स्वीकारल्यानंतर दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. मानसिक तंदुरुस्ती, प्राचीन भारतात उगम पावलेल्या या निरोगीपणाच्या प्रथेचा जागतिक स्तरावर प्रचार करणे संयुक्त राष्ट्रांनी महत्त्वाचे मानले होते. भारतीय धर्म संस्कृतीमधील ‘योग' संकल्पनेची मांडणी श्रीमदभगद्‌गीता ग्रंथात केलेली आहे. त्याच जोडीने पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे. याद्वारे आध्यात्मिक उन्नतीही साधता येते असे पातंजल योगसूत्र ग्रंथात सांगितले आहे. जगभरातून स्वीकारले गेलेले भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व अधोरेखित होण्याचे प्रयत्न या दिवसाच्या निमित्ताने होते. योग हा शब्द संस्कृत युज्‌ या धातुपासून तयार झाला आहे. पाणिनी व्याकरणामध्ये युज्‌समाधौ असे सूत्र आहे. योग या शब्दाचा अर्थ ‘जोडणे, एकत्र आणणे, जुळवणे' असा अनेक प्रकारे होतो.

योगावर पतंजली मुनींनी जवळजवळ इ.स.पू. १५० मध्ये योगसूत्र लिहिले. पतंजलींच्या अनुसार अष्टांग योगाचे पालन करणारी व्यक्ति आपल्या मनाला शांत करू शकते आणि शाश्वत ब्रह्मात सामावू शकते. याच ‘अष्टांग पथा'ने नंतर येणाऱ्या राज योग, तंत्रयोग आणि बौद्ध (वज्रयान) योगाचा पाया घातला. दोन वर्षांत या उपक्रमाने चळवळीचे रूप घेतले आहे. १८ जून रोजी ऑस्ट्रेलियन संसदेमध्ये माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांच्या उपस्थितीत योगसत्र झाले. स्वतः अबॉट यांनी यावेळी योगासने केली. दरवर्षी एक विशेष थीम लक्षात घेऊन योग दिनाचे आयोजन केले जाते. यंदा म्हणजे २०२५ या वर्षीची थीम ‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' आहे. या थीमचा अर्थ असा आहे की, आपल्या सर्वांचे आरोग्य या पृथ्वीच्या आरोग्याशी जोडलेले आहे. जेव्हा पृथ्वी निरोगी असेल तेव्हा मानवदेखील निरोगी असतील. योग हा दुवा मजबूत करण्यास मदत करतो. हे अधोरेखित करण्यासाठी ही थीम निवडण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, या जागतिक उत्सवाचा ११ वा वर्धापन दिन आहे. ‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' या थीम अंतर्गत या वर्षीचा कार्यक्रम समग्र कल्याण आणि पर्यावरणीय सुसंवाद वाढविण्यात योगाच्या महत्त्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकतो.

२०१५ मध्ये पहिल्यांदा योग दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी थीम होती, ‘सुसंवाद आणि शांततेसाठी योग.' त्याच्याच पुढील वर्षी म्हणजे २०१६ मध्ये ‘शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग' अशी थीम होती. २०१७ मध्ये ‘आरोग्यासाठी योग,' २०१८ मध्ये ‘शांततेसाठी योग,' २०१९ मध्ये ‘हृदयासाठी योग,' २०२० मध्ये ‘घरी आणि कुटुंबासह योग,' २०२१ मध्ये ‘निरोगीपणासाठी योग,' २०२२ मध्ये ‘मानवतेसाठी योग,' २०२३ मध्ये ‘वसुधैव कुटुंबकमसाठी योग सर्वांच्या कल्याणासाठी योग,' हे दर्शाविण्यासाठी ही थीम निवडण्यात आली होती. गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये ‘महिला सक्षमीकरणासाठी योग' अशी थीम ठेवण्यात आली होती. या मध्यवर्ती कल्पनेसह महिलांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य वाढवण्यावर भर दिला गेला होता. महिलांचे सर्वांगीण कल्याण वाढविण्यात आणि परिवर्तनात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. हे अर्धोरेखित करण्यासाठी ही थीम निवडण्यात आली होती. हा दिवस महिलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकासातील प्रगती साजरी करेल, असा विश्वास ही थीम निवडतांना व्यक्त करण्यात आला होता. संयुक्त राष्ट्रसंघाचा ठराव स्वीकारल्यानंतर, भारतातील आध्यात्मिक चळवळीतील अनेक नेत्यांनी या उपक्रमाला पाठिंबा दर्शाविला. आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक रविशंकर यांनी मोदींच्या प्रयत्नांचे कौतुक करतांना म्हटले आहे की, "कोणत्याही तत्वज्ञान, धर्म किंवा संस्कृतीला राज्याच्या संरक्षणाशिवाय जगणे फार कठीण आहे. योग आतापर्यंत जवळजवळ अनाथाप्रमाणे अस्तित्वात आहे. आता, अधिकृत मान्यता. यूएन योगाच्या फायद्याचा आणखी प्रसार करेल.”
११ डिसेंबर २०१४ रोजी भारताचे स्थायी प्रतिनिधी अशोक मुखर्जी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मसुदा ठराव सादर केला. मसुदा मजकूराला १७७ सदस्य राज्यांकडून व्यापक समर्थन मिळाले ज्यांनी मजकूर प्रायोजित केला, जो मताशिवाय स्वीकारला गेला. या उपक्रमाला अनेक जागतिक नेत्यांचा पाठिंबा मिळाला. एकूण १७७ राष्ट्रांनी हा ठराव सह-प्रायोजित केला, जो अशा स्वरूपाच्या ठरावासाठी आतापर्यंतची सव्रााधिक सह-प्रायोजकांची संख्या आहे. भारतीय कॅलेंडरमध्ये, उन्हाळी संक्रांती दक्षिणायनामध्ये संक्रमण दर्शवते. उन्हाळ्यातील संक्रांतीनंतरची दुसरी पौर्णिमा ही गुरु पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. हिंदू पौराणिक कथांमध्ये, शिव, पहिला योगी (आदि योगी), या दिवशी उर्वारित मानवजातीला योगाचे ज्ञान देण्यास सुरुवात केली आणि ते पहिले गुरु (आदि गुरु) बनले असे म्हटले जाते. निरोगी तन आणि शांत मन याची गुरुकिल्ली म्हणजेच योग, त्यानिमित्त सर्वांना जागतिक योग दिनाच्या खुप खुप शुभेच्छा !! - प्रविण बागडे 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

योग आहे आरोग्यासाठी क्रांती