महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
खोट्यांचा गवगवा, सत्याचा बागूलबुवा!
अनेकांकडून बनवून समाजमाध्यमांवर दिसून येणाऱ्या रील्सचा प्रभाव आपल्या प्रसार माध्यमावरही पडलेला दिसतो आहे. जशी रील्सवाली मंडळी, सत्याला दाबून असत्याला नटून सजवून, आपल्यासमोर सादर करतात तशीच विविध प्रसार माध्यमं खऱ्या बातम्या दडवून खोट्या बातम्यांना अलंकारीत भाषेत आपल्यासमोर सादर करतात व राजकारण्यांच्या नफरतीखोर वागण्या-बोलण्याला महत्त्व देऊन त्यांचा (नेत्यांचा) उदो-उदो करतात. समाजात तेढ निर्माण करणाऱ्याला महत्त्वाची व्यक्ती ठरवण्याचे पाप ही रीलवाली मंडळी करतात व त्याला माध्यमातील मंडळी साथ देतात व सामान्याच्या जीवनात अडचणी निर्माण करतात.
‘‘गरज ही शोधाची जननी आहे'' त्यानुसार मानवाने विज्ञानाच्या साहाय्याने विविध क्षेत्रात खुपच प्रगती केली आहे. युध्दासाठी नवनवीन क्षेपणास्त्रे बनवून जगाला भितीच्या खाईत लोटले आहे. तर दूरसंचार क्षेत्रातही फार पुढचा पल्ला गाठला आहे. आता तर ‘ए आय'च्या सहाय्याने माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. माहिती क्षेत्रात त्याचा सर्रास वापर सुरु आहे.
पूर्वी एक दुसऱ्याची माहिती घेण्यासाठी टपाल व्यवस्था होती. आता ‘मोबाईल'च्या सहाय्याने सर्व जग एका कुंटूंबासारखं जवळ आलं आहे. ही चांगलीच गोष्ट आहे, पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की, त्याचे वाईट परिणाम दिसायला लागतात. असाच प्रकार ‘मोबाईल' बाबत घडताना दिसत आहे.
जगात मोबाईल बऱ्याच काळापासून सुरु झाला. आता दोन तीन दशकापासून भारतात त्याचे आगमन झाले असले तरी आज जगात सर्वात जास्त वापर भारतातच होताना दिसतो आहे. बाहेर देशातील लोक मोबाईलचा वापर फक्त कामापूरताच करतात; मात्र भारतात कामापेक्षा जास्त वापर केवळ मनोरंजन व ‘टाईमपास' साठीच वापरतात की काय, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लोकांचे कामाकडे लक्ष कमी व ‘रील' बघण्यात जास्त जाऊ लागले आहे.
देशातील ९९% तरुण आपल्या जीवनात मोठे काही करु शकत नाहीत. कारण ते स्वतःला जिंकू शकत नाहीत. पुढे जाऊन ते विचार करतात की, जर मी मोबाईलवर इतका टाईमपास केला नसता तर आणि तोच टाईम मी आपल्या अभ्यासासाठी दिला असता तर किती बरे झाले असते? मोबाईलवर रील पाहण्यापेक्षा कामासाठी किंवा अभ्यासासाठी वेळ दिला असता तर किती बरे झाले असते. याला म्हणतात नंतर सुचलेले शहाणपण. मोबाईलवर आपण आपल्या कामाच्या गोष्टी पहाव्यात. आपण हवे तर दोन-तीन तास मोबाईल वापरा, पण तेच पहा, ज्यात तुम्हाला काही शिकायला मिळेल. पण आपण नेमके तेच विसरतो व रील पाहण्यात आपला वेळ वाया घालवतो. रील मधील लहान-सहान गोष्टी पाहण्याने आपली स्मरणशक्ती कमी होते.
सध्या रीलचे सर्वात मोठे मार्केट आहे. त्यात आपण सर्वजण अडकलेले आहोत. रील पाहणाऱ्याला २४ तासही कमी पडू लागले आहेत. ज्याच्याजवळ बटनवाला मोबाईल असेल त्यांना चोवीस तासाचा वापर इतर कारणासाठी करता येतो. चोवीस तास खूप मोठा वेळ असतो. जर कोणाला दोन तास सोशल मिडियात वेळ घालवायचा असेल, तर आपल्याला तो टार्गेट चालवायला हवा. स्क्राेलिंगवाल्या रीलमध्ये आपण वाईट प्रकारे फसत जातो. त्यामुळे वेळेचे भान राहत नाही. कारण कोट्यवधी, अब्जावधी रुपये खर्च करुन रील्सना तयार केले जाते. आपल्या भारतीयांच्या माईंडसेटला अशा प्रकारे टॅप केले जात आहे की, ते कोणत्याही बाबतीत थांबू शकणार नाही. पूर्वी वीस मिनिटाचा व्हिडिओ होता. तो कमी करुन १ मिनिटांवर आणण्यात आला. हा एक खुप मोठा बाजार आहे. त्यात आपण हळूहळू हरवत चाललो आहोत. रील पाहिल्यानंतर आपल्याला काहीच लक्षात राहात नाही. रीलने आपला मेंदू खूप शॉर्ट केला आहे. वीस सेकंदाच्या रीलवर लिहिलेले असते की, शेवटासाठी वाट पाहा.
शेवटासाठी वाट पाहा, सांगणारे तुम्हाला आपल्या बोलबच्चनगिरीत झूलवत ठेवून आपली मते तुमच्या माथी मारत असतात. काही वेळातच त्यांची मते तुम्हाला आवडू लागतात. त्यांचे दुसरे वावय असते, तुम्ही नवीन असाल तर तुम्ही ‘सबव्रÀाईब' करा, म्हणजेच त्यांच्या रीलचे प्रेक्षक व्हा, तुम्ही प्रेक्षक झाल्याने त्यांची ‘टी आर पी' वाढते आणि त्यांचे उत्पन्नही वाढते. त्यांचे उत्पन्न वाढण्यात काही गैर नाही, पण आपल्या बुध्दीचे खोबरे होते, त्याचे काय?
या रीलवाल्यांनी आपली मती कुंठीत केली आहे. आपल्याला चांगले वाईटाची पारख करण्याच्या लायकीचेच सोडलेले नाही. आपल्यातील समजूतदारपणा घालवण्याचे पाप ही मंडळी करताना दिसतात. त्यांना फवत आर्थिक स्वार्थाशी मतलब असतो. काहींनी तर आता असा खालचा थर गाठला आहे की, त्यांनी विविध नावाच्या देवांनाही सोडलेले नाही. ते आपली अर्धी रील दाखवून सांगतात की, तुम्हाला हे खरे वाटत नसेल तर तुम्हाला अमूक तमूक देवाची शपथ आहे, तुम्ही हे करुन पाहा. तुम्हाला अनुभव येईल! खरं तर तसला कुठलाच अनुभव तर येत नाहीच. उलट त्या देवाचा हवाला दिला जातो त्या देवाविषयी राग मात्र येतो. कुठलाही देव आपल्या भवताला शाप देत नाही, हे अबाधित सत्य असले तरी ही मंडळी देवाच्या मुखातून वाईट-साईट शब्दावलीची बरसात दाखवतात. देवाला न मानणारे देखील घाबरुन जाऊन रील बनवणाऱ्याच्या ‘हो' ला ‘हो' करतात.
या रीलवाल्यांनी सध्याच्या तरुणाईसह बालकांना एवढच कशाला वृध्दांनाही कामाला लावले आहे, ही मंडळी सोशल मिडियाच्या एवढी आहारी गेली आहे की, त्यांना स्वतःचे भानही राहिलेले नाही. रील पाहण्याच्या नादात ते आपली नित्याची कर्मेही विसरु लागली आहेत. मित्र-मित्र चहापाण्यासाठी एकत्र जमले तरी, आपापसात गप्पा मारण्याऐवजी प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये गुंगून गेलेला असतो, समोरचा नाश्ता किंवा चहा थंड झाला तरी खाण्यात किंवा पिण्यात त्यांचे लक्ष नसते. त्यांना आवाज देऊन सांगावे लागते. एवढे ते रीलमध्ये गुंग होतात.
बरे ह्या रील तरी उपदेशकारक असतात का? तर नाही हे त्याचे उत्तर आहे. आत्ताच्या लोकांना चावट वा द्वीअर्थी शब्दाच्या रील्स आवडू लागल्या आहेत. काही काही रीलमधून तर चोऱ्या कशा कराव्यात, लोकांचा अपमान कसा करावा, लोकांच्या खोड्या कशा काढाव्यात याचेच धडे दिले जातात. शहरी भागातील कौटुंबिक कलह कसे निर्माण करावेत, कमजोर वा गरीबाची खिल्ली कशी उडवावी हे ही शिकवले जाते.
माणसाचा स्वाभाविक गुण आहे की, त्याला वाईट गोष्टी स्विकारायला फार आवडते व चांगल्या गोष्टी स्विकारणे शवयतो परवडत नाहीत. हिंदू धर्मातील सणा उत्सवावर विनोद करणे हा तर साधा सोप्पा मार्ग, त्यातही ही मंडळी माहिर आहेत. नास्तीक मंडळींकडून, देवाधर्माचा, रिती-रिवाजांचा जेवढा अपमान केला जात नाही तेवढा अपमान स्वतःला आस्तिक म्हणवणाऱ्यांकडून केला जातो आणि आपण त्याला गंभीरपणे न घेता, हसत सुटतो आणि अशा रिल्स दुसऱ्यांना पाहण्यासाठी पाठवून देतो.
नुकतीच वटपौर्णिमा होऊन गेली, त्यावरही ह्या रीलवाल्यांनी विनोद तयार करुन आपला ‘टी आर पी' वाढवण्याचा प्रयत्न केला. हा सण पावसाळ्याच्या तोंडावर येत असतो, तेव्हापासून सृष्टीत बदल होत असतो, तसेच धर्मग्रंथातील सत्यकथा यांचा आधार हिंदू धर्मातील सण, उत्सवामागे दडलेला असतो. प्रत्येक गोष्ट ही ईश्वराचेच रुप असून, जीवनसृष्टीसह निर्जिव वस्तूतही त्याचे अस्तित्व असते. त्यामुळे या सर्वांचा सन्मान करण्याची शिकवण या सणांच्या माध्यमातून आपल्याला मिळते. वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला पूजले जाते, नागपंचमीला नागाला, तर पोळ्याच्या दिवशी बैलाला पुजले जाते. पितृ पक्षाच्या निमित्ताने कावळ्याच्या रुपाने पूर्वजांना घास भरवला जातो. अशा प्रकारे चराचरावर निरपेक्ष प्रेम करायला शिकवणारे हिंदू धर्मातील सण. पण आपण, आपली संस्कृती सोडून पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव स्विकारतो त्याला कारण ही रीलवाली मंडळी, आपल्या रील्समधून आपण कसे मागासलेले व पूराण मतवादी असल्याच्या रिल्स आपल्या माथी मारतात.
या रील्सचा प्रभाव आपल्या प्रसार माध्यमावरही पडलेला दिसतो आहे. जशी रील्सवाली मंडळी, सत्याला दाबून असत्याला नटून सजवून, आपल्यासमोर सादर करतात तशीच विविध प्रसार माध्यमं खऱ्या बातम्या दडवून खोट्या बातम्यांना अलंकारीत भाषेत आपल्यासमोर सादर करतात व राजकारण्यांच्या नफरतीखोर वागण्या-बोलण्याला महत्त्व देऊन त्यांचा (नेत्यांचा) उदो-उदो करतात. यातून समस्या सुटण्याऐवजी वाढतच जातात.
समाजात तेढ निर्माण करणाऱ्याला महत्त्वाची व्यक्ती ठरवण्याचे पाप ही रीलवाली मंडळी करतात व त्याला माध्यमातील मंडळी साथ देतात व सामान्याच्या जीवनात अडचणी निर्माण करतात.
याचे ठळक उदाहरण द्यायचे झाल्यास ‘ऑपरेशन सिंदूर'चे देता येईल. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २६ जणांना ठार मारले. त्यांच्या बायकांचा सिंदूर पुसला गेला, आपल्या बहादूर सैन्याने दशतवाद्यांवर हमला करुन धडा शिकवला, पण आपल्या सरकारने उलटाच अर्थ घेऊन देशभरात ‘सिंदूर' वाटण्याची घोषणा केली, आपल्या संस्कृतीप्रमाणे, ‘सुहागन' स्त्रिया आपल्या पतीच्याच हातचा व देवीचा सिंदूर आपल्या भाळी भरतात. दुसऱ्या व्यवतीच्या हातच्या सिंदूराला त्या ढुंकूनही पाहणार नाहीत. पण, याच सिंदूर वाटपाच्या बातमीला महत्त्व मिळतांना दिसत आहे, म्हणजेच खोट्याचा गवगवा ही एक प्रकारची रीलच नव्हे काय? - भिमराव गांधले