मुंबईसाठी रेल्वेचे स्वतंत्र व्यवस्थापन बोर्ड हवे

मध्य रेल्वेवरील दिवा आणि मुंब्रा दरम्यान दोन समोरून येणाऱ्या गाडीला उभे राहिलेले प्रवासी घासले गेल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. त्यात चार जण मृत्युमुखी पडले ठार व तेरा जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही दुर्दैवी घटना असली तरी चिंतनीय, विचार व कृती करायला लावणारी नक्कीच आहे.

रेल्वेच्या एकंदरीत आकडेवारीनुसार रोज कुठेतरी सुमारे ७ एक जण तरी रेल्वे प्रवासी मृत्यूमुखी पडतात. तेवढ्यापुरत्या २-४ दिवस सर्वत्र चर्चा होतात पुढ मात्र कुठलीही ठोस उपाययोजना झालेली दिसत नाही. मात्र अजूनही रेल्वेने आपल्या कार्यपद्धतीत बदल योग्य त्या दिशेने करण्याची अपेक्षा जरूर आहे. दिवा काही वर्षापूर्वी पर्यंत मोठ्या वस्तीचे ठिकाण नव्हते. अल्पावधीतच तिकडे बरीच वस्ती वाढलेली झालेली आहे प्रवासी वाढत आहेत. त्या मानाने त्या मार्गावर कमी आहेत. साहजिकच कधी वाढते आहे. एकीकडे वातानुकूलित गाड्या व आलिशान गाड्यांचे वाढलेले प्रमाण हे सगळे लोकांना खुश करण्याचा मार्ग सामान्य प्रवाश्यांच्या त्या दृष्टीने मात्र नक्कीच विचार करायला लावणारी गोष्ट आहे. सामान्य प्रवासांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे आणि त्या प्रमाणात साध्यालोकल गाड्यांच्या फेऱ्या कमी होत आहेत हे व्यस्त प्रमाणात गंभीरतेकडे झुकविणारे खचितच आहे.

 केवळ नाईलाज म्हणून पोट भरण्यासाठी सामान्य प्रवासी हा जीवघेणा प्रवास लोकलगाडीचा आसरा घेताना दिसतो. केवळ काही सेकंदच गाडी स्थानकावर थांबल्यावर डब्यातून प्रवाश्यांनी आत बाहेर करणे कठीणच असते. केवळ इलाज नाही म्हणून गाडीच्या फुटबोर्डावरून आपला जीव धोक्यात घालून प्रवासी प्रवास करीत असतो. वाढते प्रवासी व कमी लोकल गाडयाची हे व्यस्त प्रमाण अपघातांचे महत्वाचे कारण बनले आहे. रेल्वेने लोकल्सचे प्रमाण वाढविणे हाच त्यावरील उपाय आहे. १५ डबे गाडीला जोडणे उत्तमच आहे. रेल्वेकडे ताब्यात असलेल्या जुन्या गाड्यांमध्ये आवश्यक ते बदल करून रेक्स परत (Redesign) वापरात आणावेत. हे सारे होण्यासाठी रेल्वेचे मुबई येथे स्वतंत्र व्यवस्थापन बोर्ड असावे की ज्यामुळे व्यवस्थापन, दुरुस्ती देखभाल, नव निर्माण अर्थाची तरतूद ई.गोष्टी विनाविलंब मार्गी लागतील असे वाटते. - रामकृष्ण विनायक अभ्यंकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

खोट्यांचा गवगवा, सत्याचा बागूलबुवा!