महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी लोकसंख्यावाढ रोखणे अनिवार्य !
मानवाच्या मूलभूत गरजा पुरवणारे नैसर्गिक स्त्रोत मय्राादित असल्याने वाढत्या लोकसंख्येचा ताण त्यावर पडत आहे. शहरासारख्या ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांची संख्या आणि क्षमता मय्राादित आहे. अल्प पावसामुळे ही जलाशये भरली नाहीत तर पाणीकपातीचे संकट ओढवते. शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे हे संकट वर्षागणिक अधिक भयावह होऊ लागले आहे. शहरांतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता या विकासकामांना पर्याय नाही. त्यामुळे ग्रामीण भागांत अधिकाधिक रोजगारनिर्मिती करणे यासोबत देशातील वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण आणणे आज अत्यंत आवश्यक बनले आहे.
जागतिक पर्यावरण दिन नुकताच साजरा झाला. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे हे कोणत्याही देशाच्या सरकारपुढील मोठे आव्हान असते. भारतही त्याला अपवाद नाही. विज्ञानाने वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे देशातील मृत्युदर कमालीचा घटला आहे याउलट वाढत्या लोकसंख्येवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. चीनमध्ये वाढती लोकसंख्या देशाच्या विकासावर परिणाम करत असल्याचे लक्षात येताच तेथील सरकारने लोकसंख्येवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु केले. १९७९ सालापासून चीनने एकल अपत्य धोरण देशभरात सक्तीने राबवले. ज्यामुळे सुमारे ४०० दशलक्ष नवीन जन्म चीनला रोखता आले. भूभागाच्या बाबतीत भारताच्या तीन पटीने मोठ्या असलेल्या चीनने लोकसंख्येच्या बाबतीत मागील अनेक दशकांपासून आपले नाव पहिल्या क्रमांकावर कायम ठेवले होते. वाढत्या लोकसंख्येमुळे देशाचा विकास खुंटत असल्याचे लक्षात आल्यावर मात्र चीनने ती रोखण्यासाठी पुष्कळ मेहेनत घेतली. एप्रिल २०२३ मध्ये भारत हा जगातील सव्रााधिक लोकसंख्या असलेला देश बनला. विकासाच्या नावावर मते मागणाऱ्या मोदी सरकारने वाढती लोकसंख्यावाढ हा विकासातील सर्वात मोठा अडथळा असल्याचे लक्षात येऊनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. या वाढत्या लोकसंख्येच्या आधारे देश जगातील चवथ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनला आहे असेही काही जाणकारांचे मत आहे.
मानवाच्या मूलभूत गरजा पुरवणारे नैसर्गिक स्त्रोत मय्राादित असल्याने वाढत्या लोकसंख्येचा ताण त्यावर पडत आहे. शहरासारख्या ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांची संख्या आणि क्षमता मय्राादित आहे. अल्प पावसामुळे ही जलाशये भरली नाहीत तर पाणीकपातीचे संकट ओढवते. शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे हे संकट वर्षागणिक अधिक भयावह होऊ लागले आहे. रोजगारासाठी लोकांचे लोंढेच्या लोंढे प्रतिदिन शहराकडे धाव घेतात. ज्यामध्ये परप्रांतीयही असतात आणि बांगलादेशी घुसखोरही असतात. यांच्या निवासासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि झोपडपट्टी दादा यांच्या आशीर्वादाने ठिकठिकाणी अनधिकृत वस्त्या आणि झोपडपट्या निर्माण होऊ लागल्या आहेत. मतांच्या लाचारीसाठी हे स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासाठी वीज आणि पाणी यांसह कागदपत्रांची आणि रोजगाराची सोयही करून देतात. वाढत्या उद्योगधंद्यासह शहरांतील श्रीमंतांची संख्याही वाढल्याने शहरांत ठिकठिकाणी टोलेजंग इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. या सर्वांसाठी झाडांची आणि नैसर्गिक संपत्तीची सर्रासपणे कत्तल केली जात आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतुकीची साधने अपुरी पडू लागली आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी लोकल ट्रेनमधील गर्दी पाहता त्यातील प्रवास म्हणजे मृत्यूचा खेळ झाला आहे. चालत्या गाडीतून पडल्यामुळे प्रतिदिन कितीतरी अपघात होतात; मात्र हा धोका पत्करण्याशिवाय चाकरमान्यांकडे अन्य पर्याय नसतो. लोकल रेल्वेला पर्याय म्हणून शहरांमध्ये आलेले प्राथमिक टप्यातील मेट्रो रेल्वे आणि मोनो रेल्वे हे प्रकल्पही अपुरे पडू लागले आहेत. त्यामुळे आता शहरांत ठिकठिकाणी मेट्रो प्रकल्पाचे जाळे उभारण्याचे काम सुरु झाले आहे. हे मेट्रोमार्ग तयार करण्यासाठी पुन्हा रस्ते खोदले जात आहेत. शहरांतील वाढत्या संख्येच्या तुलनेत रस्त्यांची रुंदी कमी पडू लागल्याने आता ठिकठिकाणी रस्ते रुंदीकरणाची कामेही सुरु करण्यात आली आहेत. शहरांतील ठराविक ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अशा भागांत नवनवीन उड्डाणपुलांची कामेही सुरु झाली आहेत. हे सर्व कमी पडते म्हणून आता सागरी सेतू उभारले जाऊ लागले आहेत. भूमीच्या आणि समुद्राच्या खालूनही भुयारी मार्ग आणि मेट्रो प्रकल्प उभारण्यात आले आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर सुरु असलेले मेट्रो प्रकल्प, उड्डाणपुलाची कामे आणि रस्ते रुंदीकरणाची कामे यांमुळे सकाळ आणि संध्याकाळी वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या कोंडीत वाहन चालकांकडून अनावश्यक वाजवल्या जाणाऱ्या हॉर्न्समुळे रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावरील खोदकामांमुळे उडणारी धूळ, खोदकाम करणाऱ्या यंत्रांचे प्रचंड आवाज आणि गाड्यांचे कर्णकर्कश हॉर्न यांमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. ध्वनी आणि वायू या दोन्ही प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. याशिवाय शहरांत ठिकठिकाणी सुरु असलेल्या टोलेजंग इमारतींची कामे यांमुळेही प्रदूषणात भर पडत आहे.
रस्त्यावरील पुलांची कामे आणि इमारतींची उभारणी यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सिमेंट आणि तत्सम रासायनिक पदार्थांमुळे वातावरणातील हवेत विषारी धूलिकण पसरू लागले आहेत ज्यामुळे सर्वच विकसनशील शहरांतील हवेची गुणवत्ता घसरून त्याचा परिणाम मानवाच्या आरोग्यावर होत आहे. शहरातील नागरिकांना प्रतिदिन श्वासाबरोबर विषारी आणि प्रदूषणकारी हवा ग्रहण करावी लागत आहेत. गर्भवती स्त्रिया, दम्याचे रुग्ण, वयोवृद्ध आणि लहान मुले यांना या प्रदूषित हवेचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. श्वसनविकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रोजगारासाठी शहरात येऊन निवृत्त झालेले नागरिक शहरांतील वाढत्या प्रदूषणामुळे निवृत्तीनंतर गावची वाट धरू लागले आहेत. शहरांतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता या विकासकामांना पर्याय नाही. त्यामुळे ग्रामीण भागांत अधिकाधिक रोजगारनिर्मिती करणे यासोबत देशातील वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण आणणे आज अत्यंत आवश्यक बनले आहे. लोकसंख्यावाढ वेळीच रोखली गेली नाही तर भविष्यात देशातील समस्त शहरे मृत्यूची केंद्रे बनल्या वाचून राहणार नाहीत. जगन घाणेकर