महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
मधुबाला
एक काळ गाजवलेला शिस्तबध्द अभिनेता जितेंद्र यानें आपली कारर्कर्दि साऊथकडे बनलेल्या सिनेमातून घडल्याचे सांगितले. त्याला कारण तिकडच्या सिने इंडस्ट्रीत त्याने अनुभवलेली शिस्तबद्ध काम करण्याची पद्धत! त्याचा हिंदी फ़िल्म इंडस्ट्रीत अभाव जाणवतो. जयंत, जयराज, बिना राय, शोभना समर्थ सारखी तगडी कलाकार मंडळी हिंदी सिनेमात काम करण्यासाठी म्हणून कायम मुंबई-मद्रास प्रवास करू लागली. त्या काळात मद्रास मध्यें बनवल्या जाणाऱ्या हिंदी फिल्मची खरी सुरुवात मधुबाला या गुणी हिरॉईनने करून दिली. आज या गुणी कलाकाराचे हिंदी सिनेसृष्टीने आभार मानले पाहिजेत..
देश स्वतंत्र झाला आणि ठीक एक वर्षांने दाक्षिणात्य चित्रपट निर्माते एसएस वासन आपल्या ‘जेमिनी पिक्चर्स'च्या माध्यमातून प्रथमच एक हिंदी सिनेमा तयार करू लागले. ज्यामध्ये इतर सर्व कलाकार दाक्षिणात्य असले तरी त्यामध्ये यशोधरा काटजूचा समावेश होता, हे विशेष! ‘जेमिनी पिक्चर्स' कंपनीने तद्नंत १९५१ मध्यें आणखी एक हिंदी सिनेमा संसार काढला. ज्यामध्ये हिंदी फिल्म इंडस्ट्रीचे आगा आणि डेव्हिड या महान कलाकारांचा समावेश होता. ‘जेमिनी' ही फिल्म कंपनी दाक्षिणात्य (मद्रास) असली तरी त्यांनी हिंदी भाषेत अनेक गाजलेले सिनेमे निर्माण करून पारिवारिक, साफ सुथरी, निखळ फ़िल्म देण्याचे श्रेय ह्याच कंपनीस जाते. तसेच ‘एव्हीएम' ही फिल्म कंपनीदेखील दाक्षिणात्य असूनही हिंदी सिनेमात त्यांचे नांव आजही आदराने घेतले जाते. पंडित मुखराम शर्मा हे अशा फिल्म कंपनीचे कायम संवाद तसेच कथा लेखक ठरलेले असायचे. साऊथवाल्यांची हिंदी फिल्म म्हणजे कौटूंबिक जिव्हाळा जपणारी कथा, शास्त्रीय नृत्य, उत्तम गीत-संगीत आणि कमी खर्चात तयार केलेला कौटुंंबिक फिल्मी मसाला, म्हणजे मुंबई व्हाया मद्रास फार्म्युला होय! ज्याने फिल्मी माहोल एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवला.
‘एव्हीएम मोशन पिक्चर्स' कंपनीने १९५१ ला ‘बहार' नामक सिनेमा प्रोड्युस केला. ज्यामध्ये करण दिवान, प्राण, गोप, ओमप्रकाश, सूंदर इत्यादि त्यावेळचे नामवंत कलाकार सामिल होते. जेमिनी फिल्म कंपनीने एक पाऊल पुढें टाकत १९५४ मध्यें मुबंई येथील चक्क मधुबाला या नामवंत अभिनेत्रीला साईन करून साऱ्यांनाच गोड धक्का दिला. ‘बहुत दिन हुए' असं नांव होतं त्या सिनेमाचं! मधुबाला त्यावेळी हिंदी इंडस्ट्रीच्या सुपरस्टारपदी विराजमान होती. बोलका चेहरा, हसीन मुस्कान, संवाद बोलण्यातली ती वेगळी लकब, विनोदाची उत्तम जाण, रोमँटिक, ट्रॅजेडी, कॉमेडी सर्वच स्तरावर उमदा ठरलेली ही अभिनेत्री सिनेमा जगतात विशेष ओळखली जायची ती अमर मधुबाला. हा सन्मान तत्पुर्वी आणि तद्नंतर आजही कुणास मिळाला असेल असं नाहीं वाटत.
मधुबालाचा ‘मिस्टर अँड मिसेस ५५' कॉमेडीचा अफलातून नमुना. गुरुदत्त सारख्या देवदास वृत्तीच्या (इमेज) हिरो समवेत नायिका म्हणून काम करणारी मधुबाला तसेच ओपीच्या संगीतावर बिनधास्तपणे थिरकणारी मादक सौंदर्य लाभालेली मधुबाला. तो सिनेमा युट्यूबवर कितीतरी वेळा पाहिला असेन मात्र आजही रंजक, सजीव वाटतो.
चॉकलेटी स्वभावाने बेहाल करणाऱ्या देव आनंदने मधुबाला समवेत फिल्म करणं म्हणजे त्यावेळच्या तरुणाईस मिळालेली मनोरंजक मेजवानीच. पुढे मधुबालाचा समावेश ‘मुघल-ए-आझम' मध्यें अनारकली म्हणून होताच त्या फ़िल्मची एकूण क्रेडेबिलिटी कीती वाढली गेली हे वेगळे सांगणे नको. ऑफ स्क्रीन दिलीप-मधुच्या रोमांसचे गॉसिप यांनी प्रसिद्ध ऐतिहासिक मल्टी स्टारर फ़िल्मला खूप उंचीवर नेऊन ठेवलं. त्यावेळचे पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार, के आसिफ, नौशाद, शकील ही नावं आणि त्यांत मधुबालाचा समावेश, आहाहा... सोने पे सुहागा!! सलिम-अनारकली युगुलाची प्रणयदृश्ये, संगीत, गायन, नृत्य आणि अस्खलित रेश्मी उर्दूतले ते अर्थपूर्ण संवाद...
"अनारकली...एक अदना कनिझने हिंदुस्थानके अजीमुशयान बादशाह अकबर-ए- आझम क अपना खून मुआफ किया"
अशा जबरदस्त ताकदीच्या मल्टी टॅलेंटेड नायिकेमुळे हिंदी सिनेमा खूपच सशक्त झाला. उर्दू भाषा, त्यांतील शायरी, संवाद हा त्याकाळी असलेला खजिना आता चक्क पंजाबी उडत्या चाली आणि न कळणाऱ्या शायरीतून व्यक्त होतांना दिसतो. सिनेमा हिंदी असो मराठी असो...संगीत ठेका आणि शब्द थेट बल्ले बल्ले... पंजाबी!! असं का? हा प्रश्न आजमितीला निरुत्तरीत आहे.
‘आझाद' साऊथ मधून हिंदी सुपर स्टारना घेऊन बनवलेली यशस्वी कॉमेडी फिल्म! ज्यामध्ये दिलीप कुमार, मीना कुमारी, प्राण, ओमप्रकाश असे नामवंत कलाकार होते. आजही हा सिनेमा यु-ट्यूबवर पाहतांना खळखळून हसू येतं. १९५५ मध्यें अशीच एक नामवंत जोडी दिलीप कुमार-देव आनंद यांना दाक्षिणात्य फिल्म कंपनीने ‘इंसानियत' नामक हिंदी सिनेमात एकत्र आणून बॉक्स ऑफिसवर आर्र्थिक यशाची उच्च मांडणी करून साऱ्यांना चकित केले. हा त्याकाळी चमत्कार ठरला असावा. कारण देव आनंद इंडस्ट्रीतला नामवंत अदाकार होता. तोलामोलाचे आणखीन एक नाव म्हणजे दिलीप कुमार. या दोघांना एकत्र आणणे हे ततपूर्ती आणि इंसानियत नंतर कुणालाच शक्य झाले नाही, हे विशेष!
एका मुलाखतीत जितेंद्र यानें आपली कारर्कर्दि साऊथकडे बनलेल्या सिनेमातून घडल्याचे सांगितले. त्याला कारण तिकडच्या सिने इंडस्ट्रीत त्याने अनुभवलेली शिस्तबद्ध काम करण्याची पद्धत! त्याचा हिंदी फ़िल्म इंडस्ट्रीत अभाव जाणवतो. जयंत, जयराज, बिना राय, शोभना समर्थ सारखी तगडी कलाकार मंडळी हिंदी सिनेमात काम करण्यासाठी म्हणून कायम मुंबई-मद्रास प्रवास करू लागली. त्या काळात मद्रास मध्यें बनवल्या जाणाऱ्या हिंदी फिल्मची खरी सुरुवात मधुबाला या गुणी हिरॉईनने करून दिली. आज या गुणी कलाकाराचे हिंदी सिनेसृष्टीने आभार मानले पाहिजेत... जे तत्कालीन राज्यकर्त्याना जमले नाहीं ते एका स्त्रीने सिनेमाच्या माध्यमातून सिद्ध केले...मुंबई हो या मद्रास....हिंदी झिंदाबाद!!
संदर्भ : उर्दू मॅगेझिन शमा १९९४
- इक्बाल शर्फ मुकादम