महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
कृतज्ञ वट (वड)
हिंदू परंपरेत अनेक पतीव्रता होऊन गेल्या. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी या आदर्श पंचकन्या आहेत. त्यांचे रोज नित्य स्मरण केले जाते, त्यात सावित्री ही आदर्श मानली गेली आहे. म्हणूनच एखादी सौभाग्यवती स्त्री वडीलधाऱ्या मंडळींना जेव्हा खाली वाकून नमस्कार करते तेव्हा जन्म सावित्री हो असा तिला आशीर्वाद दिला जातो. पतिव्रता सावित्रीच्या कसोटीस उतरण्याची घटना या वटवृक्षाखाली घडली, तो वृक्ष परळी वैजनाथ या स्थानी साक्षीदार म्हणून उभा आहे. वटवृक्षाखाली आसरा घेणाऱ्या पांथस्थाना शीतलता त्यामुळे लाभते. उन्हापासून सावली व शांती मिळते. वटवृक्षाच्या पारंब्या जमिनीत घुसून परत नवीन वृक्ष बनतो.
आपल्या भारतीय संस्कृतीत बरेच दिनवार संस्मरणीय आहेत. कसली ना कसली तरी ती कृतज्ञतेची ती यादगार आहे, त्यापासून भावी पिढीने उत्तम आदर्श घ्यावा व आपली पुरातन परंपरा कायम ठेवावी हीच त्यामागील संकल्पना आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही तिथी म्हणजे वटपौर्णिमा म्हणून सर्वत्र मानली जाते. पातिव्रत्येची कसोटी म्हणजे सत्यवान सावित्री की कथा त्या मागे आहे. बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ बारा ज्योतिर्लिंगापैकी एक शिवस्थान असून पतिव्रता सावित्रीच्या कसोटीस उतरण्याची घटना या वटवृक्षाखाली घडली, तो वृक्ष परळी वैजनाथ या स्थानी साक्षीदार म्हणून उभा आहे.
घरासाठी ,मुलांसाठी ,पतीसाठी सदैव राबणारी स्त्री रस्ता गृहस्थी जीवनात मोठे कार्य करीत असते. संसारातील पती-पत्नी संसार रथाची दोन चाके सदैव कार्यरत असतात. संपन्न, संस्कारी, धर्मवान, निष्ठावान अशी प्रजा निर्माण होण्यासाठी अखंड सौभाग्यवती हो हा पत्नीला दिलेला आशीर्वाद दूरगामी दृष्टीच्या विचार करता अत्यंत महत्त्वाचा ठरतो. तेव्हा सावित्री म्हणजे भारतीय संस्कृती अखंड सौभाग्याचे प्रतीक होय. स्त्रीचे पातिव्रत्य जाज्वल्य ,सच्चे ,निर्दोष, असेल तर ती बरंच काही करू शकते. सत्यवान सावित्री च्या द्वारे वा अनुसया जमदग्नीच्या द्वारे समजते.
कथा भद्र देशाचा अश्वपती नावाचा निःसंतान राजा होता. अपत्यप्राप्तीसाठी त्याने घोर तप केल्यावर ब्रह्मदेव व पत्नी सावित्री त्यास प्रसन्न झाली व त्यांच्या कृपेने राजाला सावित्री नावाची कन्या झाली तिचे तेज पाहून लग्नासाठी येणारे अन्य राजपत्र घाबरून जात असत. शास्व देशाचा राजा हुम्सेन अंध असल्याने शत्रूंनी त्याचे राज्य बळकावून त्याची पत्ती व एकुलता एक मुलगा सत्यवान यांना रानात हाकलून दिले. सावित्रीशी तो लग्न करण्या तयार झाला; पण तो अल्पायुषी असल्याचे नारद मुनीकडून कळूनही सत्यवानाशी सावित्री विवाहबध्द झाली. एकदा अशीच ती सत्यवान सोबत लाकडे तोडण्यास गेली असताना सत्यवानचा अंतिम क्षण येऊनपोचल्याने प्रत्यक्ष यमराज त्याचे प्राण नेण्यास आले. त्याचे मागोमाग गेली व आपल्या चतुर भाषणाने पातिव्रत्याच्या प्रभावाने यमराजाकडून सासरची गेलेली दृष्टी, गेलेले राज्य, पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वडाखाली सत्यवान गतप्राण झाला पण नंतर सजीव झाला तो दिवस ज्येष्ठ पौर्णिमेचा होता. वृक्षाखाली हा प्रकार घडला म्हणून त्या तिथिस वटपौर्णिमा असे म्हणतात. आपले सौभाग्य अखंड रहावे, आपला संसार संपन्न असावा, वैभव, संतती, संपत्ती, घरदार, इ.नी आपला संसार फुलून जावा जावे म्हणून या दिवशी सुवासिनी वटाची पूजा करतात व वटास धाग्याने बांधतात प्रेमाचा बंध..
आरोग्यादायी वट आरोग्याच्या दृष्टीने वट वृक्ष खूप महत्त्वाचा आहे. वटवृक्षाखाली आसरा घेणाऱ्या पांथस्थाना शीतलता त्यामुळे लाभते. उन्हापासून सावली व शांती मिळते. वटवृक्षाच्या पारंब्या जमिनीत घुसून परत नवीन वृक्ष बनतो. कलकत्ता/मद्रास या मोठ्या बोटयानिकल गार्डनमध्ये पुरातन वटवृक्ष जतनकरून ठेवलेला आहे ,सुमारे हजार वर्षांपूर्वीचा हा वटवृक्ष आपल्या अनेक पिढ्यांचं उभा आहे .वटाची शीतलता,क्षमाशीलता व विशालकाय प्रवृत्ती .दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य इ.इ. आपल्याला बरेच शिकवून जातात. त्या वटा प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वटाचे पूजन केले जाते. हल्ली पातिव्रत्याचा फारसा विचार केलाजात नसतो. महिलावर्ग उत्तम उत्तम कपडे दागदागिने केवळ मिरवणे म्हणून महिलावर्ग वट पूजन जास्त पसंतकरतो. वास्तविक पतीवरील प्रेम, माया, जिव्हाळा ,संसारातील कार्य .कर्तव्य ,इ.इ. या विचारांची खरी गरजअसते व वटास साक्षी ठेवून कुटुंबास उत्तम आयुरारोग्य, वैभव, कीर्ती यांची मागणी मनात करायची असते.
स्त्रीपुरुष सर्वत्र समानता असल्याने प्रत्येकजण आपली कर्तव्ये त्या जबाबदाऱ्या पासून दूर जाऊ लागला व नको इतका तात्काल सुख देणाऱ्या चंगळवादाकडे चिकटू लागला, त्याचा परिणाम हल्ली घराघरातील विकोपाला गेलेले भांडणे, घटस्फोट, अस्थिरता, फाटाफुट आदी प्रकर्षाने जाणवत असते. सारे कुटुंब व्यवस्था त्यामुळे बिघडू पाहत आहे. दुसरे असे की वडाच्या पूजनासाठी घराघरातून वडाच्या फांद्या तोडून त्याचे वस्ती वस्तीतून पूजन केले जाते, वास्तविक या कृतीने आपण किती वृक्षतोड करीत असतो, ह्याचे आपल्याला भान राहत नाही. वृक्षतोड म्हणजे पर्यावरणाचा तोल बिघडवणे होय. याचा आदर्श मनात ठेवून भिंतीवर त्याचे नुसते चित्र काढून पूजन केले तरी चालू शकेल. त्यामागील आपल्या हिंदू परंपरेतील संकल्पना ध्यानी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. - रामकृष्ण विनायक अभ्यंकर