‘महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वांनी मराठी भाषा आत्मसात केली पाहिजे' -  देवेंद्र भुजबळ            

नवी मुंबई : रोटरी इंटरनॅशनल संस्थेच्या रोटरी क्लब, नवी मुंबई सी साईडच्या वतीने  व्यावसायिक नैपुण्य पुरस्कार राज्याचे माजी माहिती व जनसंपर्क संचालक व माध्यमकर्मी देवेंद्र भुजबळ यांना प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देतानो श्री. भुजबळ म्हणाले की, भारतातील भाषा वैविध्य पाहून भारत सरकारने त्रिसूत्री भाषा धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे तसेच ज्या भागात आपण राहतो, त्या भागातील स्थानिक भाषा आत्मसात केल्यास त्या भागाचा इतिहास,भूगोल, साहित्य, संस्कृती, समाजमन आपण अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. आपण आपल्या नोकरी, व्यवसायात सुद्धा अधिक प्रगती करु शकतो. त्यामुळे महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वांनी मराठी भाषा आत्मसात केली पाहिजे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रविंद्र औटी यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव