महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
शिक्षण प्रसारक विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात उत्तुंग यश
नवी मुंबई : नेरूळ येथील एन आर बी एज्युकेशनल सोशल अँड कल्चरल ट्रस्ट संचलित शिक्षण प्रसारक विद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असते. त्यामुळे या शाळेचे विद्यार्थी विविध शैक्षणिक उपक्रमात भरीव कामगिरी करत असतात.
नुकतेच ७ फेब्रुवारी २०२५ रोजी राकेश जैन हायस्कूल शिवकर पनवेल येथे सेवा सहयोग फाउंडेशन यांच्यातर्फे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनात नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील 50 शाळा सहभागी झाल्या होत्या.
या विज्ञान प्रदर्शनात शिक्षण प्रसारक विद्यालय माध्य. नेरूळ, नवी मुंबई या शाळेतील कार्तिक गणेश इंगोले, करण गजभार, रोहित म्हात्रे या विद्यार्थ्यांनी सुरक्षा विजेच्या धक्क्यापासून या प्रकल्पाला माध्यमिक गटातून पहिला क्रमांक मिळाला. या प्रकल्पाची संकल्पना आणि मार्गदर्शन विज्ञान शिक्षक शेखर शांताराम जगताप यांचे होते. प्राथमिक विभागातून देखील शिक्षण प्रसारक विद्यालयाच्याच सुरक्षित लोकल प्रवास या प्रकल्पाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. सौ.वृषाली परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेया सगळे रिया पाटेकर समृद्धी सोनटक्के या विद्यार्थिनींनी हा प्रकल्प सादर केला होता.
याप्रसंगी सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार देखील शिक्षण प्रसारक विद्यालय नेरूळ नवी मुंबई या शाळेला देण्यात आला.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण व्हावी आणि या विद्यार्थ्यातूनच भावी शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत या उद्देशाने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, शाळेच्या या उत्तुंग यशाबद्दल शिक्षण प्रसारक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष नामदेव भगत, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कोठेकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. वंदना पाटील आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी शाळेच्या बालवैज्ञानिकांचे कौतुक आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.