नमो चषक अंतर्गत खारघर मध्ये आजपासून क्रिकेट स्पर्धा

पनवेल : भारतीय जनता युवा मोर्चा, पनवेल तर्फे पनवेल विधानसभा मतदारसंघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, उत्तर रायगड जिल्हा भाजपाध्यक्ष अविनाश कोळी, युवा नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक-२०२५ स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, नमो चषक अंतर्गत खारघर सेक्टर-१४ मधील जय हनुमान चेरोबा बापदेव मैदानात ६ ते ९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान दिवस-रात्र वेळेत भव्य दिव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

क्रिकेट स्पर्धा मध्ये २४ संघ खेळणार असून, या स्पर्धेतील विजेत्या संघाला १ लाख ११ हजार १११ रुपये, उपविजेत्या संघाला ५५ हजार ५५५ रुपये तर तृतीय क्रमांक विजेत्या संघास ३३ हजार ३३३ रुपये तसेच मॅन ऑफ दि सिरीज विजेत्या क्रिकेट पटूला दुचाकी मोटारसायकल आणि दररोज प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ मध्ये एक दुचाकी सायकल अशी भरघोस पारितोषिके आहेत.

या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आज ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता होणार असून, यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार निरंजन डावखरे, आमदार विक्रांत पाटील, ज्येष्ठ भाजपा नेते बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हा भाजपाध्यक्ष अविनाश कोळी, युवा  नेते तथा मुख्य स्पर्धा आयोजक परेश ठाकूर, पनवेल तालुका भाजपाध्यक्ष अरुणशेठ भगत, उत्तर रायगड जिल्हा भाजपा सरचिटणीस नितीन पाटील, ॲड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, ‘भाजपा'चे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे. या क्रिकेट स्पर्धेचा क्रिकेटप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन क्रिकेट स्पर्धेचे संयोजक भारतीय जनता पार्टी, खारघर आणि प्रवीण स्पोर्टस वेल्फेअर असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे.

Read Previous

6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान नवी मुंबई कोपरखैरणे येथे रंगणार एनएमपीएलचा थरार

Read Next

सानपाडा येथील किरण सिंहा संघ विजेता