‘मॉडर्न स्कुल'च्या ३ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

नवी मुंबई : मुंबई विभागीय शालेय कराटे स्पर्धेत वाशीमधील ‘मॉडर्न स्कुल'च्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

नुकतीच पालघर येथे शालेय विभागीय कराटे स्पर्धा घेण्यात आली. १७ वर्षाखालील ३६ ते ४० किलो वजनी गटात मॉडर्न स्कुलची विद्यार्थिनी श्रावणी राजू चिंचोलकर (९ वी) हिने प्रथम क्रमांक, ४० किलो वजनी गटात स्वरा महेश कदम (९ वी ) तर ७४-८४ किलो वजनी गटात संकल्प शिवाजी पाटील यांनीे प्रथम क्रमांक पटकावला आहे. सदर तिन्ही खेळाडू २८ ते ३० नोव्हेंबर रोजी धुळे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत.

ठाणे जिल्हास्तरीय टायकोंडो स्पर्धेत प्रशांत बबन सोळंके (११ वी), रुची नितीन कोरडे हिने द्वितीय (९ वी, द्वितीय), किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुशांत बाळू अंबिकर याने द्वितीय (१० वी ), कराटे स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील २६ ते ३० किलो वजनी गटात ईश्वरी राहुल पानसरे (६ वी) तृतीय, भावेश चौधरी (९ वी) याने द्वितीय, तनुजा जालिंदर अकतर (१० वी) हिने ३००० मीटर धावणे या स्पर्धेमध्ये प्रथम आणि १५०० मीटर धावणे स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकवला आहे. तर कुस्ती स्पर्धेमध्ये १० वी मधील सिध्दांत महादेव जाधव आणि वेदांत महादेव जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

दरम्यान, यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे ‘मॉडर्न स्कुल'च्या प्राचार्या सुमित्रा भोसले यांनी कौतुक केले. यावेळी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका हना सरेला, मनिषा सकपाळ, क्रीडा शिक्षिका प्राजक्ता, जयसिंग पवार आणि विद्यार्थी उपस्थित होते. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

‘वात्सल्य'ची लेक बनली लंडन युनिवर्सिटी पदवीधारक