महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
मॉडर्न स्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केलेला सागरी जीवसृष्टी प्रकल्प ठरला
नवी मुंबई: समुद्रातील जीव सुरक्षित राहून पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील मॉडर्न स्कूलच्या विद्यार्थिनींनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आविष्कार केला आहे. या प्रकल्पाचे नुकतेच बंगळुरूमध्ये आयोजित चेंजमेकर्स ऑफ टुमारो ग्लोबल इव्हेंटमध्ये सादरीकरण करण्यात आले.
शेल एनएक्सप्लोरर्सच्या वतीने बंगळुरू येथे चेंजमेकर्स ऑफ टुमारो ग्लोबल इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. शाश्वत भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी पुढच्या पिढीला एकत्र आणणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करीत मॉडर्न स्कूलच्या नववी इयत्तेत शिकणार्या प्रांजल उमेश भिलारे, अनुष्का पंचाळ या दोन विद्यार्थिनींनी बायो ब्लूम इन्व्हेस्टिगेटर प्रकल्पाची प्रतिकृती सादर केली.
पाण्यावर तरंगणारे शैवाल (एकपेशीय वनस्पती) सूर्यप्रकाश समुद्राच्या तळापर्यंत पोहचण्यापासून रोखतात आणि तेथील जीवसृष्टीच्या नाशासाठी कारणीभूत ठरतात. हे टाळण्यासाठी मॉडर्न स्कूलच्या विद्यार्थिनींनी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागावर एकपेशीय वनस्पती शोधून ती रोबोटच्या मदतीने काढून टाकण्यासाठी प्रतिकृती तयार केली आहे, जेणेकरून सूर्यप्रकाश खोल समुद्रात पोहचून पाण्याखालील जीव सुरक्षित राहतील. यामुळे केवळ शाळेचीच नव्हे, तर संस्था आणि राज्याचीही मान उंचावली गेली आहे.
या उपक्रमात महाराष्ट्रासह देशभरातून सुमारे तीन लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.यामध्ये एन एक्स शार्क तर्फे मॉडर्न स्कुल तर्फे सादर केलेल्या प्रतिकृतीची टॉप प्रोजेक्ट म्हणून निवड केली. त्याचप्रमाणे विजेत्यांना विद्यालयामध्ये रोबोटीक लॅब तयार करण्यासाठी निधी प्रदान करण्यात आला.
बेंगळुरु येथे पार पडलेल्या Shell’s Changemakers of Tomorrow कार्यक्रमाचे उद्घाटन कर्नाटक सरकारचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांच्या हस्ते झाले.
दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमास मुख्य तज्ञ, उद्योगातील नेते आणि नवोदितांना सहभागी झाले होते.