महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
बोधि ब्लेंडेड लर्निंग संस्थेकडून पांडवकडा येथे विद्यार्थ्यांसाठी जनजागृती मोहिम
नवी मुंबई : खारघर येथील पांडवकडा या ठिकाणी दरवर्षी होणाऱ्या अपघाती मृत्यूंच्या घटनेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने बोधि ब्लेंडेड लर्निंग संस्थेच्या वतीने गुरु पौर्णिमेनिमित्त रविवारी जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान, बोधि ब्लेंडेड लर्निंग च्या विद्यार्थ्यांनी खारघर सेक्टर 13 ते पांडवकडा अशी जागरुकता रॅली काढली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या बोधि ब्लेंडेड लर्निंग संस्थेच्या वतीने आयोजित या जनजागृतीपर कार्यमात पांडवकडा परिसरामध्ये एका छोटेखानी सभा भरवण्यात आली. यात विद्यार्थ्यांना व नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सतर्क राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱयांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन पांडवकडा येथे पर्यटनासाठी येणाऱया विद्यार्थी व तरुण तरुणींना सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले. यावेळी बोधि ब्लेंडेड लर्निंग तर्फे पांडवकडा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना पोलिसांनी दिलेल्या सूचना व नियमांचे पालन करण्याचे तसेच सुरक्षितता राखण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमात कामोठे येथील डीपीएस कॉलेजचे विद्यार्थी व शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला.