सीबीएसई दहावी परीक्षेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची सुवर्ण कामगिरी

पनवेल : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई मार्फत इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यशाच्या बाबतीत पुन्हा एकदा ‘जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था'च्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने बाजी मारली असून १०० टक्के यशाची परंपरा कायम ठेवत सुवर्ण यश संपादन केले आहे. या परीक्षेत अनन्या अरोरा या विद्यार्थिनीने तब्बल ९८. ६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आणि विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.

या परीक्षेसाठी विद्यालयातील २७६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यामध्ये अनन्या अरोरा हिने ९८. ६० टक्के, पाल पटेल ९७. ६० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक, ओजस पवार, अखिल दुबे आणि राशी अहाटे या तिघांनी प्रत्येकी ९७. ४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. ८२ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविले. तसेच आर्टिफिशियल इंटिलिजिएन्स अर्थात ए.आय. आणि डेटा सायन्स मध्ये १५ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवून नैपुण्य मिळवले. त्याचबरोबर गणित विषयात ४ आणि सोशिअल सायन्समध्ये २ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळविले.  

शैक्षणिक क्षेत्रात कायम उज्ज्वल कामगिरी करणारे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करीत आहे. त्यामुळेच या शाळेने यशाची परंपरा अखंडीत ठेवली आहे. सदर यशाबद्दल ‘संस्था'चे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

शासनाकडून नव्याने आरटीई २५ टक्के प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरु