करावे येथे ‘नमो चषक' क्रिकेट स्पर्धेचा थरार

नवी मुंबईः भारतीय जनता युवा मोर्चा, १५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघ आयोजित ‘नमो चषक' क्रिकेट स्पर्धेचे करावे येथील गणपत्शेठ तांडेल मैदानामध्ये मोठ्या थाटामाटात उद्‌घाटन संपन्न झाले.

ग्रामीण क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखला जाणारा नवी मुंबई शहर. या शहरामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाचा क्रिकेटचे वेड आहे. आपल्याकडे क्रिकेट खेळ नुसता पाहिला जात नाही, तर त्याहुनही मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. इथल्या गल्लीगल्लीत आपल्याला क्रिकेट खेळणारे जागोजागी दिसतात. त्याअनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘नमो चषक' आयोजित करण्यात अला आहे. ‘नमो चषक'च्या माध्यमातून तरुण खेळाडुंंना एक व्यासपीठ निर्माण होईल. तसेच काही खेळाडू राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन आपल्या ‘नवी मुंबई'चे नावलौकिक करतील, असे स्पर्धेच्या आयोजिका आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

या क्रिकेट स्पर्धेमध्ये ४० प्लस मधील ८ संघ खेळविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ खेळाडूंना देखील जास्त महत्व देण्यात आले आहे. दुसरीकडे ‘नमो चषक' क्रिकेट स्पर्धेमध्ये ५० हुन अधिक संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेमधील विजेत्या संघाला रोख १,५०,००० रुपये आणि आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला रोख १,००,००० रुपये आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्रक्षक यांना टिव्ही बक्षीस देण्यात येणार असून मालिकावीर खेळाडुला मोटारसायकल देण्यात येणार असल्याची माहिती आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली.

‘नमो चषक' क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी माजी नगरसेवक सुनील पाटील, अशोक गुरखे, डॉ. जयाजी नाथ, युवा उद्योजक दिपक बैध, राजू तिकोने, डॉ. राजेश पाटील, विकास सोरटे, राजेश पाटील, जयवंत तांडेल, प्रभाकर कांबळे, चंद्रकांत कोळी, ज्ञानेश्वर सुतार, प्रताप भोसकर, मणी अय्यर, स्वरुप पाटील, निलेश पाटील, सुभाष गायकवाड, सुनील मढवी, यशवंत पाटील, मनोहर पाटील, गुरुनाथ तांडेल, प्रवीण पाटील, सचिन नाईक, राकेश तांडेल यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Previous

6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान नवी मुंबई कोपरखैरणे येथे रंगणार एनएमपीएलचा थरार

Read Next

‘नमो चषक क्रिकेट स्पर्धा'ची सांगता