शिरवणे येथे इंडियन नॅशनल पॉवरलिपटींग स्पर्धा संपन्न

विविध राज्यातील २००पेक्षा जास्त खेळाडुंचा सहभाग

नवी मुंबई ः नवी मुंबई पॉवर लिपटर्स असोसिएशन आणि श्री गणेश व्यायाम शाळा शिरवणे यांच्या संयुक्त विद्यमाने ३० वी इंडियन नॅशनल पॉवरलिािंपटींग चॅम्पियनशिप (नॅशनल लेव्हल) स्पर्धा शिरवणे मधील श्री गणेश व्यायामशाळा येथे संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्‌घाटन आणि पारितोषिक वितरण ‘नवी मुंबई'चे माजी महापौर जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

या स्पर्धेमध्ये केरळ, आसाम, गोवा, छत्तीसगड, कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र राज्यातील मुले, मुली, महिला, पुरुष अशा २०० हुन अधिक खेळाडुंनी भाग घ्ोतला होता. पॉवर लिािंपटग स्पर्धेमध्ये
छत्तीसगड येथील ठाणेश्वर निषाद यांनी ज्युनिअर स्ट्राँग बॉय ऑफ इंडिया, गोवा येथील जोवेट्टी मॉनिस यांनी स्ट्राँग गर्ल ऑफ इंडिया, गोवा येथील रजत गाडेकर यांनी सिनियर स्ट्राँग मॅन ऑफ इंडिया, महाराष्ट्र येथील रश्मी
जिझिलवन यांनी सिनियर स्ट्राँग वुमन ऑफ इंडिया, कर्नाटक येथील ए. चंद्रप्पा यांनी स्ट्राँग मास्टर मॅन ऑफ इंडिया, महाराष्ट्र येथील शितल आनंद यांनी स्ट्राँग मास्टर वुमन ऑफ इंडिया, असा मानाचा किताब पटकाविला.
तसेच श्री गणेश व्यायामशाळा मधील खेळाडू तुषार गर्जे यांनी कांस्यपदक, मोहम्मद जिशान यांनी रौप्यपदक, फैसल अन्सारी यांनी रौप्यपदक, अथर्व कारंडे यांनी कांस्यपदक, जगदिश जैस्वाल यांनी कांस्यपदक, शुभम कुंभार
यांनी कांस्यपदक, विनीत माने यांनी रौप्यपदक, दस्तगीर यांनी सुवर्णपदक, जसविंदर सिंग बधेशा यांनी सुवर्णपदक, महिला गटात शितल शास्त्री यांनी सुवर्णपदक पटकावले.
याप्रसंगी माजी नगरसेविका माधुरी सुतार, वेदमुर्ती प्रविण जोशी (गुरुजी), ‘नॅशनल पॉवरलिपटींग फेडरेशन इंडिया'चे अध्यक्ष राजमहावीर सिंग, जनरल सेक्रेटरी लियो पीटर, उपाध्यक्ष श्यामबाबू मेहता, सुरेश साळवी, परविंदर

सिंग सैनी, कोषाध्यक्ष राकेश साहू, कोषाध्यक्ष, ‘'कर्नाटक नॅशनल पॉवरलिपटींग फेडरेशन इंडिया'च्या सेक्रेटरी लक्ष्मी देवी, संतोष कामटी, महेश पानसे, नॅशनल रेप्रÀी पी. एम. भोईर, संतोष नारसेकर, महेश गायकवाड,
एच. गुरुस्वामी, ऋषभ राठोड, शितल शास्त्री, विशाल सिंग, ओपी सिंग, एस. के. सामीउल, गुरजित सिंग सैनी तसेच विविध राज्यातून आलेले खेळाडू उपस्थित होते.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात कायदेविषयक व्याख्यानमाला