पनवेल विधानसभा क्षेत्रात गुंजणार ‘नमो चषक'

पनवेल : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी आणि देशाचा झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात ‘नमो चषक' स्पर्धा होणार आहे. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात भव्य क्रीडा, कला आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.  या अंतर्गत खारघर मॅरेथॉन, क्रिकेट, कुस्ती, कबड्डी, सायक्लोथॉन, कॅरम, खो-खो, बुध्दीबळ या क्रीडा स्पर्धा तसेच नृत्य, चित्रकला, गायन, वक्तृत्व या कला स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

‘नमो चषक' अंतर्गत १३ जानेवारी रोजी खारघर येथे सायक्लोथॉन आयोजित करण्यात आली आहे. तर १५ जानेवारी पासून खुल्या गटातील दिवस-रात्र टेनिस क्रिकेट स्पर्धा कळंबोली मधील भव्य मैदानावर होणार आहे. स्पर्धा प्रवेश विनामूल्य असून सर्व खेळाडुंना आकर्षक टी-शर्ट आयोजकांतर्फे देण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास १ लाख रुपये आणि आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला ५० हजार रुपये आणि चषक देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी सहभाग नोंदविण्याची अंतिम तारीख १० जानेवारी असून त्यासाठी तेजस जाधव -९५९४९४५०८९, विकी टेकवडे -८३६९८८३०१० किंवा आयुष मळेकर -९१३७२९८४८४ यांच्याशी संपर्क साधावा. तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि माहितीसाठी https://namochashak.in या संकेत स्थळाला भेट द्यावी.

आपल्या देशाच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वस्व अर्पण केले आहे. फक्त आपल्याच देशाला नाही तर संपूर्ण संपूर्ण जगाला त्यांचा अभिमान आहे. त्या अनुषंगाने ‘नमो चषक' विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमुळे युवा पिढीला सांस्कृतिक, कला आणि क्रीडा स्पर्धेकडे आकृष्ट करता येणार असून पनवेल विधानसभा क्षेत्रात २५ हजार पेक्षा जास्त स्पर्धकांना सहभागी करण्याचे उद्दिष्ट आहे. -आमदार, प्रशांत ठाकूर-पनवेल. 

Read Previous

6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान नवी मुंबई कोपरखैरणे येथे रंगणार एनएमपीएलचा थरार

Read Next

पनवेल मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची निर्मिती