रा. फ. नाईक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न

क्रीडा महोत्सवात रा.फ. नाईक विद्यालयाच्या खेळाडूंचा तडफदार खेळ

नवी मुंबई : सालाबादप्रमाणे यंदाही कोपरखैरणे येथील  रा. फ. नाईक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव २७ डिसेंबर रोजी संपन्न झाला. पाच दिवस सुरू असलेल्या विविध क्रीडा प्रकारात सांघिक आणि वैयक्तिक पातळीवर सर्वच विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य आणि कुशलता पणास लावत खेळ केले. समाजसेवक सदानंद म्हात्रे, लिलाधर नाईक, रॉबिन मढवी आणि संस्था प्रशासकीय अधिकारी नरेंद्र म्हात्रे  यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सुरू झालेला क्रीडा महोत्सव संपन्न झाला.

यावर्षी कबड्डी, खो खो, क्रिकेट हे सांघिक तर कॅरम आणि बुद्धीबळ हे वैयक्तिक खेळ घेण्यात आले. खूप अटीतटी, चुरस आणि संघभावना जपत, जोपासत हे सामने झाले. सर्व क्रीडा प्रकारातील सर्वच अंतिम विजेते यांना प्रशस्ती पत्र शालेय व्यवस्थापन समिती प्रमुख सौ.ज्योती माळी, विविध विभाग प्रमुख सौ.सीमा म्हात्रे, पवार मॅडम, सौ चौधरी मॅडम, क्रीडा शिक्षक, शिक्षक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. येणाऱ्या काळात महिला आणि पुरुष क्रिकेट संघ कबड्डी तसेच खो खोप्रमाणे या विद्यालयात घडवले जातील, असे मुख्याध्यापक रविंद्र पाटील यांनी सांगितले. स्पर्धा संपन्न होण्यासाठी क्रीडा शिक्षक श्री.गोंधळी सर, पष्टे सर, पुजारी सर, शिकारे सर, शुभम सर, फाळके सर, वहिदा कुरेशी मॅडम, पळणीटकर सर, क्रीडाप्रेमी सचिन भोसले, विनोद पवार आणि ग्रिफीन जिमखानामधील पंचांनी चोख कामगिरी बजावली. संस्था अध्यक्ष संदीप नाईक यांनी या प्रकारच्या क्रीडा महोत्सव मधूनच आपणास उद्याचे क्रीडा खेळाडू गवसत असतात, तेच पुढे जाऊन राज्य आणि देश पातळीवर खेळत, संस्था आणि राज्याचे नाव मोठे करत असतात असे नमूद केले. 

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

एक धाव अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी!