नवी मुंबई पोलीस क्रिकेट क्लबची टाईम्स क्रिकेट स्पर्धेच्या क गटाच्या उप उपांत्य फेरीत धडक  

टाईम्स ढाल कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेत नवी मुंबई पोलीस क्रिकेट, मुंबई पोलीस क्रिकेट क्लबचा उप उपांत्य फेरीत प्रवेश

नवी मुंबई : आशिया खंडातील सर्वात जुनी व प्रसिध्द अशा टाईम्स ढाल कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेत नवी मुंबई पोलीस क्रिकेट, मुंबई पोलीस क्रिकेट क्लबने क गटात खेळताना बलाढय संघांना हरवून उप उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. क गटात 16 संघांचा समावेश असून त्यात मुंबई पोलीस जिमखाना, युनियन बॅंक, बॅक ऑफ इंडीया, हिंदुस्तान पेट्रोलियम, अशा बलाढय पुर्व अनुभव असलेल्या संघांचा सहभाग आहे. विशेष म्हणजे गेली तीन वर्ष नवी मुंबई पोलीस क्रिकेट क्लब नियीमत सराव, नेट प्रॅक्टीस, फिटनेस या गोष्टी पूर्णपणे बंद असतानाही लक्षवेधी कामगीरी करुन संघाने उप उपांत्य फेरीत प्रवेश केल्याने संघाचे सर्व क्रिडा स्तरातून अभिनंदन होत आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे माजी पोलीस आयुक्त अहमद जावेद यांच्या संकल्पनेतून 11 नोव्हेंबर 2011 रोजी नवी मुंबई पोलीस क्रिकेट क्लबची स्थापना झाली असून सदर क्लब मुंबई क्रिकेट संघटनेत नोंदणीकृत संलग्न कार्यालयीन क्लब म्हणून मान्यताप्राफ्त आहे. या संघात खेळणारे खेळाडू पोलीस शिपाई हे पेण, पनवेल, उरण, रायगड या ग्रामिण भागातले असुनही या संघाने गेल्या 12 वर्षात मुंबई क्रिकेट संघटनेच्या अनेक मान्यताप्राफ्त क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे नाव क्रिडा क्षेत्रात उज्ज्वल केले आहे. विषेश म्हणजे संघाच्या या लक्षवेधी कामगिरीची दखल भारतरत्न सचिन तेंडुलकर, भारतीय पूर्व कर्णधार व भारतीय निवड समीतीचे अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी प्रत्यक्ष संघास भेटून संघाची दखल घेतली आहे.

यावर्षी या संघाने उप उपांत्य फेरीत प्रवेश केला असून त्यात कर्णधार पोलीस हवालदार अरुण घोगरे तसेच उप कर्णधार पोलीस हवालदार अमित वाडकर यांनी लक्षवेधी कामगिरी केली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे सध्याचे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे हे स्वत: एक खेळाडू असल्याने त्यांचे संघातील सर्व खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन लाभेल अशी खात्री या संघातील खेळाडुंकडुन व्यक्त करण्यात येत आहे. सदर संघास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष शिंदे हे प्रशिक्षक व मार्गदर्शन करीत असून त्यांनीच 2011 साली नवी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अहमद जावेद यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाची बांधणी केली होती. 

 

Read Previous

6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान नवी मुंबई कोपरखैरणे येथे रंगणार एनएमपीएलचा थरार

Read Next

पनवेल विधानसभा क्षेत्रात गुंजणार ‘नमो चषक'