प्रणव दिवेकरचे सुयश

शेतकरी शिक्षण संस्था घणसोलीचा प्रणव दिवेकर धावण्याच्या स्पर्धेत तिसरा

नवी मुंबई : शेतकरी शिक्षण संस्था इंग्रजी माध्यम, घणसोली या विद्यालयात शिकणाऱ्या इयत्ता नववी ब मध्ये शिकणारा विदयार्थी कु. प्रणव अभय दिवेकर याने प्रियदर्शनी संस्थेमार्फत आयोजित केलेल्या रनिंग रेस या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे.

या यशाबद्दल विद्यालयाचे अध्यक्ष डी.बी. म्हात्रे, सचिव पी. के. म्हात्रे, खजिनदार प्रभाकर पाटील, सुविध म्हात्रे इतर पदाधिकारी यांनी त्याचे कौतुक केले. प्रणवला मार्गदर्शन करणारे पी. टी. चे शिक्षक राजेश चंद्रकांत शेळके यांचेही या निमित्ताने कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन आणि प्रेरणा देणाऱ्या या विद्यालयाच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. सुरेखा पाटील, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली पाटील,  मराठी विभागाचे मुखाध्यापक  उमेश कोलते, विद्यालयातील शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडूनही प्रणवचे अभिनंदन करण्यात आले 

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरेंनी पुन्हा एकदा स्वत:ला सिध्द केले “आयर्न मॅन”