महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कोपरखैरणे येथील नॉर्थ पॉईंट स्कूलमध्ये कवितांचे सादरीकरण
नॉर्थ पॉईंट स्कूल आयसीएसईमध्ये काव्यवाचन स्पर्धेत ७५० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
नवी मुंबई : कोपरखैरणे मधील नॉर्थ पॉईंट स्कूल आय. सी. एस. ई. मध्ये ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तीन गटात झालेल्या या स्पर्धेत ७५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ७५ विद्यार्थ्यांनी अंतिम फेरीत कवितांचे सादरीकरण केलेल्या विद्यार्थ्यांमधून लहान व मोठ्या गटांनुसार सर्वोत्कृष्ट पारितोषिक शमिका वाघमले, सौरिष घाग,आर्या गुरव, चिराग भदाणे आणि आर्यन बंसू या विद्यार्थ्यांनी पटकावले. त्याचप्रमाणे प्रथम,द्वितीय व तृतीय पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सुधा मेनन उपस्थित होत्या. कवयित्री प्राध्यापिका वृंदा संतोष कवठेकर व लेखिका, कवयित्री ऋता मनोज भामरे यांनी परीक्षक म्हणून स्थान भूषविले. विद्यार्थ्यांनी कविता वाचनाच्या माध्यमातून ना.धो.महानोर यांच्या काव्य स्मृतींना स्मरत काही रानकविता,शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या कविता,निसर्ग कविता व अन्य कवींच्या कवितांचेही यावेळी सादरीकरण करण्यात आले.
शालेय पातळीवर असा कार्यक्रम राबविला जातो याचे कौतुक करत आय. सी. एस. ई. बोर्ड असूनही मराठीकडे बघण्याचा दृष्टीकोन कौतुक करण्याजोगा आहे ,यात शंका नाही असे मत परीक्षकांनी त्यांच्या भाषणांमधून व्यक्त केले. आय. सी. एस. सी. बोर्ड मधील विद्यार्थी व पालकांनी 'काव्यरंग' सारख्या कार्यक्रमांला इतका भरभरून प्रतिसाद दिला यासाठी शिक्षकांइतकेच विद्यार्थी व पालकांचेही तोंड भरून कौतुक केले. कारण स्पर्धां यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांच्याइतकेच पालकांचेही तितकेच मोलाचे योगदान लागते यासाठी परीक्षकांनी पालकांचे विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमाचे अगदी सूत्रसंचालनापासून ते आभार प्रदर्शनापर्यंत सगळा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या पार पाडला म्हणून सर्व विद्यार्थ्याच्या पाठीवर कौतुकाची थाप परीक्षकांनी दिली.
.