इंडोनेशियन युध्दकला स्पर्धेत नवी मुंबईच्या संघाने केली पदकांची लयलूट

१३ व्या राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत नवी मुंबई संघाला १५ सुवर्ण पदकांसह १ रजत पदक
 

नवी मुंबई : क्राइस्ट अकॅडमी स्कूल कोपरखैरणे येथे ८ व ९ जुलै रोजी पार पडलेल्या १३ व्या राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत १५ सुवर्ण १ रजत पदक मिळवून नवी मुंबई संघाने पहील्या क्रमांकाचा चषक पटकावला. ३ सुवर्ण ५  रजत ६ कांस्य पदके मिळवून सांगली जिल्हा दुसऱ्या स्थानी राहीला. तर १ सुवर्ण ५ रजत ५ कांस्यपदके मिळून कोल्हापूर संघ तिसऱ्या स्थानी राहिला. विजयी झालेल्या खेळाडूंची निवड नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी करण्यात आली.

 ९ जुलै रोजी सायंकाळी बक्षीस वितरण समारंभ क्राईस्ट अकॅडमी स्कूल मुंबई झोनचे मॅनेजिंग डायरेक्टर फादर जैसन, इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले, महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र प्रतापसिंग, मुख्य सल्लागार ॲड. विशाल सिंग, महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशनचे खजिनदार मुकेश सोनवाणे, समाजसेवक मिथुन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.२१ जिल्ह्यातील २१५ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ११ वी पिंच्याक सिलॅट राष्ट्रीय स्पर्धा १२ ते १५ ऑगस्ट २०२३ रोजी विभागीय क्रिडा संकुल नाशिक येथे होणार असुन या स्पर्धेत २८ राज्य व ८ केंद्र शासित प्रदेश तसेच ऑल इंडिया पोलीस या संघाचे ९०० खेळाडू सहभागी होणार आहेत. या राष्ट्रीय स्पर्धेतून ३७ व्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी प्रत्येक वजनी गटातील विजयी १६ खेळाडूंची निवड राष्ट्रीय स्पर्धेतून करण्यात येईल अशी माहिती किशोर येवले यांनी दिली.

नवी मुंबई संघातील विजयी खेळाडू : १) किरणाक्षी किशोर येवले - २सुवर्ण पदक (तुंगल, टॅडिंग) २) पूर्वी राहुल गांजवे - १सुवर्ण सोलो (क्रिएटिव्ह इव्हेंट) ३) रिया चव्हाण -१सुवर्ण (टॅडिंग)४) पौर्णिमा तेली १सुवर्ण (टॅडिंग) ५) भक्ती किल्लेदार १सुवर्ण (टॅडिंग) ६)अनुज सरनाईक - १सुवर्ण (टॅडिंग) ७)वैभव वाल्मीक काळे -३ सुवर्ण (टॅडिंग , रेगु, सोलो) ८)ओमकार अभंग - २ सुवर्ण (टॅडिंग , रेगु,) ९)अंशुल अरून कांबळे -१ सुवर्ण १रजत (टॅडिंग, तुंगल) १०) रामचंद्र बदक -२ सुवर्ण ( टॅडिंग,गंडा) ११) सोमनाथ सोनावणे -२ सुवर्ण( टॅडिंग,गंडा) १२) कृष्णा नर्सिंग पांचाळ -१सुवर्ण १रजत (तुंगल, टॅडिंग)१३) मुकेश चौधरी - १सुवर्ण (टॅडिंग) १४) कार्तिक पालवे -१सुवर्ण १ रजत (टॅडिंग ,गंडा) १५) सचिन गर्जे - १सुवर्ण १ रजत १ कांस्य (टॅडिंग ,गंडा) १६) पियुष शुक्ला -१सुवर्ण (टॅडिंग) 

 

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

१५ वर्षे मुले ,१७ वर्षे मुले व मुली यांच्या स्पर्धांचे आयोजन