आंतरराष्ट्रीय नॅचरल बॉडी बिल्डींग स्पर्धेत शीतल आंधळे यांना सुवर्णपदक

मुंबई येथे पार पडलेल्या ‘राष्ट्रीय नॅचरल बॉडी बिल्डिंग' स्पर्धेत शीतल आंधळे सुवर्णपदाच्या मानकरी

नवी मुंबई : दक्षिण कोरिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नॅचरल बॉडी बिल्डींग स्पर्धेत वाशीमधील शीतल आंधळे यांनी सुवर्णपदक पटकाविले आहे. दक्षिण कोरिया येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत जगभरातून स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातून उत्कृष्ट स्पर्धा निवड करण्यात आली. यात शीतल आंधळे यांनी प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकाला गवसणी घातली. गेल्या ७ वर्षापासून शीतल या नवी मुंबई स्पोर्टस्‌ असोसिएशन (एनएमएसए) येथे वेटलिपटींग व्यायामाचा सराव करत आहेत. सन-२०१८ मध्ये छत्तीसगड येथे झालेल्या राष्ट्रीय वेटलिपटींग स्पर्धेत देखील शीतल आंधळे यांनी सुवर्णपदक पटकावले होते. नुकत्याच २७ मे रोजी मुंबई येथे पार पडलेल्या ‘राष्ट्रीय नॅचरल बॉडी बिल्डिंग' स्पर्धेत शीतल आंधळे सुवर्णपदाच्या
मानकरी ठरल्या होत्या.

शीतल आंधळे स्वतः न्युट्रीशियन असून अनेक देश-विदेशी महिलांचे वेटलॉस्ट आणि नॅचरल बॉडी ऑनलाईन क्लास घ्ोतात. ‘आयसीएन'चे अध्यक्षांच्या हस्ते शीतल आंधळे यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

शीतल आंधळे यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरातील नागरिकांकडूनअभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

कोपरखैरणे येथे राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेला प्रारंभ