महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
मनपा सीबीएसई शाळा प्रवेशाची आज सोडत
नवी मुंबई महानगर पालिकेच्या सीबीएसई शाळा प्रवेशाची आज सोडत
नवी मुंबई -: नवी मुंबई महानगर पालिकेच्या सीबीएसई दोन शाळा मध्ये प्रत्येकी १२० जागांसाठी प्रवेश अर्ज मागवले होते. या प्रवेश अर्जांना भरघोस प्रतिसाद लाभला असून एकूण १,११५ अर्ज आले आहेत. त्यापैकी ७६३ अर्ज पात्र ठरले असून त्यातील २४० जागांसाठी आज सोडत काढण्यात येणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने कोपरखैरणे सेक्टर ११ व नेरूळ सेक्टर ५० याठिकाणी पालिकेची सीबीएसई मंडळाची शाळा उभारल्या आहे. खासगी शाळांमध्ये भरमसाठ फी घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हे शिक्षण आपल्या मुलांना देणे आवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने गरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना करीता सीबीएसई शाळा सुरू करून पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या शाळांना मोठा प्रतिसाद वाढत असून प्रवेशासाठी पालकांची अक्षरशः रांगा लागत असतात. यावर्षी प्रवेश घेण्यासाठी २५मार्च पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. दोन्ही शाळांत एकूण १,११५अर्ज दाखल झाले आहेत. यातील कोपरखैरणे येथील शाळा क्रमांक ९४ मध्ये ६७३ अर्ज दाखल झाले असून ५२१ पात्र ठरले आहेत तर सीवूडस शाळा क्रमांक ९३ मध्ये ४४२ अर्ज प्राप्त झाले असून ४१४अर्ज पात्र ठरले असून यापैकी प्रत्येकी शाळा १२० जागांसाठी लॉटरीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. यामध्ये वयोगटात न बसल्याने आणि शाळे जवळच्या निर्धारित परिघाचा विचार करता उर्वरित अर्ज बाद झाले आहेत. आणि या अर्जाची आज ४ मे ला ही सोडत काढण्यात येणार असून लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. अशी माहिती मनपा शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.