महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
पंचनामा : तपास काम - रोचक काम
तपास काम - रोचक काम
गेल्या काही वर्षापासून देशात भ्रष्टाचाराच्या आरोपांनी धुमावुÀळ घातला आहे. विशेषतः राजकारण्यांनी एकमेकांवर असे आरोप-प्रत्यारोप करणे म्हणजेच राजकारण असा युवितवाद चालवला आहे. कोणीही उठावे कोणावरही बेमुराद आरोप करावे व तपास यंत्रणांना कामाला लावावे. अशा तपासात बऱ्याच वेळा काहीही हाती लागत नाही. वर्षानुवर्षे तपास व्ोÀला जातो, मात्र प्रत्यक्ष गुन्हे कमी दाखल होतात व बोटावर मोजण्या इतवयानांच शिक्षा होते.
बोफोर्स प्रकरणात राजीव गांधींवर ६० कोटी रÀपये दलाली घ्ोतल्याचा आरोप करण्यात आला. त्यावेळी देशात जनता पक्षाचे सरकार होते. त्यांनी तपासाला चालना देण्यासाठी एक समिती गठीत व्ोÀली. त्या समितीला सहा महिन्यात रिपोर्ट देण्याचे आदेश दिले. पण त्या समितीला आरोप सिद्ध करणारे पूरावेच मिळाले नाहीत. पुढे वाजपेयी यांनी चौकशी चालूच ठेवली व त्या चौकशी समितीवर जवळपास ६०० कोटी खर्च केले, तरीही आरोपाचे तथ्य बाहेर आलेच नाही. मग खरे कोणाचे मानावे? आता तर या तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या हातात आहेत. या यंंत्रणा फवत आणि फक्त सरकारविरोधी बोलणाऱ्यावर आपले लक्ष वेंÀद्रित करत आहेत व विरोधकांना तपासाच्या नावाखाली जेलच्या कोठडीत डांबत आहेत. ही एक प्रकारची हिटलरशाही देशात सुरु आहे.
सध्या जशी हुकूमशाही असल्याचे दृश्य आहे, तसे पूर्वीही होतेच. पूर्वी राजे, महाराजे आपल्या शत्रू राष्ट्रात किंवा त्यांच्या गोटात आपले हुशार व पारंगत हेर पाठवून गुप्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत. तीच प्रथा आजतागायत चालू आहे. फरक एवढाच झालाय की, शत्रूपक्षातील, राष्ट्रातील गुप्त माहिती मिळवण्याबरोबरच त्याचे भावी मनसुबे, त्यांची मुख्य ताकद कशात आहे. या बरोबरच त्यांच्यातील उणीवा काय काय आहेत याची माहितीही मिळवण्याचा प्रयत्न असे, पण सध्या हेरगीरीबरोबरच ‘फुट पाडा, राज्य करा' हे धोरण अवलंबिले जात आहे. त्यासाठी हेरगिरीचा इतिहास जाणून घ्ोणे महत्त्वाचे आहे.
म्हणतात ना ‘त्रषीचे कुळ आणि नदीचे मुळ' शोधू नये. पण त्यालाही अपवाद ठरणाऱ्या व्यवती असतातच. एखादा पूराशास्त्रज्ञ विद्वान त्रषीचे कुळ शोधण्यासाठी प्राचीन साहित्याचा, संदर्भाचा पाठपूरावा करेल, तर नदीचे मूळ शोधण्यासाठी एखादा संशोधक जीवावर उदार होऊन भटकंती करेल. अखेर जे ठाऊक नाही ते शोधून काढण्याची मानवी जिज्ञासाच त्याला कारणीभूत असते. गुन्ह्याचा तपास करणारे मग ते पोलीस अधिकारी असोत किंवा खासगी अन्वेषक असोत. याच जातवुÀळीत मोडतात. पूराव्याचा मागमूस नसताना किंवा गुन्हेगार अज्ञात असताना हे लोक एखाद्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी जंगजंग पछाडतात. सुक्ष्म व चिकित्सक बुद्धिमत्तेच्या जोरावर गुन्ह्याच्या प्रत्येक पैलूचे बारकाईने विश्लेषण करतात आणि सुतावरÀन स्वर्ग गाठून अखेर पडद्याआड लपलेल्या गुन्हेगाराचा हिडीस चेहरा कायद्यापुढे आणून मृताला किंवा अन्याय झालेल्याला न्याय मिळवून देतात. हा प्रवास त्यांच्यासाठी जितका थरारक तितकाच तो अशा साहसकथा वाचणाऱ्यासाठीही थरारक ठरतो. म्हणून आजही अशा तपासकथा वाचक उत्सुकतेने वाचतात आणि त्या आधारे बनवलेले व शेवटपर्यंत रहस्य टिकवून ठेवणारे चित्रपटही प्रेक्षक आवडीने बघतात.
जगातील सर्वात पहिली अभिजात तपास कथा सन १७९४ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यात एका खुनाच्या आरोपाखाली दोन व्यवतींना फाशी होते. त्याचा मागोवा घ्ोताना न्याय यंत्रणेकडून पिळवणूक कशी होते. याबद्दल गरीब व शोषितांची बाजू कथेत मांडली आहे.
दुसऱ्या एका प्रकरणाची कथा ‘लेडीज ॲन्ड जन्टलमन' या मासिकात एडगर ॲलन पो या लेखकाची ‘द मर्डर इन द रÀ मार्ग' ही कथाही प्रसिद्ध झाली. लेखकाने आपली विश्लेषक बुद्धिमत्ता वापरÀन खुनाच्या मालिव्ोÀचा तपास कसा लावला याचे वर्णन त्यात आहे. ही कथा लोकांना खूप आवडली, त्यामुळे पुढे अशा प्रकारच्या कथा लिहिण्याचे काम अनेकांनी व्ोÀले. नवीन लेखकांना तो कथा लिहिण्याला विषयच मिळाला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. पुढच्या काळात तपासकथांचे जणू पीकच आले आणि त्यातून पुढे तपास कादंबरी (डिटेविटव्ह नॉवेल्स) प्रसिद्ध होऊ लागल्या. यातील पहिली तपास कादंबरी म्हणजे विल्की कॉलिन्सची ‘द मूनस्टोन' ही खऱ्या अर्थाने उत्वृÀष्ट ठरलेली तपास कादंबरी. त्याचे कथा सुत्रही वाचकांची उत्सुकता वाढवत नेणारी होते. मून स्टोन हा हिरा कर्नल जॉन हर्नव्ॉÀसल या लष्करी अधिकाऱ्याने भारतात सेवेत असताना एका मंदिरातून चोरलेला असतो. मायदेशी परतल्यावर त्याने तो पुतणी रॅचेलव्हेरिंडर हिच्यासाठी राखून ठेवलेला असतो. रॅचेलच्या १६ व्या वाढदिवशी तो हिरा तिच्या घरी तिला देतो. पण, त्याच मध्यरात्री तो हिरा चोरीला जातो. या हिऱ्याच्या तपासासाठी एका डिटेविटव्हला नेमले जाते. पण नंतर स्वतःच तपास होती घ्ोतो. यात तो स्वतःही संशयिताच्या यादीत असतो. हिरा कसा सापडतो आणि तो वुÀणी चोरलेला असतो ही एक गंमत कादंबरीतच वाचणे मजेशीर आहे.
दुसऱ्या एका कादंबरीतून अवतरला शेरलॉक होम्स हा खासगी तपास कर्ता. एडन या मानसपुत्राला वाचकांनी इतव्ोÀ डोवयावर घ्ोतले की, त्याची झिंग कधीच उतरली नाही. दुसऱ्या एका कथेत शेरलॉकचा शेवट घडवून आणला. पण, वाचकांना ते पसंत पडले नाही. आपल्या आवडत्या नायकाचा मृत्यू वाचकांना इतके अस्वस्थ केले की, त्यांनी संपादकाच्या कार्यालयात पत्रे पाठवून शेरलॉकला पुनर्जिवीत करण्याची मागणी केली. त्या मागणीप्रमाणे ‘द रिटर्न ऑफ शेरलॉक' हा नायक पुन्हा अवतरला. आपल्या भारतीय साहित्यात तपास कथांच्या जगात पहिले पाऊल मराठी भाषेने उमटवले आहे. ज्ञान प्रसारक नियतकालिकात मे १८६२ ते १८६३ या काळातीलन चार अंकातून ‘छायेची साक्ष', ‘पुत्रशोक', ‘हरवलेले रत्न' व ‘धाकट्या कारवूÀन' या चार रहस्यकथा प्रसिद्ध झाल्या. ही मराठी तपासकथांची सुरÀवात म्हणता येईल.
रहस्यमय कादंबरी म्हणायची झाली तर सुर्याजी सदाशिव महात्मे यांनी लिहिलेली ‘विषधारी पंबाजी' ही पहिली रहस्यमय कादंबरी ठरेल. इथे रहस्यकथा आणि तपासकथा यांना आपण सुस्पष्ट वेगळे करÀ शकत नाही; कारण दोन्हीतील फरक फारच सुक्ष्म आहे. सन १८९८ मध्ये ‘गुप्त पोलिसाने बाहेर काढलेल्या अद्भूत गोष्टी' हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला. अनेक लेखकांनी रहस्यकथा आणि तपासकथांचे दालन समृद्ध व्ोÀले. बाबूराव अर्नाळकर, गुरÀनाथ नाईक, श्रीकांत सिनकर इत्यादी-इत्यादी.
प्रियनाथ मुखोपाध्याय हे कोलकत्ता पोलिसांच्या गुप्तचर विभागात लालबझार येथे काम करत असत. त्यांनी ३३ वर्षाच्या सेवेत अनेक गुन्ह्याची उकल व्ोÀली. त्यासाठी त्यांना ब्रिटिश सरकारने रायबहादूर किताब देऊन गौरवले. त्यांनी २०६ कथा लिहिल्या. पुढे सत्यजित रे, शरदेंदू बंदोपाध्याय यांनी या साहित्य प्रकारात मोलाची भर घातली. त्याच धरतीवर पोलिस खात्यातील गुप्तहेर संस्था मोलाचे कार्य करीत असते. काही वर्षापूर्वीपर्यंत हे गुप्तहेर खाते आपल्या बुद्धीमत्तेला पणाला लावून व अपार मेहनतीने गुन्ह्याची उकल करण्यात व भावी आपत्तीपासून समाजाला वाचवण्यात यशस्वीही होत होते, पण गत काही वर्षापासून या यंत्रणेला काही प्रमाणात आळस आल्याचे दिसत आहे. किंवा कोणाच्या तरी दबावाचा असर त्यांच्यावर झाल्याचे संव्ोÀत मिळत आहेत. अनेक गुन्ह्याचा तपास वर्षानुवर्षे होत आहे. पण हाती काही लागत नाही किंवा हाती काही लागले तरी गुन्ह्याच्या नोंदीत वुÀठेतरी ‘लूप होल' ठेवले जातात जेणेकरÀन अपराधी एक तर जामिनीवर सुटतो किंवा कायमचा गुन्हामुवत होतो. ही बाब गुप्तचर खात्याला नवकीच शोभनिय नाही.
सध्याच्या वंेÀद्र सरकारने तर नवीनच पायंडा पाडला आहे. आपल्या अखत्यारीतील सर्वच तपास यंत्रणाना सांगकामे करÀन ठेवले असल्याचा आभास निर्माण होत आहे. कारण ठळकपणे गुन्हेगार/अपराधी वाटणारी मंडळी राजरोसपणे समाजात मिरवत असतात तर, कोणाच्यातरी तोंडीच्या आरोपावरÀन संशयीत म्हणून कोठडीची हवा खाणाऱ्यांची संख्या सध्या तरी वाढीस लागलेली दिसत आहे. संबंधितांना कोठडीत ठेवूनही त्यांचा तपास करण्यासाठी महिनोन महिने मागितले जातात. पण तपासचव्रÀ काही थांबत नाही. ‘तारीख पे तारीख' घ्ोतली जाते. न्याय मात्र आपली जागा सोडत नाही. तपासाचे व न्यायाचे काम ‘जैसे थे' याच श्रेणीत राहते.
ही बाब सध्या तरी पचनी पडणारी नाही. याबाबत सरदार वल्लभभाई पटेलांचे एक मोलाचे वावय सांगावेसे वाटते. त्यांनी यंत्रणांनी खंबीरपणा दाखवण्यासाठी ३११ च्या कलमाचा वापर करÀन राजकारण्याच्या दबावाखाली न राहण्याचा सल्ला दिला होता. मणवयाचा कणा ताठ ठेवण्याचाही सल्ला दिला होता. त्याची आठवण ठेवली तरी पुरेसे आहे. आपले काम निती नियमाने करण्यात भीती कसली?
- भिमराव गांधले